चंद्रपूर/ प्रतिनिधी:
सूर्य देवतेची उपासना करणारे व्रत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छटपूजेसाठी गुरुवारी लालपेठ कॉलरी येथील एका नदीकाठी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि उपासनेला सुरूवात केली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पर्वाची शुक्रवारी (दि. २७) सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन सांगता होणार आहे. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी हे व्रत करण्यात येते.
या पूजेसाठी घरातल्या अबालवृद्धांपासून शेकडो नागरिक चंद्रपूर येथील इरई नदीकाठी आपल्या कुटुंबासह आले होते. सूर्यास्ताच्या वेळी महिलांनी पाण्यात उभे राहून मावळत्या सूर्याला अर्ध्य दिले. शेतात पिकत असलेल्या सर्व फळांचा नैवेद्य दाखवून सूर्याची प्रार्थना करण्यात आली. पूजेसाठी टोपल्यातून फळे आणण्यात आली होती. त्यात सर्व प्रकारच्या भाज्या, सफरचंद, केळी, अननस इत्यादींचा समावेश होता, तसेच घरात तयार केलेल्या मिष्टांन्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी काही लोकांनी अर्ध्य दिले, तर काहींनी नवसपूर्ती झाली म्हणून पूजा केली. या वेळी सूर्याच्या १०८ वेळा जप करण्यात आला. या पूजेसाठी घरातल्या महिलांनी ४८ तासांपासून पाणी न पिता उपवास केले होते. या पूजेमुळे प्रत्येकाच्या मनात धार्मिक सलोख्याचे वातावरण तयार झाले होते . दाम्पत्य ही पूजा करीत असल्याने पारंपरिक प्रथेनुसार छटपूजेसाठी लागणारे साहित्य डोक्यावर धरून एका टोपलीत पूजेच्या ठिकाणापर्यंत पुरूषांनी आणि महिलांनी या पूजेची मांडणी करत आरती आणि प्रार्थना केली.