काव्यशिल्प Digital Media: महाराष्ट्र नवनिर्माण सेना

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महाराष्ट्र नवनिर्माण सेना. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्र नवनिर्माण सेना. Show all posts

Tuesday, November 07, 2017

मनसेच्या नवीन 8 शाखांचे अनावरण

मनसेच्या नवीन 8 शाखांचे अनावरण


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरात रविवारी मनसेच्या 8 नवीन शाखेचे उद्घाटन व फलकाचे अनावरण प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, येणारे विधानसभा निवडणूक भत्ता मनसेने आपली पाळंमुळं शहरातील ठिकठिकाणी रोवायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर मनसेला बळकटी मिळावी  यासाठी शहरात आठ नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर चे मनसे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी केले होते. यावेळी महिला सेनेच्या मायाताई मेश्राम, अभिनव देशपांडे शहर उपाध्यक्ष, बाळा चंदनवार शहर उपाध्यक्ष, राहुल चव्हाण,  व अन्य मान्यवर उपस्थित होते या दौऱ्यात हेमंत गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू पावलेल्या मनसे पदाधिकारी अविनाश पाचारे याचे घरी जाऊन कुटुंबातील सदस्या सात्वन केले