সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 30, 2014

'कॅल्शियम कार्बाईड' ने पिकविले जातात आंबे!

'कॅल्शियम कार्बाईड' ने पिकविले जातात आंबे!



 चंद्रपूर
बाजारातील फळ पिकविण्यासाठी व्यापार्‍यांतर्फे विषारी असलेल्या कॅल्शियम कार्बाईडसारख्या रासायनिक द्रव्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल आंबे रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात आले. ते बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच धाड घालून दोन व्यापार्‍यांकडून ६ हजार किलो आंबे व कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई आज गुरुवार (२९ मे)ला दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने स्थानिक व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
सध्या उन्हाळय़ाचे दिवस सुरू असून चंद्रपुरात नवतपाचे चटके सहन करावे लागत आहे. दुसरीकडे रासायनिक द्रव्याचा वापर करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. स्थानिक व्यापार्‍यांकडून उन्हाळय़ात आंबा या फळाचे सर्वाधिक विक्री होते. या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांनी रासायनिक द्रव्याचा वापर करून आंबे पिकविण्याचा प्रकार सर्रास सुरु केला आहे. हे आंबे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पिकवून शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला जात होता. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाला मिळताच त्यांनी आज दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शकील अहमद अब्दुल हमीद यांच्या शकील ग्रृप कंपनी नावाच्या दुकानात धाड टाकली. येथे जवळपास ३ हजार किलो आंबे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविण्यासाठी ठेवले होते. अधिकार्‍यांनी सर्व आंबे व आठ किलो कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त केले. याची किंमत जवळपास ४९ हजार ९७0 रु. आहे. यासोबतच याच परिसरातील अब्दुल मजिद अब्दुल अजित यांच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे एस.पी. नंदनवार, जी.टी. सातकर, एम.पी. चहांदे, एस.बी. हजारे, विठ्ठल अंदनकर, पोलिस निरीक्षक खराबे, मंगेश काळे, अरुण मोते, दौलत चालखुरे, अविनाश तुराणकर यांनी केली. ल्ल
गर्भपातासाठी लाच घेणार्‍या डॉ. उईकेंना अटक

गर्भपातासाठी लाच घेणार्‍या डॉ. उईकेंना अटक


चिमूर
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन उईके (३८) यांनी रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या एका महिलेकडून गर्भपात करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
तालुक्यातील खंडाळा येथील एक महिला लहान मुल असतानाच पुन्हा गर्भवती राहिली. त्यामुळे तिला गर्भपात करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले. तेव्हा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी २ हजार रुपयाची लाच मागीतली. ही बाब तिच्या पतीला न पटल्याने त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक साखरकर, प्रताप इंगळे, पोलिस काँस्टेबल विलास खनके, संतोष पुंडकर, अजय यादव, उत्तम दास यांच्या पथकाने आज गुरुवार (२९ मे)ला सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात सापळा रचला. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी पीडित महिलेच्या पतीकडून गर्भपात करण्याकरिता २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
या प्रकरणी पोलिस स्टेशन चिमूर येथे लाचलुचपत अधिनियम प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, १३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉ. नितीन उईके यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चिमूर शहरात स्त्रीभृणहत्या प्रकरणी एका खासगी डॉक्टरांचे रुग्णालय सिल करण्यात आले होते. त्यांच्या दवाखान्यातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते. या घटनेचा सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला असताना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आग

