काव्यशिल्प Digital Media: सातारा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सातारा. Show all posts
Showing posts with label सातारा. Show all posts

Thursday, February 07, 2019

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

www.khabarbat.com

www.khabarbat.com

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात  अनिल दबडे यांचे प्रतिपादन

मायणीः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)

  "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरांमधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते, " असे प्रतिपादन  जयभवानी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल दबडे यांनी केले. ते कला, वाणिज्य महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच श्री. भास्कर खरात हे होते. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे,  प्राचार्य डॉ सयाजीराव मोकाशी,श्री यशवंत माळी, श्री राजू रसाळ, श्री अलीभाई तांबोळी (स्वच्छता दूत), सत्यजीत साळुंखे, श्री दीपक नामदे, श्री विठ्ठल पाटील, नदीम शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते


कार्यक्रमाच्या प्रारंभी रासेयो प्रकल्पाधिकारी डॉ. उत्तम टेंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे यांनी ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. श्री विठ्ठल पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. ग्रामस्थ, प्राध्यापक वृंद याची मोठी उपस्थिती होती.

 अँग्रो साखर कारखान्यात विद्यार्थ्यांनी घेतले औद्योगिकीकरणाचे धडे

अँग्रो साखर कारखान्यात विद्यार्थ्यांनी घेतले औद्योगिकीकरणाचे धडे


मायणी :-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

    सध्याच्या शिक्षण प्रणाली मध्ये परिसर अभ्यास , भूगोल या विषयातून मुले उद्योग, दळणवळण, नद्या, संपर्क साधने, हवामान, नकाशा आदी घटकांची माहिती मिळवत असतात. पण पुस्तकात दिलेली उद्योग व कारखान्यांची माहिती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन पूर्वज्ञानाची सांगड घालण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय ,एनकुळ च्या विद्यार्थ्यांनी खटाव माण तालुका अँग्रो साखर कारखान्याची क्षेत्रभेटीसाठी निवड केली. 
        
           यावेळी विद्यार्थ्यांनी औद्योगिकीकरणाचे धडे घेत ,आपल्या रोजच्या  आहारात विविध पदार्थांमध्ये आवश्यक असणारी साखर प्रत्येक्ष कोणत्या कोणत्या प्रक्रियेतून तयार होते .यासाठी लागणारी यंत्रसामग्री कोणती याची माहिती कारखान्याचे इंजिनिअर अभिजित बाबर,शिवराज चव्हाण,लेबर ऑफिसर प्रसाद बिडकर यांचेकडून घेतली.

नुकताच बॉयलर प्रदिपन झालेल्या या कारखान्यात लवकरच साखर उत्पादनास सुरुवात होणार असून कारखान्यात असणारी मोठी यंत्र सामग्री ,भली मोठी धूर सोडणारी चिमणी,मोठमोठ्या रसाच्या,पाण्याच्या टाक्या,वीज निर्माण कक्ष हे सर्व पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. मुलांनी येथे काम करणाऱ्या काही कामगार बंधूंशी सुद्धा संवाद साधला. कारखान्याच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या समवेत महर्षी शिंदे विद्यालयाचे डी बी खाडे ,आर के पोतदार, रेखा देसाई ,वसंत पिसे ,आर जी केंगार,एच बी मुलाणी आदी शिक्षक उपस्थित होते.

 चौकट :- कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी गुरुकुल अभ्यासक्रमअंतर्गत असणाऱ्या या क्षेत्रभेटीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी घेतलेल्या माहितीची उजळणी घेतली . विद्यार्थ्यां व शिक्षक यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या सोबत फोटो घेतले. यावेळी संचालक विक्रम घोरपडे,महेश घार्गे, टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव यांची उपस्थिती होती.

Sunday, February 03, 2019

Bicycle मायणीच्या युवकांनी केले उत्तर भारत दुचाकीभ्रमण

Bicycle मायणीच्या युवकांनी केले उत्तर भारत दुचाकीभ्रमण

 अनोखा विक्रम

मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

         मायणी येथील साहस ट्रेकिंग ग्रुप चे सदस्य दत्ता कोळी,सागर घाडगे यांनी 2 हजार 700 किमी व खलील मुलाणी,साईनाथ निकम यांनी 4100 किमी अश्या दोन वेगवेगळ्या दुचाकी मोहीम राबवून विविधतेने नटलेल्या भारत देशाच्या उत्तर भागातील राज्यास भेट देऊन तेथील राहणीमान व वेगळ्या संस्कृतीचा आनंद घेतला.या अनोख्या उपक्रमाचे मायणी सह परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

           प्रथम दत्ता कोळी व सागर घाडगे यांनी आयोजित केलेली गुजरात राज्य भेट मोहिमे अंतर्गत त्यांनी गिरनार येथील गिरिदुर्ग पर्वत रांगेतील दहा हजार पायऱ्या असणाऱ्या श्री दत्तगुरु मंदिर ,जुनागढ येथील किल्ला ,प्राणिसंग्रहालय,राजकोट ,तसेच नुकत्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या "स्टॅच्यु ऑफ युनिटी ,हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ,सरदार सरोवर,सातपुरा जंगल,नाशिक,पुणे असा 12 जानेवारी ते 16 जानेवारी असा प्रवास करीत"  वृक्षलागवड ,पाणी वाचवा "या सारखा संदेश देत दोन हजार सातशे किमीचे अंतर पारकरून आपली गुजरात राज्याची मोहीम पार केली.

           तसेच याच ग्रुप चे सदस्य खलील मुलाणी व साईनाथ निकम यांनी आखलेली दुसरी उत्तर भारत दुचाकी भ्रमंती मोहीम दिनांक 21जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान पार पडली यामध्ये खलील मुलाणी व साईनाथ निकम यांनी मध्य प्रदेश मधील अंकाई किल्ला तेथील लेणी ,अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दरगाह ,राजस्थान मधीन 'पुष्कर' त्यानंतर दिल्ली येथील संसद भवन, राष्ट्रपती भवन, लालकिल्ला, नॅशनल झू पार्क, कुतुबमिनार, जामा मज्जीत, गुरुद्वारा ,मथुरा,आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल या सर्व ठिकाणांना भेट देऊन तेथील प्रत्येक्ष जीवनमान,वेशभूषा,संस्कृती यांची माहिती घेऊन परतीचा मार्ग पकडून ग्वालीयर- झान्सी- इंदोर- मनमाड- शिर्डी- अहमदनगर- बारामती- दहिवडी मार्गे मायणी येथे पोहचले. सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देत स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानास हातभार लावला एक कदम स्वच्छता की ओर, पेड लगाओ देश बचाओ असा संदेश गावोगावी पोहचवला हा सर्व  प्रवास 4100 किमीचा होता.

           विशेष म्हणजे या दोन्ही दुचाकी भ्रमंती मोहिमे  साठी स्प्लेडर या दुचाकींचा वापर करण्यात आला. गडकिल्ले प्रेमी असणारे हे साहस ट्रेकिंग ग्रुप चे सदस्य सदैव गडकिल्ले मोहीम आखत असतात.याची माहिती देताना खलील मुलाणी या युवकाने असे सांगितले की,आपण जेथे राहतो त्या प्रदेशाची आपणास माहिती असते परंतु आसपास चे प्रदेश , राज्य यांची संस्कृती आणि प्रत्येक विभागाचे एक अनोखे विशिष्ट असे वैशिष्ट्य असते ते फक्त पुस्तकात किंवा टी व्ही वर पाहून अनुभवता येत नाही त्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक्ष जावे लागते .

           यावेळी सागर घाडगे यांनी माहिती देताना असे सांगितलेकी, शिवरायांचे विचार त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी घेतलेले कष्ट हे फक्त पुस्तकात पाहून कळणार नाही तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रानवाटा,गडकिल्ले यांच्या भिंती तटबंदी यांच्या पुढे नतमस्तक होऊनच ते अनभुवता येणार आहे ,व्यसनाधीन होणाऱ्या तरुणाईने आपले तारुण्य स्वतःस घडविण्यास व आपल्या भारत देशातील विविध प्रदेशाना प्रत्येक्ष अनुभवून एक अनोखा भारत घडविण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

           सदर युवकांचे मायणीसह परिसरात कौतुक केले जात आहेत,यावेळी त्यांचे सपोनि संतोष गोसावी,पत्रकार  यासह विविध युवा संघटना यांनी शुभेच्छा दिल्या.

Tuesday, January 29, 2019

भाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा

भाग्यश्रीची हत्या करणाऱ्यांना त्वरित अटक करा

खटाव तालुका  नाभिक समाजाची मागणी : तहसीलदारांना निवेदन

मायणी / प्रतिनिधी ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

करपेवाडी ता पाटण येथील भाग्यश्री संतोष माने हिची हत्या करणाऱ्या दोषींना  त्वरित अटक करून त्यांना कठोर शासन करा अशी मागणी येथील नाभिक समाजाच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी खटाव तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित  होता.

       निवेदनातील  माहितीनुसार  भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने हीचा धा तरदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याचा आम्हाला संशय आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भाग्यश्री माने हिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एका गरीब कुटुंबातील युवतीचा खुनाच्या या घटनेमुळे आम्हा सर्व नाभिक समाज बांधवात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे.

      तरी या घटनेचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून दोषी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन करावे . तसेच ३१ जानेवारी पर्यंत तातडीने तपास न लावल्यास नाभिक समाजाच्या वतीने १ फेब्रुवारी ला पूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवून  या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी चे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.


Friday, January 25, 2019

 खटाव माण अँग्रोचा गणराज्य दिनी पेटणार बॉयलर

खटाव माण अँग्रोचा गणराज्य दिनी पेटणार बॉयलर


 चेअरमन प्रभाकर घार्गे,को-चेअरमन मनोज घोरपडे

मायणी :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)

         येथील खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ या साखर कारखान्याचा प्रथमच सन २०१८-१९ या पहिल्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दि २६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता कारखान्याचे चेअरमन ,माजी आमदार प्रभाकर घार्गे ,को- चेअरमन मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थित कारखाना कार्यस्थळावर पार पडणार आहे.

          

         खटाव - माण या कायम दुष्काळी तालुक्यात साखर कारखान्याचे दिवास्वप्न प्रत्येक्षात उभा राहत आहे या कारखान्यामुळे शेकडो जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून यामुळे भागातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे . संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा पहिलाच बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ यामुळे भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे.              

          सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ ,सांस्कृतिक,राजकीय,शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,टेक्निकल डायरेक्ट बालाजी जाधव  यांनी केले आहे.

मुंबई - वळुज मार्गाची बदललेली सेवा पुर्ववत सुरु करा

मुंबई - वळुज मार्गाची बदललेली सेवा पुर्ववत सुरु करा

खबरबात khabarbat.in


सारथी सामाजिक विकास संस्थेकडून व प्रवासी संघटनेच्या वतीने वडूज आगाराला निवेदन

वडुज(मायणी)-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे )

वडूज-मुंबई-वडूज (अंभेरी मार्गे) या मार्गाची बदललेली सेवा पुर्ववत सुरु करावी यासाठी सारथी सामाजिक विकास संस्थेकडून व प्रवासी संघटनेच्या वतीने वडूज आगाराला निवेदन देण्यात आले.


गेली वर्षानुवर्षे नियमित चालू असणारी व सामान्य माणसांना आपलीशी केलेली साध्या ला परिवर्तन बसची सेवा  रद्द करुन त्या जागेवर महागडी व न परवडणारी निम आराम (हिरकणी) सेवा प्रवाशांना विश्वासात न घेता लादली गेली. गेले ३-४ माहिने ही सेवा तोंड दाबून बुक्यांचा मार दिल्याप्रमाणे सहन करावी लागत आहे.


