সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, October 13, 2017

अखेर भाजपाच्या संदीप गवईंची स्वप्नपूर्ती



नागपूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदार संघातील प्रभाग ३५ च्या ‘अ’ (अनूसूचित जाती) मध्ये झालेली पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. विजयासाठी भाजपाच्या पदाधिका-यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, मतदानाची टक्केवारी घटल्याने भाजपाची धाकधुक वाढली होती. अखेर काट्याच्या लढतीत भाजपाचे उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज भोरात यांचा ४६३ मतांंनी पराभव केला. गवई यांना ५७११ मते मिळाली तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली.
गुरुवारी सकाळी १० वाजता सीताबडीं येथील  बचतभवन येथे मतमोजणी झाली.  मतमोजणीच्या अखेरच्या फेरीपर्यत काँग्रेसने चांगली टक्कर दिली. अखेर गवई विजयी झाल्याचे घोषित होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनामुळे  जागा रिक्त झाल्याने जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.  आठ उमेदवार मैदानात होते. भाजपाचाच उमेदवार विजयी होईल. असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता. दोन आठवड्यापासून या प्रभागात  जोरदार प्रचार मोहीम राबविली. तब्बल १२० कॉर्नर बैठका घेतल्या. मात्र २४.३३ टक्केच मतदान झाल्याने धाकधूक वाढली होती. काँँग्रेसकडूनही विजयाचा दावा केला जात असल्याने निवडणूक  निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  प्रभागातील  ५७,६९३ मतदारांपैकी १४,०३५ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला . यापैकी गवई यांना ५७११ तर थोरात यांना ५२४८ मते मिळाली. बसपाच्या नंदा झोडापे यांना १६७५, अपक्ष गौतम कांबळे  यांना ६६८, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे सहदेव नारनवरे यांना १३०, अपक्ष  मनोज इंगळे  १४ ,वंदना जीवने ४२६,  तर  सुनील कवाडे यांना १५ मते मिळाली. १४७ मतदारांनी नोटाचा वापर केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.