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आग


चंद्रपूर
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सहाव्या संचात कोल कन्व्हेअर बेल्टला आग लागली. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे औष्ण्कि केंद्रातील संच क्रमांक ५ व ६ मधील उत्पादन ठप्प झाले आहे. 
चंद्रपूर वीज केंद्रात आज गुरुवारी दुपारी २ वाजता सहाव्या संचातील बंकरपर्यंत वाहून नेणार्‍या कोल कन्व्हेअर बेल्टला अचानक आग लागली. मात्र, वीज केंद्रातील फायरिंग लाईननेच ही आग आटोक्यात आणण्यात आली. अध्र्या तासात पूर्णपणे नियंत्रणात आलेल्या या आगीत १00 मीटरचा बेल्ट पूर्णपणे जळून खाक झाला. अभियंते, तज्ज्ञांच्या तत्परतेने मात्र मोठी हानी टळली. ही आग अती उष्णतेमुळे लागल्याचा कयास बांधला जात आहे. जळलेला कन्व्हेअर बेल्टची दुरुस्ती येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाली असून, वीज निर्मितीत घट झाली आहे. आगीमुळे सर्वत्र धूर दिसून येत होता. दोन दिवसांपूर्वी ५00 मेगावॅट क्षमतेचे युनिट नंबर ५ सुरू झाले होते. जवळपास वीस दिवसापूर्वी युनिट नंबर ३ च्या टरबाईनमध्ये आग लागल्याने हे युनिट बंद ठेवण्यात आले.चालू आठवड्यात सर्व युनिट सुरळीत सुरू होत असतानाच आज पुन्हा आग लागल्याने दोन संच बंद पडून उत्पादनात घट झाली आहे. ल्ल

Tuesday, May 27, 2014

 प्रवासी कराबाबत लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री

प्रवासी कराबाबत लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री

ए स.टी.महामंडळावरील आर्थिक ताण कमी करणार : अजित पवार 

मुंबई :, (२७ मे, २०१४) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावरील (एस.टी.) आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रवासी करासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल; तसेच एस.टी. बसेसना पथकरातून वगळण्याबाबत सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नरेगाची नव्याने आखणी करावी

नरेगाची नव्याने आखणी करावी

एकनाथराव खडसे यांची केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. 27 :- नरेगा योजनेत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यायोजनेचा ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष फायदा व्हावा म्हणून नरेगाचा पुनर्विचारकरुन नव्याने आखणी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचेज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडेकेली. 
चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक योजनांसाठी 97 टक्के खर्च

चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक योजनांसाठी 97 टक्के खर्च

- पालकमंत्री संजय देवतळे

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना 2013-14 च्या खर्चास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपयोजना या चारही योजना मिळवून मार्च 2014 अखेर 97 टक्के खर्च झाला. पावसाळ्यापूर्वी गावपातळीवर ग्राम पंचायततर्फे नाल्यांची त्वरीत सफाई करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.

Monday, May 26, 2014

पदांसाठी भरती

पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2014 ही आहे.
पाचगांवातील दारू दुकानांना लागले सिल

पाचगांवातील दारू दुकानांना लागले सिल

महिलांच्या प्रयत्नांना यश
ब्रम्हपुरी - तालुक्यातील पाचगांव येथील दोन बियर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारीत झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दुकानांना सिल ठोकुन बंद करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील पाचगांव छोटयाशा गावात प्रथमेश व विनायका हे दोन बियर बार आरमोरी येथील दिलीप जेठमल मोटवानी व प्रशांत मनोहर मोटवानी यांचे मालकीची होती. या बारमुळे गावातील अनेक संसार दध्वस्त झाले, अनेक युवक दारूच्या व्यसनी लागले, महीलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले, ब्रम्हपुरी ते गडचिरोली हा महामार्ग असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असे असतांनाही मोटवानी यांनी नविन देशी दारू दुकान सुरू करण्याकरीता हालचाली सुरू केल्या. काही महीण्यापुर्वी महीलांनीच ग्रामसभेत नविन देशी दारू दुकानास परवानगी नाकारली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाचे माध्यमातुन दोन्ही दारू दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे केली. या मागणीकरीता श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व येथील सरपंच अरूण तिवाडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला त्यानुसार त्यानुसार संवर्ग विकास अधिकारी सानप यांचे अध्यक्षतेखाली 17 मे 2014 ला ग्रामपंचायतीचे आवारात महीला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत एकुण 145 महिला मतदारापैकी 104 महिलांनी 145 विरूध्द शुन्य मतांनी दारूबंदीचे बाजुन कौल दिला. यामुळे एकमताने दारूबंदीचा ठराव पारीत केला. ठराव पारीत झाल्यानंतरही महिला थांबल्या नाही व जिल्हाधिकारी यांना आदेश भेटुन आदेश काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी आदेश काढुन प्रथमेश व विनायका या दोन्ही बारला सिल ठोकले.