महागाईने सामान्य मानसाचे कंबरडे मोडलेले असताना अशाप्रकारचे सेवा बदलण्याचे निर्णय प्रशासनाकडून प्रवाशांवर लादले जात आहेत व यामुळे तिकीटामागे जास्तीचा १०० ते १५० रुपयांचा भृदंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता असे अनेक अवास्तव निर्णय घेऊन एस.टी. खासगीकरणावर भर दिला जात असल्याचा संशय अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे


तरीही महामंडळाच्या गलथान कारभारावर प्रवासी संघटना नाराज असून जुनी सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा सारथी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आहे


तरी अशा आशयाचे निवेदन वडूज आगार व्यवस्थापनाला दिले असून त्याची प्रत 

मा.श्री.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भेटून देण्यात येणार आहे, तसेच परिवहन विभाग, मंत्रालय व उपव्यवस्थापक यांनाही ही प्रत पाठविलेली आहे.

रामदास साळुंखे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन' पुरस्कार

रामदास साळुंखे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन' पुरस्कार

मायणी.ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट कराड येथील सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जानारा राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार विटा ता.खनापूर जि.सांगली येथील दैनिक लेखणी सम्राट चे संपादक रामदास साळुंखे यांना 'राज्यस्तरीय प्राईड अॉफ स्पंदन' पुरस्कार जाहीर झाला असून 

३ फेब्रुवारी २०१९ रोजी कराड येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार वितरण होणार आहे.अशी माहिती स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली.

      1 ऑगस्ट 2018 रोजी विटा सारख्या ग्रामीण भागात रामदास साळुंखे यांनी दैनिक लेखणी सम्राट हे वृत्तपत्र सुरू केले.या दैनिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न अतिशय उत्तम प्रकारे मांडून समाजाला दिशा देण्याचे काम केले म्हणून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.सांगली जिल्ह्यातील व सातारा जिल्ह्यातील पत्रकार मित्रांनी व सामाजिक संस्था  नी त्यांचे आभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Wednesday, January 23, 2019

 वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ लेक वाचवा अभियानाचा नवीन पायंडा

वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ लेक वाचवा अभियानाचा नवीन पायंडा

ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील
मायणी:(सतीश डोंगरे)सातारा:

 पुसेसावळीतील माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांच्या वडिलांच्या पुण्य स्मरणार्थच्या निमित्ताने दोन मुली असलेल्या माता पित्यांचा सत्कार करून लेक वाचवा अभियानास चालना देण्याचा नवीन पायंडा पाडला असल्याचे मत वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले,
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर समाजकल्याण सभापती शिवाजराव सर्वगोड, धैर्यशील कदम, बबनराव कदम, सुर्यकांत कदम ,अनिल माने, विलास शिंदे नंदकुमार मोरे, एस.के.पिसाळ, सी.एम.पाटील, दादासो कदम,आदिंची उपस्थिती होती.
पुढे पाटील म्हणाले की या कुटुंबाने सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले असुन त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यामातून लेक वाचवा अभियानातुन विविध उपक्रम राबवल्यामुळे आजही त्याला चालना देण्याचे काम करित आहेत.
तद्नंतर दहा माता पित्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला,यावेळी किरण माळवे,अमोल माळवे,दिलीप पुस्तके,सुरेश शिंदे,शंकरराव खाडे,सुभाष गुरव, राजेंद्र गोडसे,श्रीमंत कोकाटे बजरंग रोमन आदि ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते, ‍मानसिंगराव माळवे यांनी प्रास्ताविक केले,तर रायसिंग माळवे यांनी आभार मानले.

Tuesday, January 22, 2019

वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ लेक वाचवा अभियानाचा नवीन पायंडा

वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ लेक वाचवा अभियानाचा नवीन पायंडा


ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील


मायणी : (सतीश डोंगरे)खटाव तालुका जि.सातारा पुसेसावळीतील माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांच्या वडिलांच्या पुण्य स्मरणार्थच्या निमित्ताने दोन मुली असलेल्या माता पित्यांचा सत्कार करून लेक वाचवा अभियानास चालना देण्याचा नवीन पायंडा पाडला असल्याचे मत वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले,
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर   समाजकल्याण सभापती शिवाजराव सर्वगोड, धैर्यशील कदम, बबनराव कदम, सुर्यकांत कदम ,अनिल माने, विलास शिंदे नंदकुमार मोरे, एस.के.पिसाळ, सी.एम.पाटील, दादासो कदम,आदिंची उपस्थिती होती.

पुढे पाटील म्हणाले की या कुटुंबाने सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले असुन त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यामातून लेक वाचवा अभियानातुन विविध उपक्रम राबवल्यामुळे आजही त्याला चालना देण्याचे काम करित आहेत.
तद्नंतर दहा माता पित्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आला,
यावेळी किरण माळवे,अमोल माळवे,दिलीप पुस्तके,
सुरेश शिंदे,शंकरराव खाडे,सुभाष गुरव, राजेंद्र गोडसे,
श्रीमंत कोकाटे बजरंग रोमन  आदि ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते,
‍मानसिंगराव माळवे यांनी प्रास्ताविक केले,तर रायसिंग माळवे यांनी आभार मानले.

Monday, January 21, 2019

विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच इतर कोर्सेस मध्ये ही प्रविण्य मिळवावे: संतोष गोसावी

विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच इतर कोर्सेस मध्ये ही प्रविण्य मिळवावे: संतोष गोसावी

मायणी/सातारा:
सध्या युवकांना नोकरी मिळवत असताना आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच आपले इतर कोर्सेस मध्ये असलेले कौशल्य स्पर्धा परीक्षेत दाखवावे लागते तेव्हाच या परीक्षांमध्ये त्यांना यशस्वी होता येते तेव्हा टायपिंग ,कॉम्पुटर ,यांच्यासह शिक्षणाशी व नोकरीसाठी संलग्नित असणाऱ्या सर्व कोर्सेस मध्ये विशेष प्रविण्य मिळवण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे ,असे मत मायणी पोलीस दुरक्षेत्राचे सपोनि संतोष गोसावी यांनी व्यक्त केले . 

