সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 28, 2011

ब्रह्मपुरी तालुक्‍यात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

ब्रह्मपुरी तालुक्‍यात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
Monday, March 28, 2011 AT 03:23 PM (IST)
Tags: tigar, attack, chandrapur, incidence
चंद्रपूर - ब्रह्मपुरी तालुक्‍यातील सायगाटा-माहेर गावालगत सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करून दोघांना जखमी केले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आनंद जयराम सोनडवले (वय 45) असे मृताचे नाव आहे. जखमी मुरारी गणवीर (वय 60) यांच्यावर ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या महिन्यातील वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी भद्रावती तालुक्‍यातील सावरी आणि नागभीड तालुक्‍यातील पान्होळी येथे हल्ला करून दोघांना ठार केले होते. उन्हाळा सुरू झाल्याने जंगलातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे वाघ, बिबट पाण्यासाठी गावाच्या दिशेने येऊ लागले आहेत.

Sunday, March 27, 2011

250 कोटींच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री येणार

250 कोटींच्या नियोजनासाठी उपमुख्यमंत्री येणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 27, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, ajit pawar, vidarbha

चंद्रपूर - तीन वर्षांत चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून कामांचे नियोजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपुरात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पत्रपरिषदेत दिली.
वीजप्रकल्पांमुळे बाधित झालेल्या आणि प्रदूषणाची गंभीर समस्या असलेल्या शहरात विकासकामे राबविण्यासाठी पंचशताब्दी वर्षानिमित्त 250 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. यातून प्रदूषणनियंत्रण, पिण्याच्या पाण्याची योजना, जडवाहतुकीसाठी बायपास, शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविणे, बगीचे आणि खेळासाठी मैदाने, बाबूपेठ आणि वरोरा नाका रेल्वे उड्डाणपूल, ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण, पडोली ते राजुरा बायपास मार्ग कोसरा, दाताळा, शिवणी येथून तयार करणे, वर्धा आणि इरई नदीवर तीन ते चार ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारे, रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. जाहीर निधीपैकी 25 कोटी रुपये चालू वर्षात घोषित करण्यात आले, अशी माहिती वैद्य यांनी दिली. पत्रपरिषदेला मोरेश्‍वर टेमूर्डे, शोभाताई पोटदुखे, वामनराव झाडे, दीपक जयस्वाल यांची उपस्थिती होती.

Tuesday, March 22, 2011

Monday, March 21, 2011

तंटामुक्त बक्षीसयादीत जिल्ह्याचा 'फॉंट' बदलला

तंटामुक्त बक्षीसयादीत जिल्ह्याचा 'फॉंट' बदलला

सकाळ वृत्तसेवा

Friday, March 18, 2011 AT 12:15 AM (IST)
Tags gift list, website font, chandrapur, vidarbha
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या 2009-2010 च्या तंटामुक्त गावांच्या पुरस्कारांची घोषणा गृहविभागाने 25 फेब्रुवारीला केली. या पात्र गावांची जिल्हानिहाय यादी गृहविभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व गावांची नावे अचूक दर्शविण्यात आली आहेत. केवळ चंद्रपूर जिल्ह्याच्याच गावांमध्ये "फॉंट' (लिपी)ची समस्या असल्याने जिल्हावासींना आपल्या गावांची नावे पाहण्यास गैरसोय होत आहे. हा प्रकार 20 दिवस लोटूनही दुरुस्त करण्यात आलेला नाही.

माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे गावोगावी पोचल्यानंतर खेड्यातील सामान्य माणूसही आता मोबाईल आणि इंटरनेटशी जुळला आहे. गावात कुणाच्या न्‌ कुणाच्या घरी संगणक आणि त्यावर इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे अनेकजण शासनाचे दररोज प्रकाशित होणारे अध्यादेश (जीआर) घरबसल्या पाहत असतात. 15 ऑगस्ट 2007 पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील संपूर्ण गावे सहभागी होतात. गावातील तंटे गावातच सोडवून लाखमोलाचे बक्षीस मिळावे म्हणून गावातील जनताही पुढे येऊ लागली आहे. 2009-2010 च्या तंटामुक्त गावांच्या पुरस्कारांची घोषणा 25 फेब्रुवारीला झाली. यात 67 गावांची निवड झाल्याची माहिती गृहविभागाच्या पत्रकात देण्यात आली. यात आपल्या गावाचे नाव आहे की नाही, हे पाहण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी गृहविभागाच्या "होम डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन' संकेतस्थळावर भेट देत आहेत. मात्र, त्यांची हिरमोड होऊ लागली आहे. गृहविभागाने ही यादी "पीडीएफ' प्रकारात संकेतस्थळावर प्रकाशित केली. यादीत संपूर्ण राज्यातील गावांची नावे योग्य आणि अचूक दिसतात. मात्र, जिल्ह्यातील एकाही गावाचे नाव नीट वाचता येत नाही. पीडीएफ करतेवेळी फॉंट (लिपी) बदलल्याने ही समस्या झाली असली तरी केवळ चंद्रपूर जिल्ह्याच्याच रकान्यावर अन्याय झाला आहे. क्रमांक 31 वर चंद्रपूर जिल्ह्याची यादी आहे. 30 व्या क्रमांकावर भंडारा, तर 32 क्रमांकावर गडचिरोली जिल्ह्यातील गावांची नावे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या एकाही गावाचे नाव बदललेले दिसत नाही. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील यादीची लिपी बदलल्याने 20 दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यातील नागरिकांना तंटामुक्त गावांची नावे कळलेली नाही, हे विशेष.

Thursday, March 17, 2011

30 एप्रिलला आदिवासी साहित्य संमेलन

30 एप्रिलला आदिवासी साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा

Thursday, March 17, 2011 AT 12:30 AM (IST)
Tags: tribal sahitya sammelan, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - आदिवासी साहित्य परिषदेच्या वतीने 30 एप्रिल ते दोन मेपर्यंत तीनदिवसीय आदिवासी साहित्य संमेलन शहरात आयोजित करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बाळकृष्ण रेणके राहणार आहेत.
संमेलनाचे उद्‌घाटन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे सचिव नेताजी राजगडकर, केंद्रीय राज्यमंत्री अगाथा संगमा, खासदार मारोतराव कोवासे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, "टिंग्या' चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक रोहित नागभिडे, आमदार रामरतन राऊत, रांची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा, झारखंडच्या कवयित्री निर्मला पुतुल, महिपाल भुरिया, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, माजी खासदार नरेश पुगलिया उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष प्रेमदास मेश्राम आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात तीन परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन होईल. "आदिवासी काल, आज आणि उद्या' यावर मोहन हिराबाई हिरालाल, देवाजी तोफा, माजी आमदार हिरामण वरखडे, माजी आमदार सुखदेव उईके, चित्रकार विष्णू सलामे, रवी कुलसंगे, महिपाल भुरिया, नागेश चौधरी, अशोक पवार, गुजरातचे जितेंद्र वसावा, लटारू मडावी, सुरेश टेकाम आदी मान्यवर सहभागी होतील. आनंद धुर्वे आणि भारत सलाम यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येईल.
एक मे रोजी "शोध तंट्याभिल्लांचा' यावर प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांचे भाषण होईल. कवयित्री उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात निर्मला पुतुल (झारखंड), बिटिया मुस्मू (दुमका), गोसा पेंटर, हरिराम मीना (राजस्थान), डॉ. नीलकांत कुलसंगे (पुणे), वीरसिंग पाडवी, विश्राम वळवी, डॉ. विनायक तुमराम, प्रब्रह्मानंद मडावी, वामन सेडमाके, सुनील कुमरे सहभागी होतील. या कार्यक्रमाचे संचालन प्रभू राजगडकर करतील.
"आदिवासी भाषा व बोलींचे भवितव्य' या विषयावर परिसंवादात मोतीरावण कंगाली, सीताराम मंडाले, पुष्पा चौधरी सहभागी होतील. "आदिवासी स्त्री' यावर प्रतिभा शिंदे, डॉ. अर्चना मसराम, माधुरी मडावी, उल्का महाजन, सगुणा तलांडी सहभागी होतील. समारोपीय कार्यक्रमाला समाजसेविका मेधा पाटकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी वीरसिंग पाडवी राहतील. संबंधित बातम्या


