সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, October 24, 2017

काव्यशिल्प ई- दिवाळी अंकाचे प्रकाशन

 तंत्रज्ञानानुसार माध्यमांनी बदलावे



 ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे प्रतिपादन

      काव्यशिल्प ई- दिवाळी अंकाचे प्रकाशना स्थळी उपस्थित,मनोहर सप्रे सर, इको-प्रो चे बंडू धोत्रे,मंगेश    
                                                      खाटिक,पुरुषोत्तम चौधरी,आदि

चंद्रपूर : जेव्हा संगणक आला, तेव्हा अनेकांनी नाक मुरडले. आता टिव्ही, रेडीओनंतर आॅनलाइन मीडियाने मोठा बदल केला आहे. सोशल मीडियामुळे वैचारिक क्रांती होत आहे.

तंत्रज्ञानानुसार माध्यमांनी बदलावे, अन्यथा तग धरणे कठिण होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांनी काव्यशिल्प ई-दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रकरणी केले.

त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी काव्यशिल्प ई-दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरुषोत्तम चौधरी, मंगेश खाटिक यांची उपस्थिती होती.

नवी पीढी पुस्तकापासून दूर गेली असली तरी  वाचनाच्या  जवळ आली आहे.  फ़क्त वाचनाचे तेवढे माध्यम बदलत आहे. हा बदल नव्या पीढीने स्वीकारला आहे. त्यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्तिसाठी काव्यशिल्प ब्लॉग व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत.अश्या या ऑनलाईन ब्लॉगची व व्याप्तीही मोठी आहे. दिवाळी साहित्य ब्लाॅग रुपात मांडण्याची कल्पना नवीन असली तरी अभिनव आहे. त्याचे कौतुकच केले पाहिजे. डिजिटल मध्यमांची ताकत मोठी आहे. ते या जगाने बघितले आहे, त्याचे फायदे व  उपयुक्तता सर्वाना ठाऊक आहे. प्रत्येकाने वेगळी गोष्ट केली पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा शोधला पाहिजे.  त्यात आणखी बदलाची संधी आहे.डिजीटल  माध्यम हे, करमणुकीसोबत तो लोकोपयोगी माहितीचा ठेवा व्हावा, अशी अपेक्षा मनोहर सप्रे यांनी व्यक्त केली.

देवनाथ गंडाटे यांनी ब्लाॅग, डिजिटल आणि इ- दिवाळी अंकामागील भूमिका विषद केली.या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाला गोविल मेहरकुरे,  युवा पत्रकार ललित लांजेवार,  पुरुषोत्तमइको-प्रो चे धर्मेंद्र लुनावत, नितीन बुरडकर, नितिन रामटेके आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.