ते कॉलेज कॉर्नर टायपिंग व कॉम्प्युटर इस्टिट्यूट च्या २०१८ मध्ये मुंबई हायकोर्टच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टेनो तसेच क्लर्क आणि शिपाई पदासाठी परीक्षांमध्ये इस्टिट्यूट चे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सायजीराजे मोकशी ,इन्स्टिट्यूट चे प्रमुख सचिन चौधरी,जेष्ठ पत्रकारांची यांची प्रमुख उपस्थिती होती

नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत कॉलेज कॉर्नर इस्टिट्यूट चे खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील सहा मुलांची शासकीय सेवेत निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे -म्हासुरने गावचे सुपुत्र देविदास माने यांची मुंबई मुख्य महानगर न्यायालय मध्ये (क्लर्क) ,अभिजित सानप (पडळ)ठाणे न्यायालय, रेणुका शिंगटे आणि रेणुका कांबळे (मायणी) यांची सातारा जिल्हा न्यायालय मध्ये तसेच मयूर कुंभार (मायणी) याची पुणे न्यायालयमध्ये स्टेनोग्राफर पदी निवड झाली तसेच प्रियांका घाडगे (पाचवड) हिची सातारा न्यायालयात शिपाई पदासाठी निवड झाली.

यावेळी डॉ मोकाशी म्हणाले, सध्याच्या आधुनिक सरकारी नोकरी मिळवणे हे जीवघेण्या स्पर्ध्येमुळे अत्यंत कठीण झाले आहे.परंतु प्रयत्नांना कष्टाची साथ असेल तर नक्कीच जीवनात आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

यावेळी यशस्वी विद्यार्च्यांचा पुष्फगुच्छ श्रीफळ, आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी देविदास माने, रेणुका कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले.तरकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ श्यामसुंदर मिरजकर यांनी आभार दत्ता कोळी यांनी मानले.

Friday, January 18, 2019

 मायणीचा सर्वांगिण विकास हाच आमचा ध्यास:मा.स.सचिन गुदगे

मायणीचा सर्वांगिण विकास हाच आमचा ध्यास:मा.स.सचिन गुदगे

मायणी:जि.सातारा (प्रतिनिधी)

मायणीच्या विकासासाठी राज्य सरकारने सढळ हाताने मदत केली असुन रस्ते, पिण्याचे पाणी यासोबत प्रभागातील असनारे रस्ते बंदिस्त गटार२४×७पाणी पुरवठा योजना लवकरच पुर्ण करणार असुन गावातील गैर प्रकार चोरी अशांतता सारखे प्रकार घडु नये या साठी १४व्या विक्त आयोगातुन मायणी शहरात पांच मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असुन या पुढील काळात गावातील सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास राहील असे स्पष्ट मत मायणीतील लोकानियुक्त सरपंच युवा नेते सचिनभाऊ गुदगे यांनी मायणीतील चादनी चैकात सीसीटीव्ही कॅमेरे उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर होते सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला यावेळी उपसरपंच- अॅड.सूरजदादा पाटिल
 आप्पासाहेब देशमुख, मानसिंगराव देशमुख,मज्जित नदाफ ,गणी भाई बागवान , राजु कचरे मधुकर कचरे, शिवाजीराव पाटील ,\महादेव यलमर,बापू यलमर ,डॉक्टर मकरंद तोरो राजकुमार चव्हाण, गजानन सनगर ,पिंटू सोमदे , केशव शिंदे व सर्व ग्रमपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण सोहळा मायणी चांदणी चौक येथे संपन्न झाला 

या प्रसंगी भाजप नेते मा.आ.डॉ. दिलीपरावजी येळगावकर आपल्या भाषणात म्हणाले ज्या प्रभागात आमचे उमेदवार निवडून आले नाही त्या भागात ही समान पद्धतीने आम्ही विकास करणार आहे येत्या दोन महिन्यात टेंभू चेपाणी मायणीच्या धरणात पिण्यासाठी येणार असुन सध्या७५%काम पुर्णपणे झाले आहे याचा पिण्यासाठी पाणी मायणी सह पाचवड,विखळे,मुळीकवाडी,कलेढोणसह या गणातील गावांना पाणी पुरवठा करणार आहेत ह्याचे नियोजन सुरू आहे.मायणीतील बायपास रस्त्याच्या काम पूर्ण झाल्यानंतर गावातील रस्त्याचे काम चालु करणार नाहीअसे सांगितले यावेळी सचिन गुदगे यांच्या कामाचे बाबतीत ते म्हणाले की माझ्या पेक्षा जास्त ते मुंबईला जास्त प्रमाणात असतात मंत्र्यांना भेटतात व ते मायणी व मायणीपरीसरातील कामासाठी निधी उपलब्ध करतात त्या चा मला आभिमान आहे त्यांच्या कर्तुत्वाला माझा सलाम आहे यावेळी प्रस्ताविक राजु कचरे यांनी केले मायणीतील उप.सरपंच सुरज पाटील यांनी आभार माणले. 

सर्व पत्रकार मित्र यांचा पत्रकार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मायणी येथे शाल श्रीफळ व सन्मान देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले व गावातील समस्या मांडल्या यावेळी मायणी तील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Thursday, January 10, 2019

विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही:आ.बाळासाहेब पाटील

विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही:आ.बाळासाहेब पाटील

पुसेसावळी (प्रतिनिधी) :

आता काही दिवसात इलेक्शनचे वारे वाहिल आणि काहीजण येथील त्याच्या भुलथापांना बळी पडु नका, 
मागील निवडणुकीत दिडशे कोटीचा डंका करणार्‍यांनी विकास कामांचे नारळ फोडले पण विकास कुठे दिसला नाही याची कल्पना सगळ्यांन‍ा आहे, अशी टिका आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.ते मुसांडवाडी (ता.खटाव) येथे गणी भाई चाैक नामंकर सोहळा व विविध विकासकामांचे भुमिपुजन कार्यक्रमात बोलत होेते.
यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,माजी पंचायत समिती सभापती संदिप मांडवे,मार्केट कमिटीचे माजी सभापती सी.एम.पाटील, वडगावचे सरपंच संतोष घार्गे, व्हा.चेअरमन विलास शिंदे,महादेव माने,चेअरमन राजेंद्र माने,भिकाजी कटे,सुरेश घाडगे,अधिकराव माने आदीची प्रमुख उपस्थित होती.