प्रदूषणग्रस्त आठ उद्योगांची बॅंक गॅरंटी जप्त

पोलिस अधीक्षकांनी मागितली माफी

खापरखेड्याच्या विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग

चंद्रपुरात रिमझिम पाऊस

दुष्काळाच्या छायेत नाट्य"रंग' हरविले



Thank you.

Your Comment will be published after Screening.



Monday, March 14, 2011

दारुबंदी एल्गार

दारुबंदी एल्गार

दारुबंदीसाठी २६ रोजी जेलभेरो

चंद्रपूर : वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानच्या वतीने जटपुरा गेट गांधी पुतळयासमोर घेण्यात आलेल्या सत्याग्रह शपथ कार्यक्रमात येत्या २६ जानेवारी रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दारुबंदी एक महिन्याच्या आत करण्याचे आश्वासन मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनकत्र्या महिलांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल घेण्यात आलेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना दारूबंदीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, यासाठी आता महिलांच्यावतीने जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरवात १२ डिसेंबर २०१२ पासून करण्यात आली. अभियानादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख पोष्टकार्ड पाठवून, त्यांनी दिलेल्या वचनाचे स्मरण करून आले. दोन वर्षांंंंंपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाच्या वतीने, दारूबंदीसाठी शासनस्तरावर आणि जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने केली. या पाश्र्वभूमीवर सरकारच्यावतीने आंदोलक महिलांना दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यासाठी शासनाने पालकमंत्री संजय देवतळे समिती नेमली. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. या अहवालावर हिवाळी अधिवेशन संपताच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. मात्र अधिवेशन होवूनही सरकार गप्प राहिल्याने, मुख्यमंत्री चव्हाण यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जेलभरो करण्यात येणार आहे.



दारुबंदीविरुद्ध विक्रेत्यांचा
एतिहासिक एल्गार

दारूबंदी मागणीविरोधात मूक मोर्चा
दारू विक्रेत्यासह १२ हजार कामगारांचा सहभाग


शेकडो कारखाने व राष्ट्रीय उद्यान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली जात आहे. या मागणीविरोधात जिल्ह्यातील दारूविक्रेते व या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरले. दारूबंदीच्या मागणीविरोधात (दि.१४) चंद्रपुरात मूकमोर्चा निघाला. दारूविक्रेत्यांसह 12 हजार कामगार सहभागी झाले.

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या शासनमान्य १०९ देशी दारू दुकाने, २४ वॉईन शॉप, ३२० वॉईन बार व १० बियर शॉपी आहेत. या व्यवसायावर तब्बल ४० हजार कुटुंबे अवलंबून आहेत. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास या सर्व कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार आहे. परिणामी हे सर्व कामगार अवैध व्यवसायात गुंतून वाईट मार्गाकडे वळतिल. सध्या जिल्ह्यातील देशी व विदेशी दारूच्या माध्यमातून शासनाला २६० कोटी रूपयांचा महसूल मिळत आहे. यात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ होत आहे. जर दारू दुकाने बंद झाली तर शासनाला दरवर्षी मिळणारा हा महसूल बंद होइल. जर शासनाला दारूबंदी करायची असेल तर अवघ्या महाराष्ट्रात दारूबंदी करावी किवा दारूचे कारखाने बंद करावे, अशी मागणीही चंद्रपूर डिस्ट्रीक्ट लिकर असोसिएशनतर्फे जयस्वाल यांनी केली. दारूबंदीनंतर उदभवणाऱ्या समस्यांची जाणीव करून देण्यासाठी मुकमोर्चा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे एक निवेदन सादर करनयत आले.. दारूच्या व्यवसायावर बार कामगारांसह इतर व्यवसायही अवलंबून आहेत. दारूबंदी झाल्यानंतर त्या व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे दारूबंदी करायची असेल तर महाराष्ट्रात करावी, अशी मागणी निवेदनातून शासनाला केलि.