Sunday, May 25, 2014

काँग्रेस नेते बापू तलांडी यांची हत्या

काँग्रेस नेते बापू तलांडी यांची हत्या

गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनीच ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असून याविषीय अद्याप पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
आलापल्ली सिरोंचा मार्गावरील निर्मल गुडम येथे सकाळी ८ वाजता ही घटना घडली. येथील एक काँग्रेस कार्यकर्ता मोटर सायकलवरून जात असताना नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. या कार्यकर्त्याबद्दल आणखी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.  
गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Saturday, May 24, 2014

पद भरती

पद भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर - पद भरती 2014

लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31-May-2014 आहे. या मुदती नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत रोखीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी प्रिंट झालेल्या अधिकृत चलनाचाच वापर करावा. बँकेत चलान भरून आल्यानंतरच कृपया सविस्तर अर्ज भरावा.


संसदेत विविध पदांसाठी भरती

संसदेत विविध पदांसाठी भरती

भारतीय संसदेत विविध पदांसाठी भरती होणार आहे. लोकसभा सेक्रेटरीएटने काही रिक्त जांगासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार संसदेत इंटरप्रेटर ग्रेट – II, प्रिंटर आणि वेअरहाऊस मन या जागांची भरती होणार आहे.

इच्छूक उमेदवारांनी आधिक माहितीसाठी www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. उमेदवारांनी आपले अर्ज ३०.०६.२०१४ पर्यंत कुरीयर किंवा पोस्टाने पाठवावे.

इंटरप्रेटर ग्रेट– II या पदासाठी उमेदवाराने इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. तांत्रिक शिक्षणाशी निगडीत असा कॉमप्युटर कोर्स केलेला असावा. प्रिंटर या पदासाठी प्रिंटींग टेक्नालॉजीचा अधिकृत कोर्स किंवा इंग्रजी व हिंदी या भाषेतून पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. वेयरहाऊस मन या पदासाठी उमेदवार दहावी पास असावा किंवा प्रिंटीग टेक्नालॉजीचा ५ वर्षाचा कोर्स केलेला असावा.

या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष इतकी आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी काही राखीव जागा असून त्यांना वयोमर्यादा सरकारी नियमांनुसार शिथिलशम आहे. या पदांसाठी एक टायपिंग टेस्ट तसेच लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. ही परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतरच योग्य उमेदवारांना भरती केले जाणार आहे.
 माओवाद : नऊ जणांची निर्दोष सुटका

माओवाद : नऊ जणांची निर्दोष सुटका

'भ्रष्टाचार, सामाजिक विषमता, गरिबांचे शोषण यांसारख्या ज्वलंत विषयांवर लढा अथवा आवाज उठवणे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात गुन्हेगारी अथवा दहशतवादी कृत्य कसे असू शकते', असा जळजळीत सवाल गोंदियातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जे अस्मर यांनी केला. तसेच गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असलेल्या कथित नऊ माओवाद्यांची देशविघातक कारवायांच्या आरोपातून मुक्तता केली.

हंसराज अहिर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची हुलकावणी

हंसराज अहिर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची हुलकावणी


सोमवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यात कोळसा घोटाळा चव्हाट्य़ावर आणणारे भाजपचे खासदार हंसराज आहिर यांनाही संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र हंसराज अहिर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची हुलकावणी आली.

माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची ओळख झाली ती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यामुळे. आता हंसराज अहिर यांच्यामुळे चंद्रपूर चे नाव देशाच्या राजधानीत पोहोचणार अशी आशा होती. बालपणी दुधाचा व्यवसाय करायचे. वडील गंगाराम अहिर हे वैद्यकीय क्षेत्रात होते. त्यामुळे त्यांनी समाजसेवा हे व्रत अंगिकारले.  खासदार हंसराज अहिर म्हणजे भाजपचा ओ बी सी चेहरा असून, देशात गाजलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कोळसा खाणी वितरण घोटाळ्याचा पर्दाफाश त्यानी केल्याने ते अचानक प्रकाशझोतात आलेत. काँग्रेसच्या तिकिटावर कुणालाही उभे केले तरी तो निवडून येणार ही काँग्रेसजनांची खात्री भाजपच्या हंसराज अहिर यांनी खोडून काढली. मात्र मंत्री पदी संधी न मिळाल्याने घोर निराशा झाली आहे 
धमकी देत शारीरिक शोषण

धमकी देत शारीरिक शोषण

चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर ग्रामपंचायतीत कार्यरत एका विधवा कर्मचारी महिलेचे वरिष्ठ लिपिकाने नोकरीवरून काढण्याची धमकी देत तब्बल ८ वर्षे शारीरिक शोषण केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अखेर हिंमत करून या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून आता आरोपी लिपिक पोलिस कोठडीत आहे.

Friday, May 23, 2014

'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'मध्ये 'हेमलकसा'ची निवड

'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'मध्ये 'हेमलकसा'ची निवड


डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यावर आधारित  
समृद्धी पोरे यांच्या चित्रपटाला समारोपाचा विशेष बहुमान
 
मराठी सिनेमा जागतिक पातळीवर गौरविला जात असून निरनिराळ्या प्रतिष्ठीत फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होतोय. याच दिशेने निर्मात्या- दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांच्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या बहुचर्चित मराठी चित्रपटाची व 'हेमलकसा' या हिंदी सिनेमाची घौडदोड सुरु आहे. प्रदर्शनाआधीच देश-विदेशातील चित्रपट समीक्षक आणि जाणकारांचा या सिनेमांना उत्तम प्रतिसाद मिळत असून नुकतेच त्यांच्या हेमलकसा या हिंदी चित्रपटाची 'लंडन इंडियन फिल्म फेस्टीवल'च्या  स्पर्धा विभागात निवड झाली आहे.

Thursday, May 22, 2014

बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करावी - प्रवीणसिंह परदेशी

बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करावी - प्रवीणसिंह परदेशी

नागपूर : जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी विशेषत: ग्रामीण भागामध्ये जागरुकता निर्माण होत आहे. जैवविविधता संवर्धन ही काळाची गरज असून या मंडळाला पशूसंवर्धन तसेच कृषी विभागाकडून आर्थिक मदत जाहीर करावी व बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करावी, असे आवाहन प्रधान सचिव (वने) प्रवीणसिंह परदेशी यांनी केले.
 खरीप आढावा

खरीप आढावा

खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या 



चंद्रपूर : खरीप हंगामासाठी खते व बियाणे मुबलक उपलब्ध असले तरी शेतकरी कृषी निविष्ठांची उचल करतात त्या काळात खते व बियाणांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री संजय देवतळे यांनी कृषि विभागाला दिल्या.
केंद्रीय गुप्तवार्ता विभागात भरती

केंद्रीय गुप्तवार्ता विभागात भरती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तवार्ता विभागात विविध जागांसाठी भरती होणार आहे. गुप्तवार्ता विभागात स्वीय सहायक, कनिष्ठ गृप्तवार्ता अधिकारी(तांत्रिक) या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. स्वीय सहाय्यक पदासाठी उमेदवार बारावी पास असणे आवश्यक असून त्याला टायपिंग येत असावे. तर कनिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी या पदासाठी मॅट्रिक असण्यासोबतच रेडिओ टेक्निशिअन अथवा तत्सम आयटीआय केलेला असावा. या पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे इतके आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा सरकारी नियमानुसार शिथिलशम असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत.
अधिक माहितीसाठी www.mha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या मानधन घोटाळयाची तक्रार

डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या मानधन घोटाळयाची तक्रार

श्रमिक एल्गारने मूल पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीची चौकशी केली जाईल असे मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री. ताजणे यांनी सांगीतले.
राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव, माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव यांचेसह 8 गैरअर्जदाराचे विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ई—पीआरआय योजनेच्या कामात सुमारे 500 करोड रूपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला होता. या घोटाळयात सहभागी असलेल्या गैरअर्जदाराचे विरोधात आज मूल पोलिस स्टेशनला श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार यांनी लेखी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी ही तक्रार दाखल करवून घेत चौकशी करण्यात येईल असे सांगीतले.
दोन तलाठी निलंबित

दोन तलाठी निलंबित

गोंडपिपरी: शासकीय कार्यात अनियमिततेचा ठपका ठेवून गोंडपिपरी तालुक्यातील दोन तलाठय़ांना आज २१ मे रोजी निलंबित करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागातील कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Wednesday, May 21, 2014

२३व २४मे रोजी धान्य महोत्सव

२३व २४मे रोजी धान्य महोत्सव

विविध धान्य : १0८ शेतकर्‍यांनी केली नोंदणी

चंद्रपूर: उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित २३ व २४ मे रोजी चंद्रपूर येथे धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राऊंड येथे होणारा हा महोत्सव कृषी व पणन, आत्मा, आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, नंदकुमार घोडमारे व संजय काचोळे यावेळी उपस्थित होते.
६१५ ग्राम पंचायती बक्षिसास पात्र

६१५ ग्राम पंचायती बक्षिसास पात्र

समृद्ध ग्राम योजना :  विकासात्मक कामाला मिळणार निधी                 

चंद्रपूर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत ६१५ ग्रामपंचायती बक्षिसास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मोठय़ा प्रमाणावर निधी शासनाकडून दिला जाणार आहे.

Tuesday, May 20, 2014

वेश्यावस्तीतून सोडविण्यात पोलीसांना यश

वेश्यावस्तीतून सोडविण्यात पोलीसांना यश


घरकामासाठी आंध्रप्रदेशातील वारंगल येथून चंद्रपुरात फसवून आणल्या गेलेल्या गरीब कुटुंबातील ४ मुलीना शहरातील एका वेश्यावस्तीतून सोडविण्यात पोलीसांना यश आले आहे. यातील एका पिडीत मुलीने वेश्या अड्ड्यावरून पळून जात लगतच्या वस्तीत आश्रय घेतल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने हे अभियान पूर्णत्वास नेले. पोलिस आता महाराष्ट्र-आंध्र दरम्यान उघड झालेल्या मुली पळवून वेश्याव्यवसायात लावणा-या टोळीच्या मुळाशी जाणार आहे.
डि.एड बेरोजगार पोलिस भरतीला

डि.एड बेरोजगार पोलिस भरतीला

काही वर्षापूर्वी डि.एड बी.एड झाला म्हणजे शिक्षकांची हमखास नोकरी. अलिकडे अध्यापक महाविद्यालयाच्या सुळसुळाटांमुळे डीएड झालेल्या तरुणांची मोठी फौजच निर्माण झाली. नोकरी मिळेनाशी झाली म्हणून पदरी पडेल, ते काम करण्याची त्यांची तयारी आहे. कमी पगारावर काम करणारे भावी शिक्षक हे नवीन रोजगार म्हणून पोलीस भरतीच्या तयारीत आहेत. तर काही शिक्षकांनी तर शिक्षकाच्या नोकरी बरोबर किराणा दुकान तसेच पानटपरी सुध्दा चालु केली आहे तर काही खासगी वाहनांवर दैनंदिन मजुरीवर चालकाची ही नोकरी पत्करली आहे.
वर्धा वीज कंपनीची वीज विक्रीविना !

वर्धा वीज कंपनीची वीज विक्रीविना !

रिलायन्स कंपनीशी पुन्हा करार करण्यासाठी आयोगाकडे दाद !