आ.पाटील म्हणाले या परिसरातील वाडीवस्तींना लागणार्‍या कामांसाठी येणार्‍या काळामध्ये भरिव निधीची तरतुद केली जाईल, त्याचबरोबर या गावामध्येही आजपर्यंत लाखो रुपयांची कामे केली आहेत.
या भागातुन जात असलेल्या उरमोडीच्या पोटपाटाचे काम लवकरच मार्गी लागेल तसेच आज गावामध्ये गणी भाईच्या नावाने चाैकास नामंकर केल्यामुळे त्यांच्या स्मृती जागृत राहणार आहेत.

तद्नंतर समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड म्हणाले की या मतदारसंघामधील प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून कामे झालेली आहेत,त्यामुळे आपणही त्याच्या मागे खंबीरपणाने उभे राहिले पाहिजे, त्याचप्रमाणे या विभागातुन घरकुल,घरगंटी,पिठाची चक्की सारखे वैयक्तिक लाभ ही या विभागातुन गावामध्ये केलेले आहेत,

यावेळी सुरज शेख, जैनुद्दीन पटेल, जलाऊद्दिन पटेल सलमान पटेल, उसमान शेख, रामहरी मोरे, किसन इंगळे राजेंद्र इंगळे, चाॅद पटेल, तुषार मोरे, शहाआलम पटेल अरमान पटेल,रियाज पटेल, संजय मोरे, पै.अक्षय घाडगे,हणमंत मोरे,सुनिल इंगळे,संतोष मोरे,संकेत मोरे आदी ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.
प्रास्ताविक खुदबुद्दीन पटेल यांनी केले,तर आभार उपसरपंच आसिफ मुलाणी यांनी मानले
चैतन्य अकँडमीकडून मार्गदर्शकाची चोख भूमिका:DYSP अनिल वडणेरे

चैतन्य अकँडमीकडून मार्गदर्शकाची चोख भूमिका:DYSP अनिल वडणेरे

मायणी /ता.खटाव(सतीश डोंगरे):
पत्रकार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांचा गौरव करत चैतन्य करियर अकँडमीने सामाजीक बांधीलकी जपण्याचे कार्य केले आहे. अकँडमीतून स्पर्धा परिक्षा , पोलीस , आर्मी ,आदी विविध भरतीबाबत युवक - युवतींना मार्गदर्शकाची चोख भूमिका बजावली जात असल्याने गेल्या ९ वर्षात असंख्य विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले असल्याचे प्रतिपादन माण-खटाव चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

दहिवडी ता.माण जि.सातारा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधत चैतन्य करीयर अकँडमीने पत्रकारांचा गौरव हा कार्यक्रम त्यांच्या वर्धापनदिवशी आयोजित केला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.वढनेरे ,सपोनि प्रविण पाटील ,भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ ,नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे ,मुख्याधिकारी कपिल जगताप ,पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ ,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित ,आगारप्रमुख मोनाली पाटील ,नगरसेवक अजित पवार ,चैतन्य अकँडमीचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव खाडे ,सुभाष पवार ,पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चैतन्य अकँडमीतर्फे मान्यवरांच्या हस्ते माण-खटावमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.तसेच विविध स्पर्धा ,भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वढनेरे ,सपोनि प्रविण पाटील ,नगराध्यक्ष सौ.साधना गुंडगे , बाळासाहेब मासाळ ,अजित पवार , गणेश वाघ ,प्रमोद दिक्षीत ,कपिल जगताप ,मोनाली पाटील ,धनंजय क्षीरसागर आदींनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन एस.एस.खाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चोख बजावले.

खाडे सर यांनी सूत्रसंचालन करत आगामी होणाऱ्या 72000 सरकारी नोकर भरती साठी सरळ सेवा भरती साठी चैतन्य करिअर अकॅडमी त प्रवेश मिळवून आपल्या आगामी होणाऱ्या नोकरभरतीचे सोने करावे माण खटाव तालुक्यातील व अॅकॅडमी चे जुने विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये 50 टक्के सवलत देऊन खऱ्या अर्थाने माण खटावमधील तरुणांसाठी ही सुवर्णसंधीच आहे आगामी पोलीस भरती व सरळसेवा भरतीसाठी चैतन्य करिअर अकॅडमी प्रवेश घेऊन या संधीचे सोने करावे खाडे सर यांनी सांगितले.उपस्थितांचे आभार एस खाडे सर यांनी मानले.

Saturday, January 05, 2019

आठवडा बाजारातुन चिमुकल्या मुलांनी घेतले व्यवहार ज्ञनाचे धडे

आठवडा बाजारातुन चिमुकल्या मुलांनी घेतले व्यवहार ज्ञनाचे धडे

मायणी/सातारा(सतीश डोंगरे):

