चंद्रपूर/ प्रतिनिधी : बल्लारपूर - गोंडपिपरी मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहणाऱ्या ट्रेकला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश चौधरी व अधिकारी आडे यांनी ला दंड ठोठावला,ट्रक क्र एम एच २० सी टी ९५४५ हा ट्रक या मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करत होता,हा दंड का ठोठावण्यात आला या कारणावरून ट्रक चालक मिरझा लियाकत अनवर बेग वय (२४) रा. मोरमखेडा जिल्हा:औरंगाबाद,आणि आर.टी.ओ चे निलेश चौधरी व अधिकारी आडे यांच्यात वाद झाला.हा वाद चक्क पोलीस ठाण्यापरीयंत पोहचला.ट्रक ड्रॉयव्हरने बेग यांनी घडलेला किस्सा सांगत बल्लारपूर पोलीस ठाण्यात निलेश चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली,तर त्याच उलट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश चौधरी व अधिकारी आडे यांनी देखील ट्रक चालका विरोधात उलट तक्रार दाखल केली पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कलम ३२३ अन्वये अदखलपात्र गुन्हा तर ट्रक ड्रायव्हर वर ५०६ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकराची आज बल्लारपूर शहरात चांगलीच चर्चा होती.
ट्रकचालक व परिवहन अधिकारी यांच्यातला वाद पोहचला पोलीस ठाण्यात