श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी लावून धरली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दारूबंदीचे ठराव त्यांनी घेतले आहेत. यासाठी त्यांनी पाच हजार महिलांचा मोर्चा दिसम्बरमधे विधिमंडळावर नेला होता. त्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. त्यानुसार समिती गठित करण्यात आली.


खरेतर राज्यात पूर्वीपासूनच दारूबंदीसाठी कमी-अधिक प्रमाणात चळवळी सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी आक्रमकपणे दारूअड्डे बंद पाडले. परंतु अशा पद्धतीने दारूबंदी करताना संपूर्ण गावाचा विशेषतः महिलांचा सहभाग त्यात फारच कमी दिसून आला. दारूबंदीबाबतची गाजत असलेली प्रक्रिया आता राज्यातील गावागावांत पोचणार आहे. राज्य दारूबंदी संघर्ष समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिला टप्पा म्हणून येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील 50 गावांतील महिलांच्या मतदानाद्वारे दारूबंदी व्हावी, यासाठी दबाव आणण्यात येणार आहे. याचबरोबर दारूबंदीसाठी राज्यव्यापी महिलांचे संघटनही उभारण्याची समितीची धडपड आहे. ज्या गावात दारूबंदीसाठी आंदोलने सुरू होतील, त्या आंदोलनातही उतरण्याचा संघर्ष समितीने निर्णय घेतला आहे.










धान्यापासून दारूनिर्मितीला विरोध आणि मतदानाद्वारे दारूबंदी हे दोन्ही मुद्दे घेऊन राज्यातील 35 संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिळून काही महिन्यांपूर्वी राज्य दारूबंदी संघर्ष समितीची स्थापन केली आहे. सामाजिक प्रश्‍नांवर सातत्याने लढणाऱ्या आणि राज्यात एक दबाव गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंनिस, अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन समिती, डॉ. अभय बंग यांची "सर्च', वारकरी सांप्रदायाची व्यसनमुक्ती संघटना, ऑल इंडिया यूथ फेडरेशन, जनवादी महिला संघटना, युवक क्रांती दल यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते या समितीवर आहेत. समाजप्रबोधन, विकृतीवर आळा आणि प्रशासनावर वचक अशी त्रिसूत्री घेऊन या समितीने राज्यातील गावागावांत मतदानाद्वारे दारूबंदीबाबत जागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

-------- ---- -------










दारुबंदी समिति
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या मागणीवर विचार करण्यासाठी स्थापित देवतळे समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार आहे. समितीच्या स्थापनेबाबतचा आदेश 22 फेब्रुवारी रोजी जारी झाला. राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा दारूबंदी समितीची गठित करण्यात आली आहे. पहिली बैठक चार मार्चला येथील विश्रामगृहात पार पडली. समाजातील वेगवेगळ्या घटकांना विश्‍वासात घेऊन समिती आपला अहवाल तयार करेल, अशी चर्चा बैठकीत झाली.
समितीत डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे, प्रा. मनोहर सप्रे, प्राचार्य मदन धनकर आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य ए. जे. शेख यांचा समावेश आहे.
-- ----- --------------- ------
श्रमिक एल्गारची पदयात्रा
५ दिसेम्बार ला सकाळी साडेपाचला बालाजी मंदिर येथून पदयात्रेला सुरवात झाली. अध्यक्षस्थानी प्रा. जयश्री कापसे-गावंडे होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. पारोमिता गोस्वामी, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, जिल्हापरिषद सदस्य प्रा. दादा दहीकर, सुमनबाई टेकाम, कुमरे, विमल कोडापे, सुरेखा कुसराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महाराजांचे दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून महाराजांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. परोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना' ला चार हजार 805 कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. जिल्ह्यातील सर्व दारूचे परवाने रद्द करून दारूबंदी करावी, या मागणीवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल, अशी घोषणा उत्पादनशुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानसभेत केली. हे श्रमिक च्या एलगार चे ५० टक्के यश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरला पदयात्रा निघाली नाही. मात्र, श्रमिक एल्गारच्या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियानाअंतर्गत निघालेली पदयात्रा ही ऐतिहासिक आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कष्टकरी महिलांचा मोर्चा अनेक दिवसांची पायपीट करीत गुरुवारी विधानभवनावर गेला होता. अनेक महिला तर अनवाणी पायाने चालल्या. पायाला फोडे आली. प्रकृती बिघडल्या. वेदना विसरून चालत राहायचे. दिवसभर, रात्री गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जनजागृती करायची. उघड्यावरच मुक्काम ठोकायचा. पाच दिवसांचा या प्रवासाने अनुभवांची शिदोरी मिळाल्यासारखी वाटली, हे बोल आहेत चिमूर ते नागपूर 130 किलोमीटरचे अंतर पदयात्रेतून पार करणाऱ्या महिलांचे. पदयात्रेला काही प्रमाणात यश मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर आहे. प्रवीण चिचघरे, यमराज बोधनकर, नीलाबाई ठाकरे, कपिला भसारकर, माधुरी तोरे, संगीता गेडाम या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपले अनुभव कथन केले.