 शनीवार दि.0५/०१/२०१९रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले मायणी येथे आठवडी बाजार भरला या बाजारात मुलीनी १५ हजाराच्या असपास उलाढाल  केली यावेळी गावातील ग्रामस्थांना बरोबर मायणी चे उप सरपंच ग्रामपंचायत सदस्य सिनीयर काँलेज चे शिक्षक गावातील मान्यवर सुट्टी साठी आलेले परराज्यातीत सोना चांदी दुकान दारांनी बाजार करण्याचा आनंद घेतला माजी जिल्हा परिषद शिक्षकांनी पण खरेदी चा आनंद घेतला
अतिशय छान प्रतिसाद'मिळाला मायणी मंधील ग्रामस्थ आणि पालकांचा पहली ते चैथी-शाळेंतील मुलानी पालेभाज्या, भेळ ,खेळणी. खाउची.
स्टेशनरी साहित्याची दुकाने आनंदाने थाटली होती यात विशेष म्हणजे  काही संदेश देणारे दुकान होते या वेळी खरेदी 'पालक ग्रामस्थ यांनी भरपूर केली यासाठी शालेय व्यवस्थापन कमिटी सर्व शिक्षक ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य मार्गदर्शन लाभले'सर्व.मुलांना' व्यवहार ज्ञान मिळाले आनंद मिळाला नियोजन करणारें सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , मुख्याध्यापिका  वडगावकर मँडम. पिसाळ मॅडम,देशपांडे मॅडम. निकम मॅडम. कालेकर मॅडम,सणगर मँडम,कांबळे मँडम,जगताप गुरुजी व तसेच केंद्र प्रमुख जगदाळे साहेब सर्वांचे आभार अभिनंदन अशाच प्रकारें शाळेच्या प्रगतीचा आल्लेख उंच जात राहावा या सदिच्छा ग्रामस्थांनी दिल्या.
 आठवडी बाजारात विषेश म्हणजे सर्व मुलांनी शेतकरी पोषक घालुन सर्व ग्रामस्थाचे लक्ष वेधले होते आणि महिला ग्रमस्थांनी विशेष गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

Thursday, December 27, 2018

गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार

गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार

 पुसेसावळी : (ता.खटाव जि. सातारा)खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडीतील साताबिगे शिवारातील खिलार गाईचा बिबट्या कडुन ठार करुन फस्त करण्याची घटना सोमवार रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास घडली असल्यामुळे या गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती वरुन गिरिजा शंकरवाडीतील शेतकरी यशवंत विष्णु थोरवे यांच्या मालकीची असणारी सातबिगे शिवारामध्ये खिलार जातीची गाय व इतर जनावरे बांधलेली होेती, नेहमीप्रमाणे ते गावामध्ये घरी जेवण करण्यास आले होते, तद्नंतर ते त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या मालकीची गाई दिसुन आली नाही म्हणुन आजुआजुच्या क्षेत्रामध्ये बॅटरीच्या प्रकाशझोतात प्राण्याचे डोळे चमकल्याचे दिसुन आले म्हणुन त्यांनी आरडाअोरडा करुन तो वन्याप्राणी घटनास्थळाच्या उत्तरेस पळुन गेला, त्यानंतर घाबलेल्या अवस्थेमध्येच ते बाकीची जनावरे घरी गेले.

आज मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचनामा करण्यास आलेली वनअधिकारी व ग्रामस्थ यांनी पाहणी करत असताना गाईच्या तोंडाला पंजा मारलेले अोरखडे दिसत होते व मानेच्या मागील भागातील काळीज व फुफ्फुस नसलेले दिसुन आले त्यावरुन ते वन्यप्राण्यानेच खाल्ले आहे, तसेच या गाईचे बांधलेल्या ठिकाणापासुन ९ मी.अंतरावर गाई अोढत नेल्याचे दिसुन आले तसेच मृत शरिरापासुन ४मी.अंतरावर रक्ताचे डाग दिसत असुन सदर जागेत बारकाईने तपास केला असता काही ठसे दिसुन आले या ठश्यावरुन गाईवर हल्ला करणारा वन्यप्राणी बिबटा असावा असे दिसुन येत आहे. सदर घटनास्थळावरुन कोरेगाव वनपरिक्षेत्राची हद्द उत्तरेस ५००मी.व पश्चिमेस २०० मी.एवढ्या अंतरावर आहे. तरी सदर वन्यप्राणी हा कोरेगाव वनहद्दीत असावा असा अंदाज आहे. त्यामूळे या साताबिगे शिवारात जाण्यास शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

गेल्या पंधरादिवसापासुन सातबिगे शिवारातमध्ये शाळु हरभरा पिके आहेत त्या पिकांची काळवीट डुकरे नासधुस करित असल्यामुळे मी व पाळीव जनावरे या शेतातच थांबत होतो. परंतु काल अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे २५ ते ३० हजार रुपये किंमतीची असणार्‍या गाई ठार झाली, मुला प्रमाणे मी या जनावरांची देखभाल करत असल्यामुळे हा माझ्या कुटुंबावर मोठा आघात आहे. - श्री.यशवंत विष्णु थोरवे, शेतकरी 

काल रात्रीच्या वेळी आमच्या गावातील यशवंत थोरवे यांची गाय बिबट्याने ठार केल्याची बातमी गावभर पसरली आणि गावामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी वनविभागाने याबाबत ठोस अशी उपाय योजना करावी. आणि जनावराच्या जिवावर झालेल्या हल्लात मृत झालेली गाईची भरपाई त्या शेतकर्‍याला लवकरात लवकर मिळावी,- श्री.बापुसो थोरवे ( माजी सरपंच गिरिजाशंकरवाडी)

Saturday, December 22, 2018

वनांचे व वन्यजीवांचे महत्व जनतेला पटवून द्यावे -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वनांचे व वन्यजीवांचे महत्व जनतेला पटवून द्यावे -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


 सातारा, दि.22 जिमाका) : वृक्ष लागवड करणे व वनांचे संरक्षण करणे हे ईश्वरीय काम आहे, वनांचे व वन्यजीवांचे महत्व काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचले पाहीजे.  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने वनांबरोबर  वन्यजीवांचे, त्यांच्या  संरक्षणाचे महत्व पटवून सांगितले पाहिजे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

