प्रतिनिधी/
भारतात रुग्णांना रक्ताची गरज असताना त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्वतः रक्तदात्यांशी आणि रक्तपेढीशी संपर्क करून योग्य त्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध करून घ्यावे लागते. असं करत असताना त्यांना अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीचा विचार करूनच फेसबुक आपले नवीन फिचर आज पासून सुरू केले आहे. या फिचरमुळे ज्या लोकांना रक्ताची गरज आहे ते आणि रक्तपेढ्या कमी वेळात रक्तदात्यांपर्यंत पोहोचू शकतील.
फेसबुकने १ ऑक्टोबर ‘राष्ट्रीय रक्तदाता दिन’ चे औचित्य साधून या फिचरची सुरुवात केली आहे. या फेसबुक रजिस्ट्रेशन ला सुरवात झाली असून देशभरातून
चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये यूजरच्या न्यूज फीडवर एक मेसेज दाखवण्यात आला आहे ज्यात त्यांना रक्तदान करण्यासाठी रजिस्टर करण्याचे निवेदन करण्यात आले आहे. त्यात त्यांना आपल्या ब्लड ग्रुपची माहिती देण्याचा आग्रह करण्यात येईल तसेच त्यांनी आधी रक्तदान केले किव्हा नाही,तुमचा रक्तगट कोणता असल्यास त्याचीही माहिती तेथे भरावी लागणार आहे. ज्या लोकांना रक्ताची आवश्यकता आहे असे लोक एक विशिष्ट पोस्ट फेसबुकवर टाकू शकतील ज्यामध्ये आवश्यक रक्तगट, रूग्णालयाचे नाव आणि संबंधित व्यक्तीचा फोन नंबर ही माहिती शेअर करू शकतात.
इतर देशांप्रमाणेच भारतातही रुग्णांसाठी रक्ताची कमी नेहमीच भासते. बऱ्याचदा लोक रक्तदान करणाऱ्यांच्या शोधात असतात त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर करत असतात. याचाच विचार करून फेसबुकने हे नवीन फिचर लाँच केले आहे. या फिचरमध्ये रक्तदात्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. जर रक्तदात्याला स्वतःची माहिती देण्यास हरकत नसेल तर तोही पर्याय रक्तदात्यास उपलब्ध असेल. फेसबुकचे हे फिचर अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्येही उपलब्ध असेल. भारतात पहिल्यांदाच या फिचरची सुरुवात करण्यात आली आहे यामुळे करोड़ो लोक एकमेकांना मदत करू शकणार आहेत