चंद्रपूर /प्रतिनिधी:
नियमांचे पालन करा अशा सातत्याने सूचना देणारे पोलिसच कसे नियमाचे उल्लघंन करतात याचा चांगला नमूना चंद्रपूर करांना आज बसस्थानक परिसरत अनुभवला.
चंद्रपूर मिळालेल्या महितीनुसार चंद्रपूर शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी भर दिवसा एक महिला पोलिस कर्मचारी आपल्या खाजगी गाड़ीवरुन MH.34.BC.8660 गाड़ी ट्रिपल सीट जातांना दिसली. यात त्या गाडीवर असणारे एक महिला पोलिस कर्मचारी व मागे बसणाऱ्या दोन्ही युवतीनी आपल्या चेहऱ्यावर स्कार्प बांधला आहे. त्या गाडीचा कोणीतरी मागून पाठलाग करत आपल्या मोबाइल कॅमेरे फोटो काढला आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नियमानुसार दुचाकिने प्रवास करतांना ट्रिपल सीट प्रवास करू शकत नाही.हा कायद्याने गुन्हा आहे.हे माहित असून सुद्धा आम्ही पोलिस खात्यात आहोत आहोत आम्हाला कोणाची भीती नाही असा भ्रम बाळगणार्यांना सध्या सोशल मीडिया तिसरा डोळा म्हणून या घडामोडीनवर नजर ठेऊन असतो सध्या हा फोटो सध्या फेसबुक व्हाट्सएप यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात पोलीस चक्क ट्रिपल सीट जाताना दिसून येत आहे.
एखादा सामान्य व्यक्ती आपल्या गाडीवरून ट्रिपल सीट बसवून घेऊन जात असतांना जर तुम्ही पोलिसांना दिसलात तर पोलीस नक्कीच तुमच्यावर वाहतूक नियम भंगाची कारवाई करतात. मात्र या प्रकरणात कायद्याचे रक्षण करणारेच कायदे पायदळी तुडवीत असतील तर अशा पोलिसांवर यांचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करातील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.