সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 21, 2010

सिनेजगातातिल चेहरे आणि मी

सिनेजगातातिल चेहरे आणि मी

 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली सोबत सकाळ परिवार
 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली आणि मी
 आस्करवारी - हरिशचंद्राची फाक्टोरी चे नायक नंदू माधव आणि अभिनेता मिलिंद गवली सोबत चर्चा करताना देवनाथ.
 हिंदी मराठी चित्रपटातील आघाडीच्या कलावंत रीमा लागु सोबत देवनाथ
                                                                            देवनाथ
                                            संगीतकार अशोक पत्की सोबत मी
अभिनेता मिलिंद गवली सोबत एक प्रसंग

Saturday, October 16, 2010

"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी'

"हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी'

कथानकाला न्याय देणारी मंडळी "स्टार'


सकाळ वृत्तसेवा

Saturday, October 16, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, vidarbha
चंद्रपूर - चित्रपट दोनच प्रकारचे असतात, एक अभ्यासू आणि बिगरअभ्यासू. क्‍लास आणि मास या दोघांनाही "हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी' तेवढाच आवडला. कारण, कार्य-कारण भावाने येणारी रंगसंगती यात जुळून आलेली होती. "स्टार'वगैरे ही संकल्पना मान्य नाही. कथानकाला न्याय देणारी मंडळी ही खरी "स्टार' असतात. यात पडद्यावरचे आणि पडद्यामागचे दोघेही आलेत, अशी प्रांजळ कबुली सिनेअभिनेता नंदू माधव यांनी दिली.
युनिसेफच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सिनेअभिनेते नंदू माधव आणि मिलिंद गवळी आज (ता. 15) चंद्रपुरात आले होते. त्यांनी "सकाळ' विभागीय कार्यालयाला भेट देऊन "सकाळ संवाद' या कार्यक्रमातून विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
ऑस्करचे भूत भारतीयांच्या मानगुटीवरून एकदाचे उतरले पाहिजे. आपण उगाच या पुरस्काराचा बाऊ करतो. प्रत्येक स्पर्धा वेगळ्या नजरेतून बघितली पाहिजे. "विहीर' चित्रपटाची बर्लिन महोत्सवातील रेड कार्पेटची बातमी गाजली नाही. मराठी चित्रपटांची आता वेगवेगळ्या पातळीवर दखल घेतली जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

Tuesday, October 12, 2010

Friday, October 08, 2010

Wednesday, October 06, 2010

40 दिवसांच्या बालिकेच्या नलिकेत अंगठी!

40 दिवसांच्या बालिकेच्या नलिकेत अंगठी!

चंद्रपूर - घरात बाळ जन्मल्याचा आनंदसोहळा सर्वत्र साजरा होत असताना नामकरण कार्यक्रमात बाळाच्या बोटातील अंगठी तोंडावाटे नलिकेत गेली आणि सर्व आप्तांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. अवघ्या 40 दिवसांच्या चिमुकल्या बालिकेच्या अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकलेली सोन्याची अंगठी डॉ. मंगेश गुलवाडे आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली. सायमा जमीर शेख असे या नुकत्याच नामकरण झालेल्या बालिकेचे नाव आहे.


मूळचे अहेरी येथील रहिवासी जमीर शेख यांच्या पत्नी श्रीमती कैसर शेख यांनी एका गोंडस बालिकेला जन्म दिला. तिच्या नामकरणाचा सोहळा 40 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी सिरोंचा येथील नातलग शेख रसूल यांच्या घरी आयोजिला होता. नामकरणानंतर तिच्या आजी-आजोबांनी सायमाला ही सोन्याची अंगठी भेट दिली होती. बोटात घातलेली अंगठी खेळत असताना अचानक तिच्या तोंडात गेली. त्यानंतर ती अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकून पडली. दरम्यान सायमाच्या बोटात अंगठी नसल्याचे पाहून आई कैसर शेख घाबरली. सर्वत्र शोधाशोध करीत असतानाच चिमुकल्या सायमाला ठसके येऊ लागले. यावरून अंगठी तिच्या गळ्यात असावी, असा प्राथमिक अंदाज बांधून आलापल्ली येथील रुग्णालयात तिला हलविण्यात आले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार एक्‍स-रे काढल्यानंतर नलिकेत अंगठी असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11ला चंद्रपूरला हलविण्यात आले. सर्वप्रथम बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्याकडे तपासणण्यात आले. मध्यरात्रीदरम्यान नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांच्याकडे तपासणी करण्यात आली. डॉक्‍टरांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कोणताही वेळ वाया जाऊ न देता एंडोस्कोपी सर्जरीच्या (दुर्बीण) साह्याने अवघ्या दीड तासाच्या शस्त्रक्रियेतून ही अंगठी बाहेर काढली. ही अंगठी वेळीच बाहेर निघाली नसती तर बालिकेच्या जीवाला धोका झाला असता, असे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मोनिका पिसे, सलिम तुकडी, रितिशा दुधे, सारिका गेडाम यांनी सहकार्य केले.