काव्यशिल्प ऑनलाईन मुंबई:
आता पर्यंत तुम्ही ट्रक, कार, मोटरसायकल किंवा एखाद्या मोठ्या गाडीला धक्का मारत असल्याचं पाहिलं असेल. पण भल्या मोठ्या ट्रेनला धक्का देऊन फलाटावर आणल्याचं कधी पाहिलयं का?...असा प्रकार घडल्याचं सांगितल्यावर विश्वास बसेल का?...नाही ना...पण तसं घडलय...
मुंबई सेंट्रल- लखनऊ सुविधा एक्स्प्रेसला गुरूवारी धक्का मारण्यात आला. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता १६ कोचची ही एक्स्प्रेस फलाट क्रमांक २ वरून निघाली. पण पुढे लाल सिग्नलवर थांबण्याऐवजी सरळ पुढे निघून गेली. ज्या ट्रॅकवर ही एक्स्प्रेस गेली तो डेड एंड होता. त्यावर कोणतीच ओव्हर हेड वायर नव्हती. त्यामुळे वीजच नसल्याने इंजिनला पाठी खेचता येत नव्हतं आणि इंजिनला पाठी खेचताही येतं नव्हतं. त्यामुळे ही एक्स्प्रेस पुन्हा पटरीवर आणण्यासाठी पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल मॅनेजर मुकूल जैन यांनी एक शक्कल लढवली आणि रेल्वे पटरीवर आली.
गाडीला धक्का मारून पटरीवर आणल्यास १० हजार रूपयांचं बक्षीस वाटप करण्याची घोषणा मी केली आणि हमालांपासून गॅरेज वॅगनचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीसही गाडीला धक्का मारू लागले. ४० कर्मचाऱ्यांनी ही गाडी धक्का मारत मारत फलाटावर आणली, असं जैन यांनी सांगितलं