সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, December 31, 2018

552 शेतक-यांना नौकरी व 135 कोटींचा मोबदला वाटप

552 शेतक-यांना नौकरी व 135 कोटींचा मोबदला वाटप

  • गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने 
  • जमिनीच्या पैशातून नवीन जमिनी खरेदी करा 
  • वेस्टर्न कोल्डफील्ड लिमीटेडकडून शेतकऱ्यांना मोबदला व नौकरी


चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : आमच्या हजारो पिढ्यानी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा,केंद्र सरकारने मोबदल्याचे धोरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग करावा, असे भावनिक आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घुगुस येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

वणी क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मुंगोली, निरगुडा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आज 135 कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच 552 शेतक-यांना वेकोलिच्या प्रकल्पात नौकरी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते हे धनादेश वाटप वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडने आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात पार पडले.

शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांची शेती केली. त्यांनी ती पुन्हा घ्यावी असे भावनिक आवाहन केले. 2022 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे आवाहन केले असून शेतीला चांगले दिवस येत असल्याचे सूतोवाच यावेळी केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह वेकोलि अध्यक्ष प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रा,वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदरकुरवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, सभापती ब्रिजभुषण पाझारे, खुशाल बोंडे, विजय पिदूरकर,दिनकर पावडे, वेकालि वणी क्षेत्राचे क्षेत्रिय महाप्रबंधक श्री. मिश्रा, वेकालि वणी क्षेत्राचे नवीन क्षेत्रिय महाप्रबंधकश्री. कावळे, जि.प. सदस्य नितू चौधरी, राहूल सराफ, बेलसनीच्या सरपंच मनिषा वाढई, निलजईचे सरपंच मनोज डंभारे, बेलोराचे सरपंच प्रकाश खुटेमाटे आदी उपस्थित होते.

यावेळी संबोधित करताना हंसराज अहिर यांनी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव असून त्यांच्या काळातच मोबदला देण्याचे ब्रिटीशकालीन कायदे बदल करण्यात आले आहेत. गरीब घरात जन्मलेल्या प्रधानमंत्र्यांना गरिबीची जाणीव असून त्यामुळेच येत्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येतील ,अशी आशा आपण बाळगायला हवी.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती प्रकल्पामध्ये जात आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळतो आहे. मात्र या मोबदल्यात काही रक्कम पुन्हा वेगळ्या ठिकाणी शेती घेण्यासाठी खर्च करावी,अशी आपली प्रामाणिक सूचना आहे. कारण शेती ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जगण्यास व आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास कमी पडते. यासाठी आपल्याला कुठल्या आयटीआयचे प्रशिक्षण घ्यायची गरज नसते. कारण आमच्या लाखो पिढ्यांना शेती कशी करायची माहिती आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा व घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी उल्लेख केला.

कधीकाळी कोळसा खाणी व संबंधीत कंपन्या ह्या घोटाळ्यासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. आपण सुद्धा या कोळशाच्या विक्री प्रकरणांमध्ये लक्ष घातले होते. संसदेत आवाज उचलला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणीच्या पैसा सार्वजनिक हिता मध्ये आता वापरात येऊ शकला आहे. आज मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात याठिकाणी मोबदला देता आला याचा आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. शेतकऱ्यांच्या संदर्भात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाभर केलेल्या लढ्याला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांपुढे मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढणारा विदर्भातील अग्रणी नेता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वणी, घुगुस, वरोरा, भद्रावती या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये हंसराज अहीर यांनी मोठा लढा उभारून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
काटवली येथील निसर्ग पर्यटन केंद्राचा शुभारंभ

काटवली येथील निसर्ग पर्यटन केंद्राचा शुभारंभ


चंद्रपूर दि.30 डिसेंबर : बल्लारपूर नजीकच्या बामणी काटवली गावातील कमलपुष्प निसर्ग पर्यटन केंद्राचे उद्घाटन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी उपस्थित पर्यटक व निसर्गप्रेमींना संबोधित करताना ते म्हणाले, बल्लारपूर मतदारसंघात एक नवीन निसर्ग पर्यटन केंद्र उभे होत आहे. याचा मला आनंद असून या निसर्ग पर्यटन केंद्राच्या मार्फत रोजगार निर्मिती व परिसराचा विकास अपेक्षित आहे. कोणताही नवा प्रकल्प सुरू होतो तेव्हा त्या मतदारसंघाला तो पुढे घेऊन जात असतो. या नव्या प्रकल्पातून देखील प्रगतीच्या नवीन वाटा सर्वसामान्य लोकांसाठी निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये या पर्यटन केंद्रा प्रमाणेच नवनवीन प्रयोग करावेत व जे बाजारात विकल्या जाते ते पिकवण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आता या सूत्राचा वापर झाला पाहिजे. आपल्या परिसरातील पिकांवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांनी उन्नती साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणारे किरण चव्हाण, प्रशांत किंनकर आदींचा सत्कार करण्यात आला. निसर्ग केंद्र सुरु करणारे राजेंद्र गोलेच्छा, पंकज गोलेचा, मनोज सिंग यांच्यासह बामणी काटवली गावाचे सरपंच श्री.आत्राम तसेच नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार उपस्थित होते.

Sunday, December 30, 2018

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): 
पतीने पत्नीला साडीने गळा आवळुन मारल्याची घटना आज रविवार दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा येथून जवळच असलेल्या येनगाव रस्त्यावर सोनेगाव (रिठे) या शिवारात घडली. आरोपी गोवर्धन तुळशिराम निकोसे(वय३८वर्ष) राहणार धावडी यांनी आपल्याच पत्नीची अर्चना गोवर्धन निकोसे (वय ३० वर्ष) तिच्याच साडीने गळा आवळुन जीवन यात्रा संपवून टाकली . मृतकाचे लग्नाला १३ वर्ष झाले होते. २ मुली आणि १ मुलगा असा मृतकाचा संसार होता.

पती पत्नी मध्ये नेहमीच वाद व्हायचा म्हणून मृतक ८ दिवसापासून माहेरी मासोद (कामठी) गेली होती. दि. २९/१२ ला आरोपी स्वतः जावून पत्नीची समजूत घालून गावाला आणले. आणि ३०/१२ तारखेला ही घटना घडली. आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. मृतकाची उत्तरीय तपासणी उदयाला ३१डिसेंबरला होईल.निकोसे हा परिवार धावडी(बु.) गावाचा असून कारंजामध्ये किरयाने राहत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे.
 ‘त्या’ जखमी बिबट्याचा  उपचारादरम्यान मृत्यू

‘त्या’ जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू



नागपूर :- जबलपूर मार्गावरील देवलापार वन परिक्षेत्रातील राखीव जगलात गत आठवड्यात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या  बिबट्याचा गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आज रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, जबलपूर मार्गावरील देवलापार मधील राखीव वन कक्ष क्रमांक ४९४ मधून जाणाऱ्या महामार्ग क्र.-७ नागपूर-जबलपूर मार्गावर अज्ञात वाहनाने मादा बिबड्याला १५ डिसेंबर रोजी धडक दिली. यात बिबट गंभीर जखमी झाला. त्याला नागपुरातील गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी आणले होते. या जखमी बिबट्याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर बिबट्याचे शविच्छेदन करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील स्म्शानभूमीत दहन करण्यात आले.

यावेळी गोरेवाडाचे विभागीय व्यवस्थापक, वन्य जीव बचाव केंद्र गोरेवाडचे सहायक वनसंरक्षक, सेमिनरी हिल्सचे वनपरिक्षेत्र अधिकारी, डब्ल्यू.आर. टी. सी.चे डॉ. शालिनी, डॉ. सोमकुसरे, डॉ. सुजीत मॅथ्यू, डॉ. पावशे आदी उपस्थित होते. अशी माहिती विभागीय व्यवस्थापक एन.व्ही. काळे यांनी दिली.
उघड्यावर झोपणाऱ्या बेघर निराधारांना दिलानिवारा

उघड्यावर झोपणाऱ्या बेघर निराधारांना दिलानिवारा




  • मनपा समाजकल्याण व पोलिस विभागाचे संयुक्त अभियान

नागपूर,ता. ३० : थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना मनपाच्या बेघरनिवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका समाजकल्याण व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षाविभागाच्या पुढाकाराने अशा बेघरांना पोलिस वाहनांतून बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आलीआहे.

थंडीमुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी महापालिका व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे संयुक्तउपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनापोलिस वाहनांद्वारे बेघर निवारा केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर शहरातील रेल्वेउड्डाणपूल, रस्ते, फुटपाथ, हॉटेल, खुले पटांगण, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी यापुढे बेघरांना उघड्यावरराहण्याची गरज पडणार नाही. निवारागृहात् पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर, ब्लँकेट आदी मूलभूत सुविधाउपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘बेघर फ्री सिटी’ अभियानाच्या यशस्वीतेकरीता मनपा अप्पर आयुक्तअझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनातपोलिस निरीक्षक श्रीमती संखे, प्रमोद खोब्रागड़े, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह सामाजिक सुरक्षा पोलिसविभाग, मनपा समाज कल्याण विभाग तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी कार्य करीत आहेत.
बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल : ना.सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल : ना.सुधीर मुनगंटीवार

  • शहरातील सात कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
  •  3 हजार बेघरांना हक्काचे घर देण्याचा प्रकल्प राबवणार
  • बल्लारपूर भारतातील सर्वात सुंदर शहर बनवण्याचे आवाहन





चंद्रपूर, दि.30 डिसेंबर - बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, क्रीडा संकुल, डायमंड प्रशिक्षण केंद्र, एक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपूरातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे. नजीकच्या काळात ते रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्र देखील होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, रविन्द्र नगर वार्ड ,मौलाना आझाद वार्ड आदी ठिकाणच्या 7 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन आज ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध तीन भागांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या शहराने भरभरून आपल्याला दिले असल्यामुळे या शहराला रोजगार, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी भारतातील एक सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बल्लारपूर मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत जाणवतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या बल्लारपूर मतदारसंघाला प्राप्त होईल. येथील सैनीकी शाळा देशाला भूषण ठरणारी बनत आहे. बॉटनिकल गार्डनची जोमाने तयारी सुरू आहे. शहरांमध्ये तयार होत असलेल्या क्रीडा संकुलामधून 2024 मध्ये देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकविणारे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. मुलींची पहिली डिजिटल शाळा नगरपालिकेमार्फत या ठिकाणी निर्माण होत आहे. षटपूजेसाठी उत्तम व्यवस्था, गणपती घाट, पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह, वाचनालय शहराच्या वैभवात भर टाकत आहेत. शहरात उत्तम बाजारपेठही आकाराला येणार आहे. याठिकाणी अद्ययावत पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालय लक्षवेधी ठरले आहे.

बल्लारपूर शहरांमध्ये एकूण 90 कोटी रुपये खर्च करून 24 तास चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र रस्ते निर्मिती आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सांगड घालण्यासाठी या योजनेला थोडा विलंब होत आहे. बल्लारपूरच्या प्रत्येक वार्डामध्ये नागरिकांना मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी देणारे पाण्याचे एटीएम उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मात्र या सर्व विकास कामांमध्ये या शहराच्या नागरिकांकडूनही काही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, देशांमध्ये स्वच्छता अभियानात हे शहर पहिले आले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी देखील आपले दायित्व निभवावे. भारतात सर्वात स्वच्छ व सुंदर शहर हे माझ्या मतदारसंघात आहे, याचे मला समाधान असले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बल्लारपूर मतदारसंघाने आपल्याला भरभरून दिले आहे. याचा विसर आपणास कधीच पडणार नाही. बल्लारपूर शहरातील तीन हजार बेघरांना अद्यावत घरे देण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बल्लारपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी डायमंड प्रशिक्षण केंद्रासोबत कापड उद्योगाला पूरक ठरेल असे एक हजार शिलाई मशीनचे युनिट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी सुरु होणारे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा व अन्य मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक बेरोजगारांना उपलब्ध व्हावे, ही महत्वाकांक्षा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील संविधान चौकाचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच बल्लारपूर शहरांमध्ये देखील एक अद्यावत अभ्यासिका सुरू करून मिशन सेवाच्या माध्यमातून या ठिकाणच्या मुलांमध्ये सरकारी नोकरीतील टक्का वाढविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज झालेल्या विकासकामांच्या भूमीपूजनाला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्ष मीनाताई चौधरी, सभापती रेणुका दुधे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपिन मुग्धा,नगरसेवक निशांत आत्राम, मीना बहुरिया, सुवर्ण भटारकर, सागर राऊत, सचिन जाधव, पुनम निरांजने याशिवाय अन्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’

'स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’




नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे छायाचित्र काढण्याचा 
अनोखा उपक्रम एमटीडीसीचा पुढाकार

मुंबई, दि. 30 : नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सूर्योदय सर्वप्रथम गोंदिया जिल्ह्यात तर सर्वात शेवटी मुंबईमध्ये होतो. या दोन जिल्ह्यातील नागरीकांनी नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अर्थात सूर्योदयाची अनोखी छायाचित्रे काढून ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यातील निवडक छायाचित्रांना शासनाच्या विविध माध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

गोंदिया हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा तर मुंबई हा अतिपश्चिमेकडील जिल्हा. गोंदियाला महाराष्ट्राचा ‘उगवत्या सूर्याचा जिल्हा’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पहिला सूर्योदय गोंदियामध्ये होतो. तिथे सूर्योदय झाल्यानंतर साधारणत: 27 मिनिटांनंतर मुंबईत सूर्योदय होतो. मावळत्या वर्षांला निरोप देण्यासाठी अनेकजण उत्साहात असतात पण काहीजण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगळी वाट चोखाळतात.

महाराष्ट्रातल्या गोंदिया आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी नववर्षातील पहिल्या सूर्यकिरणांचे स्वागत करणाऱ्या निसर्गप्रेमी आणि पर्यटनप्रेमींसाठी एमटीडीसीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पर्यटक, छायाचित्रकार, विद्यार्थी, नागरीक यांनी गोंदिया आणि मुंबईतील नव्या वर्षातील पहिल्या सूर्यकिरणांची अनोखी छायाचित्रे काढून ती कल्पक अशा फोटोओळीसह पाठवावी. पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रकारांना एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहण्याची सोय करण्यात येईल. निवडक छायचित्रांना शासनाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी देण्यात येईल तसेच एमटीडीसीच्या देशविदेशात नेण्यात येणाऱ्या प्रसिद्धी सामग्रीत या छायाचित्रांचा समावेश करण्यात येईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि एमटीडीसीची वेबसाईट, सोशल मिडीया पेजेस यांवर ही छायाचित्रे छायाचित्रकाराच्या नावासह प्रसिद्ध करण्यात येतील. छायाचित्रे dgiprsocialmedia@gmail.com या ईमेलवर पाठवावीत,असे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी गोंदिया आकर्षणाचे केंद्र
गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यालगत आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. दाट वनसंपदेने वेढलेला एक निसर्गरम्य जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. नागझिरा वनेनवेगाव राष्ट्रीय उद्यान यांमध्ये विपूल वनसंपदा आणि जैवविविधता आहे. धानाचे कोठार आणि तलावांचा जिल्हा अशीही गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे निसर्गात रमणाऱ्या पर्यटकांसाठी हा जिल्हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहीला आहे. शिवाय हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रावर पडणारी पहिली सूर्यकिरणे या जिल्ह्यावरच पडतात. जिल्ह्यातील सालेकसाआमगावगोंदियादेवरी हे तालुके राज्याच्या टोकावर वसले असून तेथून मध्यप्रदेश किंवा छत्तीसगड राज्यांचा प्रारंभ होतो.

गोंदियानंतर मुंबईत 27 मिनीटे उशिरा सूर्योदय
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही पश्चिमेकडे असून मुंबई हे एक प्रमुख शेवटचे टोक आहे. महाराष्ट्राचा सूर्यास्त कोकण किनारपट्टीवर होतो. कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर हे अतिपश्चिमेकडे असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशीरा होतात. गोंदिया जिल्ह्याच्या तुलनेत मुंबईत साधारण 27मिनीटे उशीरा सूर्योदय होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुमारे 994 किलोमीटर इतके अंतर आहे. पृथ्वीला परिवलनाद्वारे हे अंतर पार करण्यास साधारण 27 मिनीटे लागतात.
 नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतणवाढ

नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतणवाढ

  • किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नांना यश,
  •  महावितरणच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी
  • जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द,

चंद्रपूर- महावितरण केंद्रात आऊट सोंर्सीग टेक्नेशीयन कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. ठेकेदाराने येथील कामगारांचे वेतण दिड हजार रुपयांनी कमी केल्याने त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. यावर तोडगा काडून जोरगेवार यांच्या मागणीवरुन संबधीत कंत्राटाराचा कंत्राट महावीतरणने रद्द करत नव्या कंत्राटदाराला काम दिले आहे. त्यामुळे हे कामगार पुन्हा कामावर रुजु आहे.

चंद्रपूर महावितन केंद्रात आऊट सोंर्सीगचा कंत्राट देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून या कामगारांना 8 हजार 500 रुपये ईतके वेतन दिल्या जात होते. ऑक्टोबर महिण्यात सदर कंत्राटदाराचा कंत्राट संपला व हा कंत्राट नांदेड येथील कंत्राटदाराने घेतला मात्र या कंत्राटदाराने मनमानी कारभार करत कामगारांच्या वेतणात दिड हजार रुपयांची कपात केली. त्यामुळे या कामगारांनी काम बंद आंदोलन पूकारले होते. असे असतांनाही कंत्राटदाराने याकडे लक्ष दिले नाही. अखेर या कामगारांनी किशोर जोरगेवार यांचे कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली त्यानंतर जोरगेवार यांनी महावितरणचे कार्यालयात जाऊन संबधीत कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करुन कामगारांना न्याय द्याव्या अशी मागणी केली. अन्यथा आमच्या पध्दतीने कंत्राटदाराशी निपटू असा ईशारा दिला होता. तसे निवेदनही त्यांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता अशोक मस्के यांना दिले होते. यावेळी मस्के यांनी तात्काळ संबधीत कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावला. तर काल शनिवारी या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द करत कामगारांना 8 हजार 500 रुपये वेतन देण्यात यावे या अटीवर नव्या कंत्राटदाराला हा कंत्राट देण्यात आला आहे. त्यामूळे आता या कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असून ते पुन्हा कामावर रुजू झाले आहे. आज रविवारी या सर्व कामगारांनी किशोर जोरगेवार यांचे कार्यालय गाठून त्यांचे अभार मानले.
चंद्रपूरमधून लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!