   कोल्हापूर सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प  उपसंचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.  यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री विजय शिवतारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले, खासदार राजू शेट्टी, आमदार शंभूराज देसाई,  आमदार शिवाजीराव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव एम. के. राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, नाशिकचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपसंचालक विनीता व्यास आदी उपस्थित होते.
शासनाने  50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे जमिनीची धूप थांबून सूपीकता, पावसाचे प्रमाण वाढणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.   वृक्ष लागवडीमुळे शुध्द प्राण वायू,  शुध्द विचार व आचार मिळण्यासह उत्साही नागरिक घडविण्यास मदत होणार आहे.  वन क्षेत्रातील वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर कायदेशीर मदत मिळावी, व नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत मिळावी यासाठी कायदा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वन विभागाने डॉ  श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरु केली आहे, याचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यासाठी  अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे. वन क्षेत्रात होणारी कामे लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांना विश्वासात घेऊन करावी. ग्रीन आर्मीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने चांगला सहभाग नोंदविला आहे. यापूढेही नागरीकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदणी करावे. वन शास्त्र, पर्यावरण शास्त्र याला महत्व देणे आता काळाची गरज बनलीआहे. समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी  50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवून कमीत कमी एक झाड लावावे,असे आवाहन करुन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय वन्यजीवांचे  संवर्धन करेल, असा विश्वासही वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेल्या या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे. या व्याघ्र प्रकल्पाची इमारत अतिशय सुंदर आहे. हे कार्यालय वन्य जीव व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावेल. शासनाने जिल्ह्यात चांगली कामे केली असून ही कामे जनतेपर्यंत पोहोचली पाहीजेत. वनमंत्री हे सुधीर मुनगंटीवार हे संवेदनशील असून त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत.  यापूढेही ते असेच चांगले काम करत राहतील,असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के. राव यांनी केले. तर आभार विनीता व्यास यांनी मांडले.  या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, December 17, 2018

विज्ञान प्रदर्शनात समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयचे यश

विज्ञान प्रदर्शनात समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयचे यश


मायणी :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालय कलेढोण मधील विद्यार्थी ढोकळे सचिन रामदास व खरात अनुज विलास यांनी तयार केलेल्या बहुउद्देशीय औषध फवारणी यंत्र या उपकरणास तृतीय क्रमांक मिळाला व या उपकरणाची जिल्हा स्तरावर निवड झाली. तसेच कु.लावंड समृद्धी प्रमोद हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच कु.वायदंडे श्रावणी संजय व कु.घाडगे समृद्धी विठ्ठल यांचा प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठा गटात तृतीय क्रमांक मिळाला.

श्री. श्री. विद्यालय औंध येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ढोकळे व खरात यांनी बहुउद्देशिय औषध फवारणी यंत्र या नाविन्य पूर्ण व आधुनिक यंत्राची निर्मिती केली होती या उपकरणासाठी सानप एस्. बी.व तोडकर एम . आर.यांचे मार्गदर्शन लाभले,लावंड समृद्धी हिने डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम या विषयावर वक्तृत्व केले होते हिला खंदारे व्ही.बी. यांचे मार्गदर्शन लाभले व घाडगे समृद्धी व वायदंडे श्रावणी यांना लावंड पी .एस्. व पिसे डी.यू. व चौरे एम.एल. यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री.मिलिंद साळुंखे, संचालक श्री. संजीव साळुंखे, मुख्याध्यापक श्री .देशपांडे ए.व्ही.,पर्यवेक्षक श्री जाधव एस्. वाय.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
मायणीचा कुस्ती आखाडा चितथरारक अन रोमांचक

मायणीचा कुस्ती आखाडा चितथरारक अन रोमांचक


मायणी. ःता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे) 
दि.१४रोजी भरवण्यात आलेल्या सिध्दनाथ यात्रे निमीत्ताने स्फूर्ती क्रिडा मंडळ व सी.एम.चषक स्पर्धा संयोजक यांच्या विद्यमाने मायणीयेथे शुक्रवारी दुपारी कुस्ती आखाडा उत्साहात पार पडला याआखाड्यातील कुस्त्या चित्तथरारक व रोमांचक असल्याने कुस्ती शैकिनांचे डोळ्याचे पारणे फीटले

पहिली कुस्ती महाराष्ट्र केसरी राजेंद्र सुळ विरुध विजय धुमाळ दिड लाख रूपये इनामाची कुस्ति आवघ्या तिन मिंटात राजेंद्र सुळ यांनी घिस्सा डावावर विजय मिळवला दुसरी कुस्ती सव्वा लाखाची सुनिल शेवतकर विरूद्ध उमेश शिरतोडे यांच्या त सुनिल शेवतकर याने ढाक या पटावर विजय मिळवला व तिसरी कुस्ति एक लाख इनामाची बापु कोळेकर व उमेश नरळे बरोबरीने सुटली तर शेवटची कुस्ती जिवन तामखडे व स्वप्निल कोरवी यांच्या त मोठी लढत झाली यात तामखडेने आसमान दाखवले

या शीवाय पच्चसे रू.ते पाचहाजार,दाहाहाजार कुस्त्या निकाली झाल्या

तसेच सी.एम.कुस्ती स्पर्धा ही गुणावर पार पडली या मध्ये सी.एम.चषक कुस्ती स्पर्धा माण -खटाव। ५७किलो गट...अनिकेत आप्पा .मदने। मायणी ६६किलो गट राहूल मधुकर चोरमले दिडवाघवाडी। . ७४किलो गट रतन मालोजी कमाने चितळी। ८६किलो गट .निलेश हनुमंत तरंगे पिंपरी . खुला गट तानाजी सोपान वीरकर मसाईवाडी सर्व प्रथम क्रमांक विजयी मल्लांना चषक सर्टिफिकेट मेडेल देऊन मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, कार्यतत्पर युवानेते सरपंच सचिन गुदगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष आनिल देसाई, प्रदिप शेटे,व विविध भागातून आलेले भाजप मान खटाव भागातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

या कुस्ती आखाड्यला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उप महाराष्ट्र केसरी आबा सुळ वस्ताद विकास गुंडगे ,सभापती हणमंत तामखडे, श्रीमंत जाधव,सुरेश पाटील यांनी हजेरी लावली

