সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 27, 2014

मोहाच्या झाडावर बिबट्याची दोन पिल्ले

मोहाच्या झाडावर बिबट्याची दोन पिल्ले





चिमूर तालुक्यातील नेरी जवळील रामपूर जंगल परिसरातील शेतशिवारात मोहाच्या झाडावर शनिवारी सकाळी बिबट्याची दोन पिल्ले आढळली, हे दृश्य बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती

Friday, July 25, 2014

समाजमंदिरे ठरली शोभेची वास्तू

समाजमंदिरे ठरली शोभेची वास्तू

गावातील सर्वसामान्य नागरिकांना विविध उपक्रमासाठी बांधण्यात आलेल्या समाजमंदिराची सध्या दुरवस्था झाली आहे. हे भवन ग्रामपंचायतीला हस्तांतरण केले जाते. पण, मात्र, देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे.
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या वस्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सिमेंटच्या रस्ता, बांधकाम, पिण्याचे पाणी, गटारे आणि समाजभवन बांधण्याचे शासनाचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून या योजना राबविल्या जातात. पण, समाजभवनाचा उपयोग योग्य तऱ्हेने होत नाही. परिणामी शासनाचा पैसा वाया जात असल्याचे दृश्‍य ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांजवळ जागा अपुरी असते. आर्थिक परिस्थितीमुळे पडक्‍या झोपड्यात त्यांना वास्तव्य करावे लागते. आपत्कालीन परिस्थितीत किंवा काही कार्यक्रम करायचे झाले तर मोकळी जागा मिळत नाही. पैसा खर्च करून मोठ्यामोठ्या किमतीचा सभागृह ते घेऊ शकत नाही. याचा विचार करून शासनाने गावोगावी समाजभवन बांधून गावकरी व गरिबांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, भवनाची देखरेख ठेवणारी व्यवस्था असती तर या समाजभवनाचा उपयोग झाला असता. देखरेखीकरिता येणार भुर्दंड सहन करण्यास ग्रामपंचायत तयार होत नाही. काही समाजमंदिरावर विशिष्ट समुदायांच्या लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते. तर, काही ठिकाणी भवनाचा वापर व्यावसायिक कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यासाठी गावातील ग्रामस्थांची देखरेख समिती असणे गरजेचे आहे. त्या भवनाच्या नियोजनासाठी काही नियमही तयार करणे आवश्‍यक आहेत.

Wednesday, July 23, 2014

मोबाईल दुकान फोड्यांची 'X gang'

मोबाईल दुकान फोड्यांची 'X gang'

चंद्रपूर जिल्ह्यात अवतरली आहे मोबाईल दुकान फोड्यांची 'X gang'. बल्लारपूर शहरात या 'X gang' ने एक दोन नव्हे तर तब्बल ६ लाखांचे मोबाईल लंपास केले आहेत. दुकान फोडल्यावर धाडसाने त्याजागी 'X gang' लिहून चोरट्यांनी पोलीसाना आव्हान दिले आहे. पोलिस मात्र या प्रकारावर मौन आहेत.

Sunday, July 20, 2014

कर्मवीर पुरस्कार घोषित

कर्मवीर पुरस्कार घोषित

प्रकाश शर्मा, किसनराव बोंडे यांना कर्मवीर पुरस्कार घोषित
चंद्रपूर - चंद्रपूर -गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणाèया कर्मवीर पुरस्काराची घोषणा करण्यात आली अशुन यावर्षी जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश शर्मा आणि गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार किसनराव बोंडे गुरूजी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा दिलेल्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ पत्रकारांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा कर्मवीर पुरस्कार दरवर्षी सन्मानपुर्वक दिला जातो. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मान राशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार १ ऑगस्ट रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित समारंंंंंंंंंभात दिला जाणार आहे.

Friday, July 11, 2014

नागपूर जिल्ह्यात 31 टक्केच "गावकरी'

नागपूर जिल्ह्यात 31 टक्केच "गावकरी'

रोजगारासाठी तरुण शहरात : ग्रामीण भागात मूलभूत सुविधाच नाहीत 

 देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जुलै 2014 

नागपूर- 46 लाख 53 हजारांहून अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यातील तरुण रोजगारासाठी नागपूर आणि शहरी भागात दाखल झाल्याने ग्रामीण भागातील लोकसंख्या केवळ 31 टक्केच उरली आहे. त्यानुसार ग्रामीण लोकसंख्या 14 लाख 74 हजार इतकी आहे. रोजगाराचा अभाव असल्याने खेडी ओस पडू लागली आहेत.