चंद्रपूरमधून लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!

बुधवारी 2 जानेवारीला लोकसंवाद
मोबाईललॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

चंद्रपूरदि. 30 डिसेंबर : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईलसंगणकटॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील योजनांसदर्भात प्रातिनीधीक स्वरूपात काही लाभार्थी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क साधणार आहेत.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणिDevendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार,स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. चंद्रपूर सह् अन्य जिल्हयातील लाभार्थी या संवादात सहभागी होत आहेत.
खुशी फांउडेशच्या वतीने 200 चष्मे वाटप

खुशी फांउडेशच्या वतीने 200 चष्मे वाटप

चंद्रपूर- खुशी फांउडेशनच्या वतीने समाजासाठी उत्तम कार्य केल्या जात असून त्यांच्या या चष्मे वाटप कार्यक्रमाने नव वर्षाची पहात कमकुवत दृष्टी असलेल्यासांठी नवतेजानी होणार आहे. यासाठी त्यांचे हे चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले. खुशी फांउडेशन च्या वतीने आज रविवारी दादामहल वार्डात चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात जवळपास दोनशे गरजुंना चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून फांउडेशनचे अध्यक्ष शहजाद अहमद यांची उपस्थिती होती तर उदघाटक म्हणून चंद्रपूर विधानसभा नेते किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती, विनायक बांगडे, माजी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, सलीम बेग, अध्यक्ष जामा मज्जीद, तौसीफ शेख, इमरान दोसानी, शाहीन शेख, सुनंदा चंद्रागडे, विशाल निंबाडकर आदि मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून या प्रसंगी मंचावर उपस्थिती होती. 
सामाजीक कार्यात अग्रसर असलेल्या खुशी फांउडेशनच्या वतीने अणेक सामजीक कार्य केले आहे. 22 नोंव्हेबर ला या फांउडेशनच्या वतीने नेत्र तपासनी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 250 लोकांनी या शिबीराचा लाभ घेतला होता. आज यातील गरजू नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, या संस्थेचे काम नवीन असले तरी मोठे आहे. त्यांच्या तर्फे या पुढेही समाजपयोगी आयोजन केल्या जावेत त्यात शक्य ती मदत करण्याचा मि प्रयत्न करील अशी ग्राव्ही यावेळी बोलतांना जोरगेवार यांनी दिली.
यावेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष शहजाद अहमद यांनी ही संस्था पिडीत शोषीत जनतेसोबत नेहमीच ताकतीने लोकहीताच्या कार्यास अग्रसर राहील अशी ग्राव्ही दिली. शहजाद खान यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तर संचालन सोहेल शेख यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनूस कुरेशी, कादर शेख, शदीद काजी, साहिल शरीफ, अयुब दानी, दानीश शेख, तौसीफ काजी, मोहिन कुरेशी, युसुफ कुरेशी, नफिसा अंजुम, निषाद कुरेशी, रजीया सुलताना, मलेका रोषनजहा आदिंनी अटक परिश्रम घेतले..
भारतीय शिक्षण संस्‍थेने विद्यार्थ्‍यांना जिवनमुल्‍ये शिकविली- सुधीर मुनगंटीवार

भारतीय शिक्षण संस्‍थेने विद्यार्थ्‍यांना जिवनमुल्‍ये शिकविली- सुधीर मुनगंटीवार

श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभानिमित्‍त
स्‍व.धनंजय नाकाडे कलादालन व पसायदान सभागृहाचे लोकार्पण


चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर -कोणत्‍याही देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन हे तो देश किती धनसंपन्‍न आहे यावर होत नसुन तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर होत असते. कै. बालाजी पाटील बोरकर यांनी नवरगाव परिसरात विद्यादानाचे ईश्‍वरीय कार्य सुरू केले. भारतीय शिक्षण संस्‍था ही कष्‍टातुन उभी झालेली संस्‍था आहे. आज असंख्‍य संस्‍था आहे. मात्र अनेक संस्‍था केवळ व्‍यवहारशास्‍त्र शिकवत असल्‍याचे आपण बघतो. भारतीय शिक्षण संस्‍थेने मात्र जीवनशास्‍त्र शिकविण्‍याचे मोठे कार्य केले आहे. या संस्‍थेच्‍या शतकोत्‍तर वाटचालीसाठी मी शुभेच्‍छा देतो असे प्रतिपादन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि.29 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील नवरगाव येथे ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, श्री. परमानंद पाटील बोरकर, भारतीय शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाकरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, कला या दोन अक्षरांच्‍या शब्‍द समुहात मनाचे पोषण करण्‍याचा भाव दडला आहे. आज आपला समृध्‍द सांस्‍कृतीक वारसा जतन करीत आहोत. बल्‍लारपुर, मुल येथे नाट्यगृह आपण बांधले आहे. ब्रम्‍हपुरी येथे नाट्यगृहाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले आहे. कला व संस्‍कृतीची जपणुक करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न‍शील आहोत. मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट हे शिखर सर केले. आता मिशन सेवा या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुका स्‍तरावर स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी अभ्‍यासिका आपण बांधणार आहोत. या ठिकाणी बसस्‍थानकाची मागणी करण्‍यात आली. जिल्‍हयात 11 नवीन बसस्‍थानके आपण बांधत आहोत. चंद्रपूर, भद्रावती, चिमुर, बल्‍लारपुर,मुल, घुग्‍घूस या ठीकाणी बसस्‍थानकांची बांधकामे सुरू झाली आहेत. आपण जागा उपलब्‍ध करा निश्चितपणे या मागणीचा विचार करू असेही यावेळी बोलतांना म्‍हणाले.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्‍या हस्‍ते स्‍व. धनंजय नाकाडे, स्‍मृती कलादालनाचे उद्घाटन करण्‍यात आले. तसेच पसायदान सभागृहाचे लोकार्पण करण्‍यात आले. या महाविद्यालयाची समृध्‍द परंपरा व यशस्‍वी वाटचाल प्रत्‍येक महाविद्यालयासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्‍याचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकर म्‍हणाले. सभारंभाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी केले. संस्‍थेचा प्रवास विशद करणारे मनोगत सचिव सदानंद बोरकर यांनी व्‍यक्‍त केले.

श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या उभारणीत योगदान देणा-यांच्‍या वारसांचा सन्‍मान सुवर्ण महोत्‍सवी समारंभात करण्‍यात आला. काही माजी प्राचार्य व कर्मचारी यांना सेवा योगदान सन्‍मान देवुन गौरव करण्‍यात आला. 50 वर्षाच्‍या उभारणी पर्वातील आठवणिंना उजाळा देणारी ज्ञानार्थ ही स्‍मरणीका यावेळी विमोचीत करण्‍यात आली. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी , विद्यार्थींनी, पालक व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.
भंडाऱ्यात वाघाचा मृत्यू

भंडाऱ्यात वाघाचा मृत्यू

मनोज चीचघरे/प्रतिनिधी:
उमरेड- पवनी- कर्हांडला अभयारण्यातील चिचखेड बिटमध्ये नर जातीचा पट्टेदार वाघ रविवारी सकाळी मृतावस्थेत अाढळून आला. पर्यटकांना वाघ मृतावस्थेत दिसताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

चिचगाव कंपार्टमेंट नं. २२६ मध्ये जय या प्रसिद्ध वाघाचा बछडा राजा उर्फ "चार्जर" नावाने ओळखला जाणारा नर जातीचा पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे.पोट फुगलेला असल्याने विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अभयारण्यात जाण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला आहे.
 चिचखेड जंगलात वाघ मृतावस्थेत अाढळला

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य व नवयुवक तरुणाचे सहकार्य मोलाचे लागले.
दत्त जयंती व हनुमान जयंतीच्या कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता २७ डिसेंबर ला झाली. यामध्ये २६ डिसेंबर ला घटस्थापना ह.भ.प. श्रीराम कापसे महाराज व ह.भ.प. खेमराज कापसे महाराज याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावा खेड्यातून महिलांचे तसेच पुरुषाचे भजन मंडळांना आमंत्रित करून २६ डिसेंबर ला रात्रभर जागृती करण्यात आली. २७ डिसेंबर ला सकाळी गावातून रामधून काढून व नंतर हनुमान देवस्थान कोटगाव (हेटी) या देवस्थानामध्ये गेली. ह. भ.प.शरद महाराज वैद्य कीर्तनकार याचे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करून गोपालकल्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस गटनेता मा.सतीशभाऊ वारजूकर तसेच प्रमुख पाहुणे चिमूर पंचायत समितीच्या सदस्या सौ भावनाताई बावणकर, चिमूर नगर परिषदचे नगरसेवक विनोद ढाकुणकर,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजुभाऊ कापसे आदी उपस्थित होते.
ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4.50 लक्ष

ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4.50 लक्ष


ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे अर्थमंत्री
 सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री आवास योजना साठी इमेज परिणाम
चंद्रपूरातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला असून राज्‍य सरकारच्‍या गृहनिर्माण विभागाने दिनांक 28 डिसेंबर 2018 रोजी म्‍हाडा ला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्‍याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने ऑटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍यामुळे महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनतर्फे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे.
चंद्रपूर जिल्‍हयातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या ऑटोरिक्षा चालकांच्‍या मागणीचा अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात 20 नोव्‍हेंबर 2018 रोजी त्‍यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्‍हाडा कॉलनीतील घरे 4.50 लाखापर्यंत उपलब्‍ध करून देण्‍याचे निर्देश त्‍यांनी या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्‍या अधिका-यांना दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन चंद्रपूर येथील आरक्षण क्रमांक 79 व 80 मौजा कोसारा येथे ऑटोरिक्षा चालकांकरिता नागपूर मंडळातर्फे प्रस्‍तावित घरकुल योजनेबाबत शासनाला सादर केलेल्‍या प्रस्‍तावामध्‍ये सदर सदनीकांची किंमत रूपये 7,56,000/- प्रती सदनिका अशी दर्शविण्‍यात आली असून सदर किंमत रूपये 4.50 लक्ष इतकी करण्‍यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा चालकांनी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍याकडे सातत्‍याने रेटली होती. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सदर मागणी पुर्णत्‍वास आली असून आता ऑटोरिक्षा चालकांना सदर घरे रूपये 4.50 लक्ष एवढया किंमतीत उपलब्‍ध होणार आहेत.
सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍याबद्दल महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशनचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष बळीराम शिंदे, उपाध्‍यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, जहीर शेख, जाकीर शेख, रविंद्र आंबटकर, विनोद चन्‍ने, राजू मोहुर्ले, रमेश मुन, अनिल मिसाळ, हरीभाऊ नागपूरे, दिलीप कलोडे, प्रशांत वानखेडे, विलास बावणे, किरण मस्‍कावार, किशोर राजबोईनवार, मारोती दानव, महादेव करंबे, तुळशिराम वालकोंडावार, सुरेश क्षिरसागर, परमेश्‍वर सरकार, सचिन बगड, राजेश तिराणकर, सतिश गोरघाटे, रामचंद्र गुंजेकर, सुनिल पाटील, मंगेश चवरे, खुशाल आंबटकर, रमेश गोमासे, दिलीप ढवळे, विलास जुमडे, परशुराम तुराळे आदींनी अर्थमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार व्‍यक्‍त केले आहे.

Saturday, December 29, 2018

ग्रामरोजगार सेवक जाणार संपावर

ग्रामरोजगार सेवक जाणार संपावर

चंद्रपूर/अमोल जगताप:

    दि.२८ नोव्हेंबर रोजी ग्राम रोजगार सेवक चंद्रपूर संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल कोयचाडे ह्यांच्या नेतृत्वात संघटने कडुन संवर्ग विकास अधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले, आपल्या न्यायिक मागण्या पूर्ण न झाल्यास १ जानेवारी २०१९ पासून आमरण उपोषण व कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
  पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळश्याचा ट्रक

पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळश्याचा ट्रक

कोराडी/अनिकेत मेश्राम:

रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ एक अवैध कोळशाचा ट्रक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला.
हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्रथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ हा कोळसा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. घटनास्थळाजवळ वजन मापेही आढळून आली आहेत. पेट्रोल पंपा जवळ दररोज दोन तीन ट्रक भरले आणि उतरवले जातात. जवळच असलेली कोळश्याची खदान सुरू झाली तेव्हांपासून हा अवैद्य कोळसा विकला जात असल्याचे यावेळी लोकांनी सांगितले. ट्रकचालक ही गाडी महानिर्मितीची असल्याचे सांगत होता.


पालकमंत्र्यांनी पारशिवणी पोलिसांना बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून ट्रकसह कोळसा जप्त करून चालकाला अटक करण्याचे निर्देश दिले.
घटनास्थळी यावेळी पालकमंत्र्यांसोबत आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ आशिष जयस्वाल, योगेश वाडीभस्मे व अन्य उपस्थित होते.
बिआरएसपी चे राष्ट्रीय महामार्ग मुल वर रास्तारोको आंदोलन

बिआरएसपी चे राष्ट्रीय महामार्ग मुल वर रास्तारोको आंदोलन

मुल/रमेश माहूरपवार:
   बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी द्वारा मुल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरिल रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बीआरएसपी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

   मागिल दोन वर्षापासुन राष्ट्रीय महामार्ग मुल वरिल मुख्य रस्ता नियमांना डावलुन खोदण्यात आला. या महामार्गामुळे मुल चंद्रपूर या मार्गावरिल प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहे. अर्धवट कामामुळे या  रस्त्यावर कित्येक मोठे अपघात होऊन काही जणांचे जीव पण गेले . रस्त्यावरिल धुळीमुळे मोठे प्रदुषण होत असुन य़ाकडे सबंधीत प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे. बिआरएसपीचे राजू झोडे यांच्या वतीने अनेकदा निवेदन देऊनही संबधीत प्रशासनाने  दखल घेतली नाही. सबंधित अधिकारी व कंत्राटदाराच्या संगनमताने सदर कामं करण्यात येत असल्याचा आरोप झोडे यांनी केला. सदर मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या भागातून जात असल्याने आणि शासनाची परवानगी नसतांना हा मार्ग खोदुन ठेवला त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होते आहे. या समस्येवर  बिआरएसपी ने कठोर भुमीका घेऊन या महामार्गावरिल संपूर्ण रास्ता रोखुन तिव्र निषेध दर्शविला. सबंधीत अधिकारी व कंत्राटदारावर यांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाश्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  करिता सबंधीत अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची जोरदार  मागणी राजु झोडे यांनी केली. मूलचे तहसिलदार राजेश सरवदे,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे  उपविभागीय अभियंता  अशोक मत्ते यांनी  या महामार्गाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले .
     जर येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर संबधीत कार्यालयाला ताळे ठोकुन तिव्र निषेध करणार असा ईशारा पझोडे यांनी  दिला . या  रास्तारोको आंदोलनात बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश मनिष पूणेकर तालुकाअध्यक्ष शैलेश वनकर, सुजित खोब्रागडे,गौरव शामकूळे,काजु खोब्रागडे,नागेश दुधबळे ,बालाजी सातपूते,अमोल नामेवार,अक्षय नामोलवार,वि्श्वास कोल्हे,ईरफान पठान,छोटु आकबत्तलवार,अनिकेत वाकडे,नागेश दुधबडे,बालाजी सातपूते,अजय मेश्राम ,बंडुभाऊ निमगडे ,सुरज देवगडे ,रितीक चोखांन्द्रे ,रोहीत शेंडे ,सोहन दहीलकर,आकाश दहीवले,आकाश येसनकर ,अजय दहीवले,आंनद येसनकर,वतन चिकाटे तथा असंख्य बिआरएसपी कार्यकर्त्यांनी  रास्तारोको आंदोलन करुन कंत्राटदार आणि पालकमंत्र्याचा निषेध केला.
  तीन कार जाळणारे आरोपी आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

तीन कार जाळणारे आरोपी आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

  • दोन अल्पवयीन आरोपीह सराईत गुन्हेगाराला अटक
  • खापरखेडा पोलिसांच्या प्रयत्नांना यश

खापरखेडा/Kapil Wankhede
जुन्या वादातून दोन अल्पवयीन आरोपीसह एका तळीपार खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीने परिसरात पेट्रोल ओतून तीन कार जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारला रात्री उशिरा घडली सदर घटनेतील आरोपीनी मोठया शिताफीने अवघ्या आठ तासात मुसक्या आवळल्या असून तिन्ही आरोपीना अटक करण्यात खापरखेडा पोलीसांना यश आले आहे अश्विन श्यामराव ढोणे वय 24 रा वार्ड 4 इंदिरा नगर खापरखेडा, कुणाल सुरेश गायकवाड वय 17 रा शिंगोरी ता पारशिवणी,अनिल विरपाल नागर वय 17 रा वार्ड 4 भानेगाव असे अटकेतील आरोपींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्याशी मागील एक वर्षापूर्वी आरोपी अश्विन ढोणे याने काही कारणावरून वाद घातला होता एक वर्षांपूर्वी अश्विनने त्यांची कार जाळण्याचा प्रयत्न केला होता मात्र शुक्रवारला परत आरोपी अश्विन, त्याचे सहकारी मित्र आरोपी कुणाल व अनिल यांनी संगनमत करून रात्री 11.30 च्या सुमारास झिंगरे यांच्या घरासमोर ठेवलेली मारोती स्वीप्ट कार क्रमांक MH-40-BE-8116 पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला यादरम्यान आरोपीनी अजय डेअरिया व भुरू पठाण यांच्या घरासमोर ठेवलेली मारोती रिटज कार क्रमांक MH-31-EA-4063 व टाटा इंडिका कार क्रमांक MH-31-CN-2355 जाळण्याचा प्रयत्न केला सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी तपासचक्रे वेगाने फिरवीत आठ तासात शनिवारला पौणिकर गल्लीत कारने जात असताना फिल्मी स्टाईल पाठलाग करून तिन्ही आरोपीना ताब्यात घेतले सदर घटनेत तिन्ही कारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून खापरखेडा पोलीसांनी गुन्ह्याची नोंद करून मिळालेल्या तक्रारी वरून भांदवी 435, 427, 34 कलमान्वये अटक केली आहे सदर कार्यवाहीत पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्यासह नितेश पिपरोदे, सुरेंद्र वासनिक, दिपक दारोडे, अलीम खान यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे पुढील तपास सुरू असून तपासा दरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे

बदला घेण्यासाठी जाळल्या कार?काही दिवसांपूर्वी आकाश पानपत्ते या तरुणांचा कुख्यात सूरज कावळे याने माऊझर मधून गोळ्या झाडून खून केला होता शिवाय सुरजला कुख्यात राकेश गाडेकरचा गेम करण्याची सुपारी देण्यात आली होती तेव्हा पासून ते एकमेकांच्या मागावर होते काटा काढण्यासाठी संधी शोधत होते 27 डिसेंबर ला रात्रीच्या सुमारास राकेश गाडेकर व त्याचा मित्र निलेश डेअरिया सुरजला ठार करण्याच्या उद्देशाने गेले होते कार जळणारे तिन्ही आरोपी सुरजचे मित्र असून बदला घेण्याचा उद्देशाने निलेश डेअरया मोठा भाऊ अजय यांची कार जाळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अश्विन ढोणे हा माथेफिरू सराईत गुन्हेगार असल्याने त्याने झिंगरे व पठाण यांच्या कारला जुने वैनमस्व असल्याने पेट्रोल ओतून आग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भानेगावात दडून बसले होते आरोपीभानेगाव वार्ड क्रमांक 4 परिसरात आरोपी अनिलच्या घरी दडून बसले होते दुपारी 12 वाजता ते पौणिकर गल्लीतून कार जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी काही पोलीस दबा धरून बसले होते तर काही पाठलाग करीत होते मोठया शिताफीने मुख्य आरोपी अश्विनसह, अनिल, कुणाल यांना ताब्यात घेतले.

मौका लावण्याची मागणीपरिसरात दिवसेंदिवस गुन्हे वाढीस येऊ लागले आहेत कार्यवाही होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे स्थानिक राजकीय नेत्यांसह व्यापाऱ्यांनी मौका लावण्याची मागणी केली आहे.

खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात अश्विन होता फरारएका वर्षासाठी आरोपी अश्विन याला तळीपार करण्यात आले आहे दरम्यान मागील दोन तीन महिन्यांपूर्वी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात खाजगी सुरक्षा रक्षक मंगेश गजभिये याला अश्विनने ठार मारण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्यापासून अश्विन फरार होता मात्र कार जाळल्या प्रकरणात तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Friday, December 28, 2018

थर्टी फ़स्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

थर्टी फ़स्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

नागपूर /प्रतिनिधी:


सरत्या वर्षाला 'गुड बाय' आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत. ह्या कार्यक्रमात वीजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना वीजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत, अश्या कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरल्या जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अश्या कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराबाहेरील अनेक ढाबाचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महामार्ग व रस्त्यांवर चोरीच्या वीजेवर आकर्षक रोषणाई करीत असल्याचीही माहिती असून मंडप डेकोरेशन व्यावसायिकांकडून वीज तारांवर आकडे टाकून देण्याची व्यवस्था केली जात असल्याचेही कळते, अश्या ढाबा आणि मंडप डेकोरेशन व्यावसायिकांवर कठोर कारवाईसोबतच त्यांचाही व्यावसायिक परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याबाबत महावितरणची आग्रही भुमिका राहील.

सामाजिक सुरक्षाही महत्वाची 
31 डिसेंबरच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फ़टका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, फ़टाक्यांची आतिषबाजी, बेधुंद वाहन चालकांमुळेही अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, या सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ टाळून त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणेही आवश्यक आहे. सोबतच अश्या कार्यक्रमांसाठी वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते. जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे. वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

31 डिसेंबर हा आनंदाचा उत्सव असून या दिवशी उत्सवप्रेमींच्या आनंदात विघ्न पडू नये यासाठी अधिकृत वीजेचाच वापर करण्यात येऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन

नागपूर/प्रतिनिधी:
 महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्‌घाटन करण्यात आले. राज्यातील १६ परिमंडलाचे एकूण ८ संयुक्त संघांचे ५९२ पुरुष व १७६ महिला असे एकूण ७६८ खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. 
स्वारगेटमधील सणस क्रीडांगणावर महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे
उद्‌घाटनप्रसंगी क्रीडाज्योत प्रज्वलित करताना प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे.
यावेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार

स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर स्पर्धेला थाटात सुरवात झाली. यावेळी सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलिस बॅण्डनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्‌घाटन कार्यक्रमाला पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता व स्पर्धेचे मुख्य समन्वयक सचिन तालेवार, मुख्य अभियंता अनिल भोसले (कोल्हापूर), सुरेश गणेशकर (औरंगाबाद), सुनील पावडे (बारामती), भूजंग खंदारे (मुख्यालय), ब्रिजपालसिंह जनवीर (नाशिक), . शंकर तायडे (गुणवत्ता चाचणी) वंदनकुमार मेंढे (महापारेषण), रंजना पगारे (रत्नागिरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. 

स्पर्धेचे उद्‌घाटक प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे म्हणाले की, खेळ हा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो. अपयश पचविण्याची व नव्याने उभारी घेण्याची मानसिक शक्ती मिळते. खिलाडूवृत्ती व सांघिक भावना वृद्धींगत होते. संधी मिळाली की त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची उर्जा प्राप्त होते. त्यामुळे ही स्पर्धा महावितरणमधील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कमलाकर चौधरी व मृदुला शिवदे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते सर्वश्री सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगडपल्लेवार, वादिराज जहागिरदार उपस्थित होते. 

उद्‌घाटनानंतर लगेचच झालेल्या पुरुष व महिला गटातील १०० मीटर धावस्पर्धेत पुणे-बारामती संघाचे गुलाबसिंग वसावे आणि मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाच्या प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकविला. तर टेनिक्वाईटमध्ये भांडूपच्या प्रियांका उगले प्रथम तर पुण्याच्या शितल नाईक यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. 

कबड्डीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने अकोला-अमरावती संघावर ३६विरुद्ध ६ गुणांनी विजय मिळविला. यामध्ये विजयी संघाचे परिक्षित शिंदे व नीलेश ठाकूर यांनी चमकदार कामगिरी केली. कबड्डीच्या दुसऱ्या सामन्यात कल्याण-नाशिक संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर ३१विरुद्ध २६गुणांनी मात केली. विजयी संघासाठी सचिन कदम व दीपक गुंड यांची कामगिरी महत्वाची ठरली. 

बॅडमिंटनच्या पहिल्या फेरीतील सामन्यात लातूर-नांदेड संघाने कल्याण-नाशिक संघावर तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाने औरंगाबाद-जळगाव संघावर मात केली व दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. 

क्रिकेटमध्ये कोल्हापूर सुपर ओव्हरमध्ये विजयी - नेहरू स्टेडीयम येथे झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोल्हापूर विरुद्ध मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघांनी प्रत्येकी 115 धावा काढून बरोबरी साधली. अत्यंत चुरशीच्या या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचा आधार घेण्यात आला. यामध्ये मुंबई-भांडूप-रत्नागिरी संघाने 6 चेंडूवर 6 धावा काढल्या. तर कोल्हापूर संघाने 5 चेंडूतच 7 धावा काढून विजय मिळविला. कोल्हापूर संघाकडून 4 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद करणारा राजेश पास्ते सामनावीर ठरला.
 राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा संभ्रम कुलगुरूंनी दूर करावा !

राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा संभ्रम कुलगुरूंनी दूर करावा !

  •  दिल्लीत राष्ट्रसं तुकडोजी साहित्य संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाने घ्यावे 
  •  विविध अभ्यासक्रमात एक पेपर राष्ट्रसंतांच्या जीवन कार्यावर असावा

नागपूर- विद्यापीठाने त्वरीत करून यु . जी . सी . अनुदान आयोगाकडून रीतसर मान्यता घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी विचार धारेला आर्थिक बळ प्राप्त व्हावे , तसेच विद्यापीठालअंतर्गत चालणा - या विविध अभ्यासक्रमात एक पेपर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन कायांवर असावा तसेच राष्ट्रस तुकडोजी महाराजांच्या पन्नासाव्या सुवर्ण पुण्यस्मृती निमित्त दिल्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन विद्यापीठाने आयोजित करावे , अशी मागणी श्री गुरूदेव युवा मंचाचे प्रवर्तक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा सदस्य ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केली आहे .