श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांची कर्मभूमी चिमूर येथून पाच डिसेंबरला पदयात्रेला सुरवात झाली. भद्रावतीपासून तर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून एकत्र आलेल्यांनी दारूबंदीचे नारे देत पदयात्रा केली. भिसी मार्गावरून चिंचाळा या गावात पहिला मुक्काम झाला. महिला आपली पाच दिवसांची रोजीरोटी सोडून या पदयात्रेत सहभागी झाल्या. 10 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या पार्वताबाई सिडाम, मीराबाई गावतुरे, शांताबाई कोसरकर, पार्वताबाई व्याहाडकर, रुकमाबाई लोनबले व वल्लुबाई सीमोनकर, मोहुर्ले, धृपता नैताम आंच्यासह अनेक वृद्ध महिला धडाडीने या पदयात्रेत सहभागी झाल्या. 130 किलोमीटर अंतर पार करीत नागपुरात पोचल्यानंतर नागपुरातील अनेक नागरिक मदतीसाठी पुढे आले. दु:ख, वेदना, थंडी व अचानक आलेला पाऊस यातही हे पाच दिवस कसे गेले हे समजलेच नाही, असे महिलांनी सांगितले. या पदयात्रेमुळे शासनाला समिती गठित करावी लागली, याचा आनंद महिलांना आहे.



सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याच्या होत असलेल्या मागणीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाच्या निमित्ताने दारूबंदीवर झडलेली चर्चा अतिशय भावनिक पातळीवर गेली. महसुलाचा अट्टहास सोडून शासनाने सर्वत्र दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनेक आमदारांनी चर्चेच्या निमित्ताने केले. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीविषयी अशासकीय विधेयक सभागृहात मांडले. विधेयकावरील चर्चेच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारूबंदीच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.