Thursday, July 10, 2014

नागपूर

नागपूर

संत्रा उत्पादकांवर पावसाचे संकट
जिल्ह्यात 25 हजार 259 हेक्‍टरमध्ये संत्रा बागा

नागपूर, ता. 27 : महिनाभरानंतर उशिरा आलेल्या पावसाचा परिणाम संत्रा पिकावर झाला असून, उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
जूनच्या मृग नक्षत्रात पहिला पाऊस झाल्याननंतर संत्रा बागेत बहर येतो. यंदा जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली. उशिरा का होईना आलेल्या पावसामुळे संत्रा पिक फुलण्याची आशा होती. मात्र, चार दिवस सतत पाऊस राहिल्याने संत्रा झाडांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण 25 हजार 259 हेक्‍टरमध्ये संत्रा बागा आहेत. गेल्यावर्षी एक लाख 20 हजार 660 मेट्रीक टन संत्रा उत्पादन झाले होते. गेल्या काही वर्षांपासून मोसंबी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. आजघडीला मोसंबीचे क्षेत्र 4 हजार 457 हेक्‍टरवर आहे. यातील तीन हजार 388 हेक्‍टरमध्ये उत्पन्न होऊ शकते. गेल्यावर्षी 26 हजार 732 मेट्रिक टन मोसंबीचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार
यंदाच्या पावसाच्या लपंडावामुळे बहर गळला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाली होती. यंदा उशिरा झालेल्या संततधार पावसामुळे संत्र्याचा अंबिया बहार नष्ट झाला. आपतकालिन स्थितीत कृषी विभागाने उपाययोजना आखणे सुरू केले आहे. तालुकास्तरावरील कृषी अधिकारी गावागावात जावून पिकाची पाहणी करीत आहेत. 
----------------------------------------------------------
केदारपुरात दोन शिक्षकांचा "एकच प्याला'!

शुक्रवार, 11 जुलै 2014 -

दुपारी बारापर्यंत विद्यार्थी ताटकळत; स्वयंघोषित सुटी जाहीर 

नागपूर- बुधवार वेळ सकाळी दहाची.. सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानात गोळा झाले.. साडेदहा.. अकरा...साडेअकरा...बारा वाजले... तरीही गुरुजींचा पत्ता नाही. अखेर साडेबाराला दोन्ही गुरुजी अवतरले ते तर्र होऊनच..! क्षणभर थांबले अन्‌ सुटी जाहीर करून मदतनीस महिलेला शाळा बंद करण्यास सांगितले. लगेच दुचाकी सुरू करून दोघेही मद्याचा "अनुशेष‘ पूर्ण करण्यासाठी क्षणात नजरेआड झाले... 
साधनाताई आमटे यांच्या आत्मचरित्रावर "समीधा‘ चित्रपट

साधनाताई आमटे यांच्या आत्मचरित्रावर "समीधा‘ चित्रपट

"आनंदवनच्या माउली‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय साधनाताई आमटे यांच्या आत्मचरित्रावर आधारित "समीधा‘ हा चित्रपट काढण्यात येणार आहे. आज, बुधवारी साधनाताईंच्या तिसऱ्या स्मृतिदिनी या चित्रपटाचा मुहूर्त आनंदवनातील श्रद्धावनात पार पडला.

Wednesday, July 02, 2014

वेगळय़ा विदर्भाचे आंदोलन जोमाने करणार -अँड. चटप

वेगळय़ा विदर्भाचे आंदोलन जोमाने करणार -अँड. चटप

 चंद्रपूर-खनिज, पाणी व वनसंपदेने समृद्ध असलेल्या विदर्भाने संपूर्ण राज्याच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तरीही शासनाच्या वतीने या भागाच्या विकासासंदर्भात कुठलेही ठोस पाऊले अनेक वर्ष उचलल्या जात नसून येथील तरुणाला रोजगारासाठी महानगराचाच मार्ग अवलंबवावा लागत आहे. तसेच येथील उद्योगधंदे, शेती नष्ट होण्याच्या मार्गावर असून येथील खनिजसंपत्तीचा वापर देशातील उद्योगधंद्याना चालना देण्यासाठी वापरल्या जात आहे. यासंदर्भात शासनाला अनेकदा निवेदन देण्यात येऊनही शासन याबाबत अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक जोमाने करण्यात येणार असून यासाठी विदर्भ राज्य आदोलन समितीची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली असून पंतप्रधान व गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आल्याचे समितीचे संपर्क प्रमुख अँड. वामनराव चटप यांनी आज मंगळवारी र्शमिक पत्रकारसंघात आयोजित पत्रपरिषदेत सांगीतले.
१९0 डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गुंडाळला

१९0 डॉक्टरांनी स्टेथोस्कोप गुंडाळला

आरोग्यसेवा विस्कळीत : जिल्हा सामान्य रुग्णालयात दिले धरणे

चंद्रपूर: अस्थायी वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवा समावेश करा, वैद्यकीय अधिकार्‍यांचे सेवा नवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे, २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना पूर्वलक्ष लाभ द्यावा, बीएएमएस वैद्यकीय अधिकार्‍यांचा पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामे दिले असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धरणे दिले. दरम्यान आंदोलनामुळे जिल्हातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट

सोयाबीनचा मोडा : कपाशी जमिनीतच करपण्याची शक्यता
चंद्रपूर: जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पाण्याअभावी साडेचार लाख हेक्टर शेती यंदा धोक्याच्या उंबरठय़ावर आहेत. मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळाने कोलमडून गेलेला शेतकरी यंदा कोरड्या दुष्काळाने होरपळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.