সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 16, 2017

ऊर्जामंत्र्यांवर ITI चे शिकाऊ उमेदवार नाराज

ऊर्जाविभागात काम करणाऱ्या शिकाऊ उमेदवार बोनस पासून वंचित; विद्यार्थ्यांचे मंत्रीमहोदयांनी पत्र:सोशल मीडियावर व्हायरल 
 प्रति,
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब
(ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य)

विषय :ऊर्जाविभागात काम करणाऱ्या शिकाऊ उमेदवार बोनस पासून वंचित ठेवल्या बाबद
महोदय,

 ऊर्जामंत्रालया अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना १३५०० रुपये दिवाळी बोनस स्वरुपात मिळाले मात्र त्यांच्या सोबत वर्षभर राबराब शिकाऊ उमेद्वारांना मात्र सरकारने ठेंगा देत त्यांच्या तोंडाला पाने  पुसली आहे,सवाल असा आहे की वर्षभर काम करणारे विद्यार्थ्यांचे काही अस्तित्व नाही का?वर्षभर राबवून घेणाऱ्या या मुलांना विद्युत सहाय्यकांना मिळणाऱ्या बोनसच्या तुलनेत कमीत कमी 50 टक्के तरी दिवाळी बोनस द्यायला पाहिजे होता मात्र त्यांना दिवाळीच्या बोनस पासून दूर ठेवण्यात आले.सध्या महाराष्ट्रात जनरेशन,ट्रांसमिशन,आणि डिस्ट्रीब्यूशन या तिन्ही कंपनीत कर्मचाऱ्यांची चांगलीच कमतरता आहे. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात मदत व्हावी व नव कार्यक्षम विद्यार्थी कुशल कामगार विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी सरकारने या विद्यार्थ्याना कंपनीत प्रशिक्षण दिले जाते मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता बघता या शिकाऊ विद्यार्थ्यावर जास्तीच्या कामाचा बोजा लादन्यात आला आहे.त्यामुळे या शिकाऊ विद्यार्थ्यांची मानसिकता ढसाळत आहे.यांच्या कडून ट्रेनिंग (अप्रेंटिस)च्या नावाखाली  चांगलाच छळ केला जात आहे.

या विद्यार्थ्याना शिकविणीचा लाडू देऊन मंकी पेट्रोलिंग,ग्राउंड पेट्रोलिंग,ट्रि कटिंग,आउटेज सारख्या गोष्टि झाल्याच पाहिजे.ऑफिस वर्क,सबस्टेशन वर्क झालाच पाहिजे असा दबाव आनला जातो,त्यामुळे हे शिकाऊ विद्यार्थी स्वताचा जीव धोक्यात घालून हे सर्व कामे करीत आहे.मात्र दिवाळी सारख्या सनाला त्यांना कमीत कमी तरी बोनस मिळाच पाहिजे होता मात्र या शिकाऊ विद्यार्थ्यांकडे कोनाचेच लक्ष नाही.कमी मॅन पॉवर असतांना ज्यांच्या जीवावर काम काढून घेतला जात आहे त्यांच्याच तोंडाला या सरकारने पाने पुसली आहे.

यंदाच्या दिवाळीत राज्याच्या वीज कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्या गेली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांच्या सुमारे ७७ हजार नियमित कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली

यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एक हजार रूपयाची वाढ करीत ही रक्कम १२ हजार ५०० रूपयावरुन यावर्षी १३ हजार ५०० रुपये केली आहे. त्याच बरोबर सुमारे ९,००० विद्युत सेवक किंवा सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी ६ हजार रुपये बोनस मिळाला होता. त्या कर्मचाऱ्यांना यावर्षी ७ हजार ५०० रुपये इतका बोनस मिळणार आहे.

आता राहिला प्रश्न फक्त या तिन्ही कंपनीत काम करणाऱ्या शिकाऊ उमेद्वारांचा एका जिल्ह्यात जवळपास 40 शिकाऊ उमेद्वार या कंपनीत कार्यरत असतील राज्यभरात जवळपास 1500 ते 2000 विद्यार्थी या कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत आहेत.तेव्हा सगद्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जात असतांना फक्त स्वताचा जीव धोक्यात घालून हे सर्व कामे करणाऱ्या विद्यार्थ्याना वगळने म्हणजे हा तर अन्यायच. जनरेशन सेक्शनमध्ये शिकाऊ उमेद्वाराला जास्त मानधन दिले जात  आहे.पारेषण आणि वितरणमध्ये काम करणाऱ्या शिकाऊ उमेद्वाराला अतिशय कमी मानधनात समाधान मानावे लागत आहे .मग दिवाळी सारख्या सनाला वर्षातुन एकदा बोनस जर दिला तर यात वाईट क़ाय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब.
आपण या राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रमुख आहेत,"सबका साथ सबका विकास" म्हणणाऱ्या पक्षाचे मंत्री आहेत आपण ईतर सर्व घटकाला खुश ठेऊन एक घटकाला वगडने म्हणजे "सबका साथ सबका विकास" होईल का ?
कृपया आपण या दिवाळी बोनस बद्दल शिकाऊ उमेद्वाराला देखील काही न काही प्रमाणात मदत कराल,त्यांच्या वाट्याला फूल नाही फुलची पाकळी नक्कीच दयाल अशी इच्छा बळगतो.


                                                                                      तुमच्याच विभागातील एक शिकाऊ उमेदवार
bawankule साठी प्रतिमा परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.