ललित लांजेवार
नागपूर : 2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त नागपूर येथील महाराज बागेत टाकावू वस्तूंपासून चरखा कलाकृती साकारण्यात आली. ही कलाकृती महाराज बागेतील मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. बागेत येणा-या लहान मुलांना गांधीजींचे कार्य व आधुनिकीकरणात लुप्त होत चाललेल्या चरख्याचे कार्य माहीत व्हावे, यासाठी जम्मू कश्मीर येथील प्रसिद्ध कार्टूनिस्ट तसेच निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट गोविंद सिंग राणा यांनी ही कलाकृती साकारली.
कलेचे ध्यान असणारे राणा सेवेत कार्यरत असताना वेगवेगळ्या कलाकृती साकारत होते. तेव्हापासून त्यांचे कलेवरचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले. मूळचे जम्मू कश्मीरचे असलेले राणा हे तेथील अर्ली टाइम्स समूहात सीनियर कार्टूनिस्ट देखील आहेत.
गोविंदसिंग राणा यांचा मुलगा हा नागपूर हवाई दलात कार्यरत आहे. सुट्टी असल्याने मुलाच्या आग्रहामुळे राणा नागपूर येथे आले. कलाकार असल्याने कलेचे महत्त्व दुसऱ्यांपर्यंत कसे पोचवता येईल इतकाच यांचा उद्देश होता.
नागपूर येथे आल्यावर त्यांना महाराजबागेत कापडाचा वापर करुण हत्ती, उंट, जिराफ यांची कलाकृती साकारणाऱ्या व आठ पेक्षा जास्त कलेमध्ये निपुण असणाऱ्या गणपत साखरकर यांच्याशी झाली. यातूनच चर्चा घडली व लालबहादूर शास्त्री व गांधी जयंतीचे औचित्य साधत ही कलाकृती तयार केली. सध्या या महाराजबागेत गर्दी असल्यामुळे ही गांधीजींची चरखा कलाकृती नागरिकांचे लक्ष वेधत आहे. लहान मूलं कुतूहलाने या कलाकृतीसमोर जाऊन सेल्फी देखील काढत आहेत. यात लायन्स क्लब यांचा देखील मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे या कलाकृतीला लागणारा संपूर्ण खर्च हा गोविंद सिंग राणा यांनी स्वखर्चाने केला आहे. टाकावूपासून आपण चांगली कलाकृती साकारू शकतो, हे राणा यांनी मुलांना आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.