मुंबई- शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सलग 3 दिवस सुट्टया असल्यामुळे उशीर होत आहे. सोमवारपासून साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोमवारपासून खात्यात पैसे जमा होतील, असे देशमुख यांनी सांगितले. राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.