 २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठ ' हे नामविस्तार होऊन विद्यापीठाला एक वैचारिक प्रतिष्ठा मिळाली . कोहचाडे विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला हिणवणे थांबले . नामविस्तारानंतरचे प्रथम कुलगुरू डॉ . एस . एन . पठान यांच्या प्रयत्नाने तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील विद्यापीठाने घेतलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी कार्यक्रमात उपस्थित झाल्या . तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते . | कुलगुरू पठाणांनी महाराष्ट्र शासनाकडे राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासन निर्माण करण्यासाठी अनुदानाची मागणी केली . कुठलाही आढावेदान घेता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोटी रूपये अनुदान तुकडोजी अध्यासनासाठी दिले . तसेच पठान यांच्या प्रयत्नाने विद्यापीठाला ' या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ' हे विद्यापीठ गीत मिळाले . नागपूर विद्यापीठाचे नामकरण राष्ट्रसंत तुकडोजीच्या नावाने होण्याआधीपासूनच कुलगुरू अरूण सातपुतळे असतांना तुकारामदादा गीताचार्य ज्येष्ठ प्रचारक श्री गुरुदेव सेवामंडळ यांचे मार्गदर्शनात डॉ . सुभाष सावरकर आणि ज्ञानेश्वर दुर्गादासजी रक्षक यांनी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रमांचे सिलॅबस तयार केले होते . पण विद्यापीठाने त्याची दखल घेतली नाही . विद्यापीठ नामकरणानंतर प्रयत्न सुरूच होते . | डॉ . विलास सपकाळ कुलगुरू झाल्यानंतर त्यांचे आदेशाने एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रम २०१३ मध्ये तयार होऊन सुरू करण्याची घोषणा विद्यापीठात झाली . या विचारधारेचे तात्पुरते प्रमुखपद डॉ . अक्षयकुमार काळे यांचेकडे आले . त्यांचे प्रयत्न फार तोकडे पडले . ते सुद्धा या अभ्यासक्रमापेक्षा सर्टिफिकेट कोर्स व्हावा या मताचे होते . माझ्याशी अनेकदा त्यांनी यावर चर्चा केली . विद्यार्थी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेला भेटणार नाही असा त्यांचा समज होता . । पण २०१५ ला सध्याचे कुलगुरू डॉ . सिद्धार्थ विनायक काणे सरांनी अभ्यासक्रमाविषयीचा घोळ समजून घेऊन तज्ञ अभ्यासकांशी चर्चा केली . २०१५ मध्ये पहिल्याच वर्षी एम . ए . राष्ट्रसंत तुकडोजी अभ्यासक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त विद्याथ्यांनी प्रवेश घेतला . विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून कुलगुरू डॉ . काणे सरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुज आश्रम येथील पुण्यस्मृती महोत्सवात लाखौ जनसमुदायासमोर या अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली . तीच घोषणा नंतर नागपुरातील प्रसिद्धी माध्यमातून केली . पण या कुलगुरूंच्या आव्हानाला व्यवस्थापन परिषदेत विरोध करण्यात आला होता . कारण इतर विचारधारांना पण हाच नियम लागू करावा लागेल , अशी भीती त्यांनी दाखवली . पण विद्यापीठात महात्मा गांधी विचारधारा आणि डॉ . आंबेडकर विचारधारा यु . जी . सी . च्या अनुदानावर चालतात . विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी या महामानवाचे नाव आहे . त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांचे साहित्य विविध भाषेतून आणि अभ्यासक्रमातून लोकांपर्यंत जावे ही कुलगुरूची आणि गुरूदेव सेवकांची राष्ट्रसंतांच्या साहित्याच्या अभ्यासकांची इच्छा होती . पण ते समजून सांगण्यास किंवा ते समजण्यास विद्वान कमी पडलेत . । | जर हीच बाब दुस - या कुठल्या महापुरूषांच्याविषयी घडली असती तर जनक्षोभ वाढला असता . विद्यापीठ व्यवस्थापनाने आस्थेचे कारण देऊन ते स्वीकारले असले , राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा याविषयी निश्चित भूमिका विद्यापीठाने जाहीर करावी . संभ्रम करणा - या बातम्या ' तुकडोजी महाराज विचारधारा कोर्सला एकच विद्यार्थी उत्तीर्ण ' दिशाभूल करून अभ्यासकांना विचलीत करणा - या आहेत . बहुजन महापुरूषांच्याच बाबतीत संभ्रम का निर्माण होतो ? अशी चर्चा अभ्यासकांमध्ये सुरू आहे . 

Thursday, December 27, 2018

द.म.क्षे.सां. केंद्र में  ‘भित्तिचित्र कार्यशाला’

द.म.क्षे.सां. केंद्र में ‘भित्तिचित्र कार्यशाला’


नागपुर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर द्वारा दि. 26 दिसंबर 2018 से 4 जनवरी 2019 आयोजित भित्तिचित्र कार्यशाला अंतर्गत 26 दिसंबर से कार्य प्रारंभ किया गया है। कार्यशाला का विधिवत उद्घाटन 26 दिसंबर को केंद्र के उपनिदेशक श्री. मोहन पारखी के शुभहस्ते, कार्यक्रम अधिकारी गोपाल बेतावर एवं केंद्र के कर्मचारीयों के उपस्थिति में हुआ।

इस कार्यशाला में केंद्र के सहभागी राज्यों के आदिवासी कलाकारों को आमंत्रित किया गया है। जिसमे प्रमुखतः से छत्तीसगढ़ के रजवाड आदिवासी शैली, मध्यप्रदेश की माडिया आदिवासी शैली तथा मंडला आदिवासी शैली, झबुआ की भिल आदिवासी शैली, महाराष्ट्र की वारली आदिवासी शैली आदी कला शैली के कुल 40 कलाकारों द्वारा केंद्र परिसर में स्थायी रूप में निर्मित आदिवासी झोंपड़ी का दुरुस्तीकरण, रंगरंगोटी तथा म्यूरल पेंटिंग आदि नवीनीकरण कार्य आरंभ किया जा रहा है।

केंद्र द्वारा यह सूचित किया जाता है की, नागपुर स्थित कलारसिक इस कार्यशाला में सहभागी होकर इन आदिवासी कलाकारों के साथ में चित्रांकन तथा शिल्पांकन कार्य कर अपना सहयोग दे सकते हैं।यह कार्यशाला पूर्णतः निशुल्क होगी। भारतवर्ष के विविध राज्यों की आदिवासी शिल्पकला, चित्रकला का प्रचार एवं प्रसार तथा युवा पीढ़ी को इस कलाशैली से अवगत कराना यही इस कार्यशाला का उद्देश्य है। कार्यशाला 26 दिसंबर 2018 से 4 जनवरी 2019 के बिच प्रतिदिन सुबह 11 बजे से शाम 7 बजे तक शुरू रहेगी।

इस विषय में अधिक जानकारी हेतु द.म.क्षे.सां. केंद्र के कार्यक्रम अधिकारी ( दृश्य कला प्रभारी ) श्री. गोपाल बेतावर मोब. नं. 9822230810, 9834830791 इनसे संपर्क करें।
गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार

गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार

 पुसेसावळी : (ता.खटाव जि. सातारा)खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडीतील साताबिगे शिवारातील खिलार गाईचा बिबट्या कडुन ठार करुन फस्त करण्याची घटना सोमवार रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास घडली असल्यामुळे या गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती वरुन गिरिजा शंकरवाडीतील शेतकरी यशवंत विष्णु थोरवे यांच्या मालकीची असणारी सातबिगे शिवारामध्ये खिलार जातीची गाय व इतर जनावरे बांधलेली होेती, नेहमीप्रमाणे ते गावामध्ये घरी जेवण करण्यास आले होते, तद्नंतर ते त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या मालकीची गाई दिसुन आली नाही म्हणुन आजुआजुच्या क्षेत्रामध्ये बॅटरीच्या प्रकाशझोतात प्राण्याचे डोळे चमकल्याचे दिसुन आले म्हणुन त्यांनी आरडाअोरडा करुन तो वन्याप्राणी घटनास्थळाच्या उत्तरेस पळुन गेला, त्यानंतर घाबलेल्या अवस्थेमध्येच ते बाकीची जनावरे घरी गेले.

आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचनामा करण्यास आलेली वनअधिकारी व ग्रामस्थ यांनी पाहणी करत असताना गाईच्या तोंडाला पंजा मारलेले अोरखडे दिसत होते व मानेच्या मागील भागातील काळीज व फुफ्फुस नसलेले दिसुन आले त्यावरुन ते वन्यप्राण्यानेच खाल्ले आहे, तसेच या गाईचे बांधलेल्या ठिकाणापासुन ९ मी.अंतरावर गाई अोढत नेल्याचे दिसुन आले तसेच मृत शरिरापासुन ४मी.अंतरावर रक्ताचे डाग दिसत असुन सदर जागेत बारकाईने तपास केला असता काही ठसे दिसुन आले या ठश्यावरुन गाईवर हल्ला करणारा वन्यप्राणी बिबटा असावा असे दिसुन येत आहे. सदर घटनास्थळावरुन कोरेगाव वनपरिक्षेत्राची हद्द उत्तरेस ५००मी.व पश्चिमेस २०० मी.एवढ्या अंतरावर आहे. तरी सदर वन्यप्राणी हा कोरेगाव वनहद्दीत असावा असा अंदाज आहे. त्यामूळे या साताबिगे शिवारात जाण्यास शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

गेल्या पंधरादिवसापासुन सातबिगे शिवारातमध्ये शाळु हरभरा पिके आहेत त्या पिकांची काळवीट डुकरे नासधुस करित असल्यामुळे मी व पाळीव जनावरे या शेतातच थांबत होतो. परंतु काल अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे २५ ते ३० हजार रुपये किंमतीची असणार्‍या गाई ठार झाली, मुला प्रमाणे मी या जनावरांची देखभाल करत असल्यामुळे हा माझ्या कुटुंबावर मोठा आघात आहे. - श्री.यशवंत विष्णु थोरवे, शेतकरी 

काल रात्रीच्या वेळी आमच्या गावातील यशवंत थोरवे यांची गाय बिबट्याने ठार केल्याची बातमी गावभर पसरली आणि गावामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने याबाबत ठोस अशी उपाय योजना करावी. आणि जनावराच्या जिवावर झालेल्या हल्लात मृत झालेली गाईची भरपाई त्या शेतकर्‍याला लवकरात लवकर मिळावी,- श्री.बापुसो थोरवे ( माजी सरपंच गिरिजाशंकरवाडी)

उजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगत्या सौरप्रकल्पासाठी निविदा

उजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगत्या सौरप्रकल्पासाठी निविदा


नागपूर : नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेकरिता महावितरण कंपनीने अशा ऊर्जा र्स्त्रोतांपासुन तयार होणाऱ्या वीजेकरिता स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे वीज खरेदीबाबत विविध उपक्रम हाती घेतलेले आहे.

       या उपक्रमात पवन व सौर स्त्रोतांबरोबरच ऊसाची चिपाडे, कृषिजन्य टाकाऊ पदार्थासारख्या स्त्रोतांचा वीज निर्मितीत समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत महावितरणने निविदा काढलेल्या आहेत व या निविदा प्रक्रियेत यशस्वी झालेल्या सौरऊर्जा प्रकल्प विकासकांसोबत वीज खरेदी करार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच भविष्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना अंतर्गत नविन निविदा काढण्याचे प्रयोजन केले आहे. सद्या ग्रीड संलग्न राज्याअंतर्गत आणि आंतरराजीय सौरऊर्जा प्रकल्पातून 1000 मे.वॅ.वीज खरेदीकरिता निविदा दिनांक 5 डिसेंबर 2018 रोजी प्रकाशित केली आहे.
जमिनीवरील उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांच्या वापरावर मर्यादा येत असल्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेल्या तलाव/ धरणांच्या पाण्यावर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यास मोठया प्रमाणात वाव आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने उजनी धरण, जि. सोलापूर येथे जलाशयावर 1000 मे.वॅ.क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त केले आहे. त्या अनुषंगाने महावितरण कंपनीने सदर प्रकल्पासाठी स्वारस्याचे प्रकटीकरण मागविले होते. सदर स्वारस्य प्रकटीकरणद्वारे मिळालेल्या सूचनांचा विचार करण्यासाठी, तसेच तरंगत सौरऊर्जा प्रकल्पाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत या क्षेत्रातील मर्यादीत अनुभवाचा विचार करुन तरंगता सौरप्रकल्प आस्थपित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी/कामकाज/कार्यपध्दती/अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी शासनातर्फे संचालक(वाणिज्य), महावितरण, यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली होती.
सदर समितीने दि.27 सप्टेंबर 2018 रोजी शासनास अहवाल सादर केलेला होता. तसेच दि.18 डिसेंबर 2018 रोजी मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या प्रकल्पास दिलेल्या मान्यता व समितीच्या शिफारसीनुसार महावितरण कंपनी दि.24 डिसेंबर 2018 रोजी उजनी धरण, जि. सोलापूर येथील जलाशयावर 1000 मे.वॅ. (10X100 मे.वॅ. समुह) तरंगता सौरऊर्जा प्रकल्पातून वीज खरेदीबाबत निविदा प्रकाशित केल्या आहेत. सदर स्पर्धात्मक निवड प्रक्रिया उलट बोलीसह करण्यात येणार आहे. सदर निविदेत तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासक किमान 100 मे.वॅ.क्षमता ते 1000 मे.वॅ. क्षमता स्थापित करु शकणार आहे आणि त्यासाठी समितीने उजनी धरण येथील जलाशयावर प्रत्येकी 100 मे.वॅ च्या 10 जागा निश्चित केल्या आहेत. जेथे प्रकल्प विकासक तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करु शकतो. प्रकल्प विकासकाला तरंगते सौरऊर्जा प्रकल्पासोबत विजेचे निषकासन करण्याची प्रणाली उभारायची आहे.
हे तरंगते सौरप्रकल्प उभारल्यानंतर एका वर्षात कमीतकमी 1 टीएमसी पाण्याचे बाष्पीकरण टाळून, पाण्याची बचत करता येणार आहे. तसेच जमीनीवर उभारलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या तुलणेत तरंगते सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यक्षमता 6%  ते 7% नी जास्त अपेक्षित आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही उजनी धरण लगतच्या शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
सदर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता आवश्यक तपशीलवार माहिती टीसीआयएल वेब पोर्टल व महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा लोकल ट्रेनचा प्रवास...

अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा लोकल ट्रेनचा प्रवास...


सीएसएमटी ते डोंबिवली असा एक तासाचा केला प्रवास...


मुंबई दि.२७ डिसेंबर – विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज संध्याकाळी लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली असा प्रवास केला.

डोंबिवली येथे एका कार्यक्रमाला कारने जाण्यासाठी ट्रॅफिकचा अडथळा येवू शकतो त्यामुळे कार्यक्रमाला वेळेत पोचता येणार नाही हा विचार करुन अजितदादा पवार यांनी लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते.
राज्यातील २० लाख ५० हजार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्यातील २० लाख ५० हजार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू


मुळ वेतनात २३ टक्के वाढ - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. २७: राज्यात २० लाख ५० हजार शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून याचा प्रत्यक्ष लाभ १ जानेवारी २०१९ पासून देण्यात येईल, साधारणत: सध्याच्या वेतनातील ही वाढ अंदाजे २३ टक्क्यांएवढी असेल अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस मदान, लेखा आणि कोषागारे प्रधान सचिव नितीन गद्रे उपस्थित होते.

ज्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात आला होता त्या सर्वांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षांची थकबाकीची रक्कम २०१९-२० पासून समान पाच हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये व प्रकरणपरत्वे उचित निवृत्तीवेतन योजनेत जमा करण्यात येईल. मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी पुढील आर्थिक वर्षापासून समान पाच हप्त्यांमध्ये रोखीने देण्यात येईल. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपची रक्कम ३८ हजार ६५५ कोटी रुपयांची आहे असेही ते म्हणाले. सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ जानेवारी २०१९ पासून देण्यात येणार आहे त्यामुळे शासनावर दरवर्षी २४ हजार ४८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त वित्तीय भार पडणार आहे. 

            विद्यमान वेतन संरचनेमध्ये ३८ वेतनश्रेणी होत्या. त्यातील ७ वेतन संरचनांचे विलिनीकरण करण्यात आले असून आता ३१ वेतनश्रेण्या ठेवण्यात आल्याचे सांगून वित्त मंत्री पुढे म्हणाले की, बक्षी समिती समोर ३७३९ मागण्या नोंदवण्यात आल्या. या सर्व मागण्यांचा सर्वंकष विचार करून बक्षी समितीने खंड १ मध्ये ज्या शिफारसी केल्या होत्या त्याचा राज्य शासनाने किरकोळ बदलाने स्वीकार केला आहे.  सहाव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्याचे किमान निवृत्ती वेतन हे २८८४ रुपये होते ते सातव्या वेतन आयोगामध्ये ७५०० रुपये इतके झाले आहे. 

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ तीनदा
सातव्या वेतन आयोगामध्ये १०,२० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. सहाव्या वेतन आयोगामध्ये ते १२ आणि २४ वर्षे असे दोन लाभ मिळत होते.

ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांच्या मुळ निवृत्तीवेतनात सुधारणा
राज्यात १०० हून अधिक वयाचे ३६२ निवृत्तीवेतनधारक

श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  ८० ते ८५ वर्षे वयोगटातील निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुळ निवृत्तीवेतनात १० टक्के, ८५ ते ९० वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना १५ टक्के, ९० ते ९५ वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना २० टक्के, ९५ ते १०० वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांना   त्यांच्या मुळ निवृत्तीवेतनात २५ टक्के तर वय वर्षे १०० व त्यावरील निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मुळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  आनंदाची बाब म्हणजे १०० हून अधिक वय वर्षांच्या निवृत्तीवेतनधारकांची संख्या आजमितीस राज्यात ३६२ इतकी आहे असेही ते म्हणाले. 