2 कोटी लिटर मद्य रिचविले
चंद्रपूर - जिल्ह्यातील तळीरामांनी कमालच केली. 2009-2010 या आर्थिक वर्षात चक्क एक कोटी 83 लाख 85 हजार 835 लिटर मद्य रिचविले. त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा यावेळी तळीरामांनी 18 लाख लिटर मद्य अधिक पचविले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2008-2009 या आर्थिक वर्षात एक कोटी 65 लाख 90 हजार 896 लिटर मद्याची विक्री झाली आहे. 2009-2010 या आर्थिक वर्षात ही आकडेवारी 18 लाख लिटर जास्त आहे. अवैध दारूप्रकरणातील 2009 मध्ये 673 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. याअंतर्गत 307 जणांना अटक झाली. 365 अद्याप फरार आहेत. सहा लाख 46 हजार 130 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2010 मध्ये मात्र अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यामध्ये घट झाली. 612 प्रकरणे नोंदविली गेली. अटक केलेल्या आरोपींची संख्याही घटून 267 एवढी झाली. फरार आरोपींची संख्या 345 एवढी आहे, तर पाच लाख 33 हजार 869 रुपयांची मालमत्ता अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली आहे.
2009 -2010 या आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री देशी दारूची झाली. तब्बल एक कोटी 30 लाख 29 हजार 173 लिटर देशी दारू पिऊन "स्वदेशी'बद्दल तळीरामांनी आपले प्रेम दाखविले. विदेशी मद्याची विक्री 29 लाख 34 हजार 781 लिटर एवढी झाली. त्या खालोखाल बिअरचा घोट तळीरामांनी घेतला. 24 लाख 21 हजार 811 एवढी बिअर या वर्षभरात रिचविली गेली. 2008-2009 मध्ये तळीरामांनी देशीला पसंती देत एक कोटी 21 लाख 62 हजार 968 लिटर मद्य फस्त केले. मात्र, विदेशी दारूची विक्री 24 लाख 64 हजार 103 लिटर झाली होती. बिअर 19 लाख 63 हजार 825 लिटर विक्री झाली. नव्या वर्षाचे स्वागत तळीराम मद्याचे घोट घेऊन करतात. वर्षभर न पिणारेही एकच प्याला म्हणून या दिवशी हात लावतात. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दारूची विक्री सर्वाधिक होते. डिसेंबर महिन्यात देशी, विदेशी आणि बिअर मिळून 25 लाख 88 हजार 431 लिटरची विक्री झाली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला व्यसनमुक्तिचे विचार दिले. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले.

Wednesday, March 02, 2011

शिकारीच्या नादात बिबट्या अडकला फासात

शिकारीच्या नादात बिबट्या अडकला फासात

CHANDRAPUR: An agitated leopard trapped in a wire snare mauled an ACF involved in the rescue operation on the outskirts of village Pardi in Gondpipri tehsil on Tuesday morning. The ferocious beast managed to snap the wire of the trap and fled with the noose still around its waist, leaving the injured forest officer behind. Injured ACF Harishchandra Kamble is reported to be out of danger.



चंद्रपूर) - जंगली जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात रानडुक्‍कर अडकले. त्यानंतर या रानडुकराची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्याही या फासामध्ये अडकला. तब्बल आठ तासांच्या प्रयत्नांतरही बिबट्याला वनविभागाला जेरबंद करता आला नाही. उलट बिबट्याला पकडण्यासाठी आलेला एक वनकर्मचारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. ही थराथरक घटना गोंडपिंपरी तालुक्‍यातील पारडी शेतशिवारात आज (मंगळवार) घडली.



चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्‍यातील तोहोगाव येथे पहाटे चार वाजताच्या सुमाराला गावाजवळून बिबट्याच्या डरकाळ्या गावकऱ्यांना ऐकू येण्यास सुरवात झाली. गावकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला. तेव्हा दिसलेले दृश्‍य त्यांच्यासाठी धक्कादायक होते. रानडुकराच्या शिकारीसाठी आलेला बिबट्या फासात अडकलेला होता. सुरवातीला रानडुक्‍कर फासात अडकले. त्याची शिकार करताना बिबट्यावर फास आवळला होता. दरम्यान बिबट्याच्या हल्लात रानडुक्‍कर ठार झाले होते. यानंतर लाठी येथील वनसंरक्षक संजय कोवे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तोपर्यंत पारडी, वामनपल्ली, लाठी, सरांडी, वेजगाव, वेडगाव या गावांत घटनेची माहिती पोचली. या गावातील गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती लाठीचे ठाणेदार गौंड यांना मिळताच सहकाऱ्यांसोबत ते घटनास्थळी पोचले. बिबट्याला पकडण्यासाठी कार्यवाही सुरू झाली. बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्‍शन प्रथम देणे गरजेचे असताना वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या अधिकच चवताळला. कांबळे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर बिबट्या फासासह शेताच्या दिशेने पसार झाला. चवताळलेला बिबट्या जंगलात न जाता शेताच्या दिशेने गेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.