नागपूर,  राज्यात गेल्या काही महिन्यात मुबलक वीज उपलब्ध असताना राज्यातील पहिली खासगी वीज कंपनी असलेल्या वरोèयातील वर्धा वीज कंपनीची वीज विकायची कोणाला असा प्रश्न पडला आहे. रिलायन्स समूहासोबत झालेला करार संपल्याने कंपनीकडे असलेल्या विजेसाठी कोणीच ग्राहक नाही. त्यामुळे आता कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाद मागत पुन्हा रिलायन्स समूहाने कंपनीसह करार करावा अशी विनंती आयोगाला केली आहे.
जमीन प्रकरणात शेतक-यांना अटक

जमीन प्रकरणात शेतक-यांना अटक

सावली - किसाननगर येथील जमीनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांसह 38 शेतक-यांना सावली पोलीसांनी अटक केली.
कामगारांना उद्योजक दाखवून केला ५०० कोटींचा महाघोटाळा !

कामगारांना उद्योजक दाखवून केला ५०० कोटींचा महाघोटाळा !


महाऑनलाईन लिमिटेडचंद्रपूर - संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींना संगणकीकृत करून थेट राज्याच्या राजधानीला जोडण्याचा उपक्रम ई-पंचायत अंतर्गत करण्यात आला. असे असताना राज्यातील ३२ हजार बेरोजगार युवकांना या माध्यमातून काम मिळाले. शासनाने यासाठी डाटा कन्सलटन्सी यासोबत भागिदारी केली आणि त्यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आले. या अध्यादेशानुसार जो पगार डाटा एंट्री ऑपरेटरला मिळावयास पाहिजे, त्या तुलनेत अर्धा पगार देऊन खाजगी कंपन्या काम भागवित आहेत. एवढेच नव्हे तर या कामगारांना कामगार कायद्यांतर्गत दाद मागता येऊ नये, म्हणून शक्कल लढविण्यात आली असून, या कामगारांना शासनाने चक्क उद्योजक बनविले. जिल्ह्यात असे कामगार असताना राज्याचा विचार केल्यास हा महाघोटाळा पाचशे कोटी रुपयापर्यंतचा असावा, असा अंदाज श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी वर्तविला आहे.
ई-पंचायत
 
रोहा, दिवा पॅसेंजरमध्ये बॉम्बची अफवा

रोहा, दिवा पॅसेंजरमध्ये बॉम्बची अफवा

कर्जत- दिवा प्रवासी गाडीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आला. तपासानंतर मात्र, ही अफवा असल्याची माहिती सूत्रांकडून कळते.
रोहा दिवा प्रवासी ही गाडी पहाटे रोहाला येत असताना रोहा पोलिसांना फोन आला. गाडीमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला असून तिच्याजवळ असलेल्या पिशवीत बॉम्ब आहे, असे सांगण्यात आले होते. बॉम्बच्या फोनने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती. त्यावेळी अलिबागहून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले, एक पीएसआय, त्यांचे चार कर्मचारी आणि ङ्कलेलोङ्क नावाचा डॉग घटनास्थळी दाखल झाले. गाडी रिकामी करण्यात आली आणि चार तासाच्या अथक प्रयत्नाने काहीच न सापडल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच तासानंतर गाडी सोडण्यात आली.

Monday, May 19, 2014

दुर्गापूर खुल्या कोळसा खाण ;५0 लाख रुपयांचे नुकसान

दुर्गापूर खुल्या कोळसा खाण ;५0 लाख रुपयांचे नुकसान

दुर्गापूर उपक्षेत्रीय वेकोलि भांडार परिसरात लागलेल्या भीषण आगीने कोट्यवधींचे नुकसान झाले. तब्बल १० बंब ही आग विझविण्यासाठी कामी लागले होते. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

दुर्गापूर खुल्या कोळसा खाण परिसरात असलेल्या क्षेत्रीय भंडाराला रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये जवळपास ५0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