उपदानाची मर्यादा वाढवून १४ लाख
राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरु असलेल्या सेवा निवृत्ती उपदानाची मर्यादा ७ लाखांहून दुप्पट वाढवत १४ लाख इतकी करण्यात आली आहे. ही रक्कम वाढवल्याने ३५८० कोटी रुपयांचा वार्षिक खर्च ७१६० कोटी इतका होईल असेही ते म्हणाले.

घरभाडे भत्ता
एक्स, वाय आणि झेड वर्गीकृत शहरांना किमान घरभाडे भत्ता दर अनुक्रमे २४, १६, ८ टक्के आहे तो आता किमान अनुक्रमे ५४००, ३६०० आणि १८०० रुपये राहील.  २५ टक्क्यांची महागाई भत्त्याची मर्यादा जेंव्हा ओलांडली जाईल त्यावेळी घरभाडे भत्त्याचे दर २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के इतके होतील. तसेच ज्यावेळी ५० टक्क्यांची महागाई भत्त्याची मर्यादा ओलांडली जाईल तेंव्हा घरभाडे भत्त्याचे दर ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के होतील.  राज्य शासनाने याप्रमाणे केंद्र शासनाच्या धोरणानुसार १ जानेवारी २०१९ पासून घरभाडे भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अंशकालीन कर्मचारी
अंशकालीन कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात कमीत कमी ६०० व जास्तीत जास्त १२०० वेतन मिळत होते ते आता अनुक्रमे १५०० ते ३५०० असे करण्यात आले आहे. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील वाढीव वेतनाचे उदाहरण सांगतांना ते म्हणाले की ड वर्ग कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात किमान ५७४० रुपयांचे मुळ वेतन मिळत होते ते आता १५००० इतके होईल तर क वर्ग कर्मचाऱ्यांचे किमान ७ हजार रुपयांचे मुळ वेतन १८००० इतके होईल.  याप्रमाणेच किमान निवृत्तीवेतन ही २८८४ रुपयांवरून वाढून ७५०० रुपये इतके होईल असेही ते म्हणाले.

राज्यावरील कर्जाचे प्रमाण कमी झाले
राज्याचे महसूली उत्पन्न चांगले असून स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत राज्यावरील कर्जाचे प्रमाण २५.५ टक्क्यांहून कमी होऊन ते १६.५ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे राज्य कर्जबाजारी होत आहे असे म्हणणे योग्य आणि वस्तुस्थितीदर्शक नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन
एकूण स्थुल राज्य उत्पन्नामध्ये वेतन, सेवानिवृत्तीवेतनावरील खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न राज्य शासनाने वेळोवेळी केला आहे. सातव्या वेतन आयोगाने या खर्चात थोडी वाढ होत असली तरी राज्याचे उत्पन्न वाढवण्यामध्ये कर्मचारी अधिक योगदान देतील आणि राज्यावर येणारा वित्तीय ताण दूर करतील असा विश्वास वाटत असल्याचे सांगून त्यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उत्तम कामातून राज्याच्या विकासात अमूल्य योगदान देण्याचे आवाहन केले.

सामुहिक रजा आंदोलन मागे घ्यावे
सातव्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांची मागणी शब्द दिल्याप्रमाणे जानेवारी २०१९ पासून देण्याचे राज्य शासनाने मान्य करत निर्णय देखील घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांवर शासन अभ्यास करत आहे त्यामुळे येत्या ५ जानेवारी २०१९ रोजीचे सामुहिक रजा आंदोलन कर्मचारी- अधिकाऱ्यांनी करू नये, मागे घ्यावे असे आवाहन देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. 
देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक

देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक


न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळली


प्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या सुमारास देवेगांव शिवारात पुन्हा एक एक्कर उस, आणि बैलगाडी जळून शेतक-याचे मोठे नुकसान झाले. वेळीच पाथरी न प चा अग्नीशमन बंब पोहचल्याने मोठी हानी टळली.
बोरगांव येथील शेषनारायण आप्पाराव बेंडकर यांचा देवेगाव शिवारात तीन एक्कर उस असून गुरूवारी पावने चार वाजता विज तारांचे घर्षन झाल्याने या उसाला आग लागली. या वेळी अजुबाजूचे शेतकरी आणि पाथरी न प च्या अग्नीशमन बंबाने ही आग तात्काळ आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत एक एक्कर उसा सह लाकडी गाडी आणि त्यातील दोन खताचे पोते जळाले होते मात्र या ठिकाणी या शेतक-यां सह इतरांचा उर्वरीत सहा एक्कर उस वाचवण्यान न प अग्नीशमन बंबाला यश आले. यात जवळ पास साठ टन उसा सह खत,आणि लाकडी गाडी असे सव्वा लाखावर नुकसान झाले आहे. या वेळी माजी उप सभापती माऊली गलबे यांच्या सह देवेगाव ग्रामस्थ आणि न प अग्निशमनचे जवान खुर्रम खान, शेख शेरु, बळीराम गवळी यांनी मोठे परिश्रम घेतले.
अन मिळाला 333 युवकांना रोजगार

अन मिळाला 333 युवकांना रोजगार

  • किशोर जोरगेवाराचा संघर्ष 
  • युवकांनी मानले जोरगेवारांचे अभार, 
  • वेकोलीत मायनींक सरदार म्हणून होणार रुजू

चंद्रपूर- किशोर जोरगेवार यांनी नगापूर येथील सीएमडी कार्यालर्यावर केलेल्या आंदोलना नंतर वेकोली प्रशासनाने रिक्त असलेल्या मायनींग सरदार पदाच्या 333 जागा भरल्या आहे. त्यामुळे चंद्रपूरातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. या युवकांनी आज किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात जोरगेवार यांची भेट घेऊन आभार मानले.
मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाने मायनींक सरदार पदाच्या जागा रिक्त ठेवल्या होत्या. त्यामुळे मायनींक सरदार पदाचे महागडे शिक्षण घेतलेल्या युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले होते. या युवकांनी किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपली व्यस्था मांडल्या नंतर संप्टेबर महिण्यात किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील सीएमडी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेवून एका महिन्याच्या आत या रिक्त जागा भरण्याचे आश्वासन वेकोली प्रशासनाकडून देण्यात आले होते. एका महिण्याच्या आत वेकोली प्रशासनाने आश्वासनाची पुर्तता करत या रिक्त जागा भरण्याबाबतची जाहिरात प्रसिध्द केली. त्यामुळे आज चंद्रपूरातील शेकडो युवकांना रोजगार मिळाला आहे. रोजगार मिळालेल्या युवकांनी आज किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात येवून जोरगेवार यांचे अभार मानत आर्शिवाद घेतला. यावेळी किशोर जोरगेवार यांनी वेकाली प्रशासनाचे अभार मानले तसेच वेकोलीमध्ये आजही अणेक पदे रिक्त ते पदेही तात्काळ भरावेत अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.
जिल्हा  परिषद कक्ष अधिकाऱ्यांना मारहाण

जिल्हा परिषद कक्ष अधिकाऱ्यांना मारहाण


मनशिशिसेनेचा तीव्र निषेध 


वाडी (नागपूर ) /अरूण कराळे : -
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तथा कक्ष अधिकारी रमेश हरडे यांना कोणतेही कारण नसतांना धुडगूस घालून सोमवार २४ डिसेंबर रोजी मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या तातडीच्या सभेत तीव्र निषेध करण्याचा ठराव पारित करण्यात आला.
जिल्हा परिषद मध्ये सत्तापक्ष असलेल्या राजकीय नेत्याने सामंजस्याने चर्चा करून समस्या सोडविणे आवश्यक असतांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून राजकीय स्टंटबाजी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रकार असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्वाण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी व्यक्त केले.
शालेय पोषण आहार हा शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांच्या जबाबदारीचा विषय असून दूषित अन्नाचे नमुने शाळेत सील करून अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवून पोलीस कारवाई करता आली असती मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करण्यात आली आहे.सभेला संजय चामट, मनोज घोडके, दिपचंद पेनकांडे, चंद्रकांत मासुरकर, प्रकाश कोल्हे, गुणवंत इखार, प्रवीण मेश्राम, मोरेश्वर तडसे, वामन सोमकुवर, अरविंद आसरे, अशोक डहाके, तुकाराम ठोंबरे, श्रीराम वाघे, हरिश्चंद्र दहाघाणे,प्रदीप दुरगकर, रामू नखाते, देविदास काळाने, ललिता रेवतकर, नितीन किटे, जावेद शेख, अनिता गायधने, कांचन मेश्राम, भावना काळाने, कल्पना व्यास दषोत्तर इत्यादी उपस्थित होते.
सदर बैठकीत बुधवार २६ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्वाण शिक्षक शिक्षकेत्तर सेने कडून करण्यात आले आहे.