वरोरा/चंद्रपुर:(ललित लांजेवार)
चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे-चंद्रपूर गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर शनिवारी पूर्ण झाली. या गाडीच्या स्वागतासाठी शनिवारी जिल्ह्याच्या विविध रेल्वेस्टेशनवर मोठ्या धुमधडाक्यात स्वागत देखील करण्यात आले.
मात्र ज्या ठिकाणी स्वागत होत होते त्याच ठिकाणी रेल्वेची सुरक्षा धोक्यात आनन्याचा अनुचित प्रकार देखील घडू शकला असता असाच एक धोकादायक स्टंट वरोऱ्यात रेल्वेस्टेशनवर
अतीउत्साही भाजप कार्यकर्त्यांनी केला.
दुपारच्या सुमारास वरोरा रेल्वेस्टेशनवर पुणे -काजीपेठ गाड़ी येताच गाडीच्या स्वागतासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं स्थानकावर उपस्थित होते.
मात्र इकडे स्वागत सुरु असतानाच त्याच रेल्वेस्टेशनच्या फ़लाटावर दुसरीकडे विस्पोटक असलेले फटाके देखील फोडन्याचा प्रताप वरोऱ्यातील काही अतीउत्साही भाजप
कार्यकर्त्यांनी केला आहे.
नियमानुसार रेल्वे स्थानक परिसरात कोणत्याही प्रकारची स्फोटके,ज्वलनशील पदार्थ, आणता येत नाही. मात्र या अतीउत्साही कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात चक्क रेल्वे फ़लाटावरच फटाक्याची माळ लाऊन आतिशबाजी केली.ज्यामुळे काही काळ रेल्वेची सुरक्षा धोक्यात आली होती.
एवढंच नाही चालकांची आरती करताना देखील चक्क इंजिनच्या दारात कापूर पेटवण्यात आला. या प्रकारामुळं रेल्वेगाडीची सुरक्षाच धोक्यात येऊ शकली असती. सुदैवानं काही अनुचित घडलं नाही. मात्र अतिउत्साहात कार्यकर्ते कसे वागतात, हे यानिमित्तानं दिसून आलं. विशेष म्हणजे यावेळी बड्या भाजपच्या मंडळीची इथं उपस्थिती होती.मात्र सगड़े स्वागतात आणि उत्साहात मग्न असल्याने ऐकालाही हा गंभीर प्रकार दिसला नाही, हे आश्चर्य आहे.माध्यमाच्या प्रतिनिधीने देखील या प्रकारबद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यास विचारपुस केली असता त्यांनी हात वर कल्याचे निदर्शनात आले.त्यामुळे अश्या रेल्वे प्रशासनाची सुरक्षा धोक्यात आनणाऱ्या कार्यकर्त्यांवर रेल्वे विभाग कोणती कारवाई करेल
याकड़े सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.