कुस्ती आखाडा व्यवस्थित पारपडण्यसाठी यात्राकमीटी चेरमन दिपक देशमुख व यात्राकमीटी सर्व चेरमन व सदस्य सचिव सरपंच उप सरपंच व ग्रमपंचायत सदस्य आणि कुस्ती पैलवानी वस्तादानी विशेष प्रयत्न केले या आखाडयाचे मुलीच्या कुस्त्या वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या
मायणीला येणाऱ्या टेंभू योजनेचे काम प्रगतीपथावर

मायणीला येणाऱ्या टेंभू योजनेचे काम प्रगतीपथावर

काम पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढली 


मायणीः-ता.खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)
        खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या मायणी परिसराला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेचे काम सध्या प्रगती पथावर असुन येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती टेंभूच्या अभियंत्यांनी दिली आहे . या कामाची मायणी सह परिसरात प्रचंड उत्सुकता असून मोठ्या प्रमाणावर लोक याठिकाणी भेट देऊन कामची पाहणी करीत आहेत .

      टेंभूच्या मुख्य कालव्यापासून भिकवडी गावापर्यंत चर काढण्याचे काम सुरु असुन या मार्गात  २०० मिटर कठीण खडक लागला असून याचे ब्लास्टिंगचे काम सुरु आहे .लवकरच युद्धपातळीवर चालू असलेले हे काम पूर्ण होऊन मायणी ब्रिटिशकालीन तलावात हे पाणी येणार असून या कामाची प्रचंड उत्सुकता जनसामान्यात असून मायणीच नव्हे ते अन्य आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी भेट देऊन दुष्काळी पट्ट्यासाठी वाहणाऱ्या टेंभू या जीवनदायी योजनेचे पाणी मायणी तलावात येत आहे या ऐतिहासिक कामाची पहाणी करून पाण्याची "चातक पक्षाप्रमाणे "वाट पहात आहेत.

काम पूर्णत्वास गेल्यानंतर या योजनेचे पाणी भिकवडी गावच्या ओढ्यात येऊन पुढे साडेतीन किमी प्रवास करून मायणी ब्रिटिश कालीन तलावात येणार आहे.सदरचे पाणी पिण्यासाठी असुन वर्षातुन दोन वेळा हा तलाव भरून घेतला जाणार आहे . या तलावात येणाऱ्या या पाण्याचा आसपासच्या गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा फायदा होणार आहे .या कामाच्या पाहणीच्या वेळी जेष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके, प्रल्हाद घोलप,बाळासाहेब माळी,रघुनाथ पवार गुरुजी व आबासाहेब देशमुख याची उपस्थित होते.


डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या पुढाकारानं पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असलेले हे टेंभू योजनेचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर सध्या येरळवाडी तलावातून सुरु असलेल्या मायणी प्रादेशिक पाणी योजनेवरील ताण कमी होणेस मदत होणार असून युवा नेते ,सरपंच सचिन गुदगे याच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने मायणीकराना पाणी पुरवठा सुरळीत होत आहे . यात आणखी भर होऊन टेंभू योजनेचे पिण्याचे पाणी तलावात आल्यास मायणी व पंचक्रोशीतील जनता सुखावणार आहे. 
शि.आ.राजकुमार चव्हाण हे जनसामान्यांचे आधिकारी -प्रा.अनिल बोधे

शि.आ.राजकुमार चव्हाण हे जनसामान्यांचे आधिकारी -प्रा.अनिल बोधे


मायणी-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
शिक्षणआधिकारी राजकुमार चव्हाण यांनी मस्टर क्लार्क पासुन शिक्षणधिकारी पदापर्यंत केलेला प्रवास अत्यंत कष्टाचा जिद्दिचा व उमेदीचा आहे.घरची परस्थिती अत्यंत बिकट असताना प्रसंगी रोजगार करून त्यांनी अपले शिक्षण पुर्ण केले.विध्यार्थी, शिक्षक, आधिकारी या तिन्ही पातळीवर त्यांनी अतिशय प्रामाणिक व लोकाभिमुख कार्य केले त्यांच्यावर स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या व स्व.आमदार भाऊसाहेब गुदगे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या ह्रदयात एक समाजसुधारक, राजकारणी, व कर्तव्यदक्ष अधिकारी दडलेले होते त्यांचे कार्य आम्हाला सतत प्रेरणा देत राहील असे स्पष्ट मत थोर व्याख्याते अनिल बोधे यांनी मायणी येथे शिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण साहेब यांच्या एकष्टि निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रम सोहळ्यात ते बोलत होते
या प्रसंगी मायणीचे कर्तव्य युवानेते सरपंच सचिन गुदगे ,पत्नी सौ.निता गुदगे ,आई श्रीमती जयश्री गुदगे, तसेच मा.आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी सौ.अनुराधा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सह्याद्री का.मा.संचालक चव्हाण साहेब,घोरपडे सर,दिलीप डोईफोडे, युवा नेते सचिन गुदगे,मल्हारी साबळे,संचालक अरविंद पुस्तके साहेबांच्या कार्याचा गुणगौरव केला.
सत्कारमुर्ति राजकुमार चव्हाण साहेब आपल्या मनोगतात म्हणाले की मायणी अन आडुळ या दोन गावांच्या ऋणातून मी आयुष्य भर राहणार आहे. कोणताही निर्णय घेताना वरीष्ठ अधिकारी आपल्या पाठीशी असल्यनंतर कोणत्याही गोष्टीचे भयवाटत नाही माझी मुले आज उच्चशिक्षित आहेत याचा मला अभिमान आहे जिवनात या वळणावर मी सामाजिक प्रबोधन करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते मान्यवर व विविध शाखेतील पदाधिकारी, शिक्षक वत

यांच्या वर जिवापाड प्रेम करणारे मित्र मंडळी उपस्थित होते यावेळी सुत्रसंचालन मा.प्राचार्य इब्राहीम तांबोळी सरांनी केले व आभार डॉ. योगेश चव्हाण यांनी आभार मानले