दुर्गापूर कोळसा खाण परिसरात चंद्रपूर वेकोलिचे क्षेत्रीय भंडार आहे. या भंडारातून चंद्रपूर क्षेत्रात असलेल्या सर्व कोळसा खाणींना लागणारे साहित्य पुरविले जाते. कोळसा खाणीत कोळसा व माती उत्खननाकरिता मोठमोठय़ा वाहनांचा उपयोग केला जातो. या वाहनांचे जुने टायरसुद्धा येथे साठविण्यात येतात. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात भंगार साहित्य आहे. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथे साठवून ठेवलेल्या टायरला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररुप धारण केल्याने परिसरात सर्व साहित्य आगीने क्षणात आपल्या कवेत घेतले. याच परिसरात मोठय़ा संख्येने ऑईलने भरलेले ड्रम तसेच काही अंतरावर वेकोलिचे क्षेत्रीय भंडारचे कार्यालयही आहे. या आगीमध्ये टायर, भंगारातील चार चाकी वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती अधिकार्‍यांना देण्यात आली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

Saturday, May 17, 2014

पाचगांवात दारूबंदीचा ठराव पारीत

पाचगांवात दारूबंदीचा ठराव पारीत

- महिला शक्तीचा एल्गार

ब्रम्हपुरी - तालुक्यातील पाचगांव येथील दोन बियर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारीत करून महिलांनी आपली शक्ती दारूविक्रेत्यांना दाखवुून दिली.

Friday, May 16, 2014

 विजयाची हॅट्रीक

विजयाची हॅट्रीक

 लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक साधत राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार २६९ मतांनी दारूण पराभव केला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंत ती सातत्याने कायम राहिली. मतदार संघातील एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ उमेदवार रिंगणात होते. वरील तीन प्रमुख उमेदवार वगळता १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तीक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवार

विजयी उमेदवार

मतदारसंघ
विजयी उमेदवार
नंदुरबार (अ.ज.)
हीना गावित (भाजप)
धुळे
डॉ. सुभाष भामरे (भाजप)
जळगाव
ए.टी.पाटील (भाजप)
रावेर
रक्षा खडसे (भाजप)
बुलढाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला
संजय धोत्रे (भाजप)
अमरावती (अ.जा.)
आनंदराव अडसूळ (शिवसेना)
वर्धा
रामदास तडस (भाजप)
रामटेक (अ.जा.)
कृपाल तुमाने (शिवसेना)
नागपूर
नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया
नाना पटोले (भाजप)
गडचिरोली-चिमूर(अ.ज.)
अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर
हंसराज अहिर (भाजप)
यवतमाळ-वाशिम
भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली
सुभाष वानखेडे (शिवसेना)
नांदेड
अशोक चव्हाण (काँग्रेस)
परभणी
संजय जाधव (शिवसेना)
जालना
रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद
चंद्रकांत खैरे (शिवसेना)
दिंडोरी (अ.ज.)
हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
नाशिक
हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर (अ.ज.)
चिंतामण वनगा (भाजप)
भिवंडी
कपिल पाटील (भाजप)
कल्याण
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे
राजन विचारे (शिवसेना)
उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी (भाजप)
उत्तर पूर्व मुंबई
किरीट सोमय्या (भाजप)
उत्तर पश्चिम मुंबई
गजानन कीर्तिकर (शिवसेना)
उत्तर मध्य मुंबई
पुनम महाजन (भाजप)
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड
अनंत गिते (शिवसेना)
मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे
अनिल शिरोळे (भाजप)
बारामती
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरुर
शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)
अहमदनगर
दिलीपकुमार गांधी (भाजप)
शिर्डी (अ.जा.)
संजय महाडिक (शिवसेना)
बीड
गोपीनाथ मुंडे (भाजप)
उस्मानाबाद
प्रा. रविंद्र गायकवाड (शिवसेना)
लातूर (अ.जा.)
डॉ. सुनील गायकवाड (भाजप)
सोलापूर (अ.जा.)
शरद बनसोडे (भाजप)
माढा
सांगली
संजयकाका पाटील (भाजप)
सातारा
उदयनराजे भोसले (ऱाष्ट्रवादी काँग्रेस)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर
हातकणंगले
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी पक्ष)