चंद्रपूर:
आज सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान विद्या टेम्भूर्णे हि महिला घंटा गाडी घेऊन घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी जात असताना या महिलेला बागला चौक परिसरात भरधाव ट्रक ने जबर दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार सकाळी हि महिला घंटा गाडी घेऊन बागला चौक मधून बाबुपेठकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने तिला जबर धडक दिली त्यात तिचा दुर्दैवी मृत्यु झाला.विद्या टेम्भूर्णे अस् या महिलेच नाव आहे. काही नागरिकांनी ट्रक चा पाठलाग करून ट्रक चालकाला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर विद्या टेम्भूर्णे या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. विद्या टेम्भूर्णे हि महिला महानगर पालिका मध्ये घंटा गाडी च्या साहाय्याने घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम करीत होती. तिला २ मुलं आहेत. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविल्याने या महिलेला महानगर पालिकेने तात्काळ १० लाखांची मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली त्यानंतर ६ ते ७ लाखापर्यंत त्या महिलेला मदत देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले .