सातवा वेतन आयोग लागू करवा आणि त्यासोबत विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरू केलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर चार दिवसानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.शुक्रवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आज सकाळपासून एसटी बस रस्त्यावर धावण्यास सुरवात झाली आहे
एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत मुंबई हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी सलग चौथ्या दिवसानंतर भाऊबीजेच्या दिवशी अखेर या संपास पूर्णविराम लावला.
चंद्रपुरात देखील शनिवारी सकाळपासून बस स्थानकात पुरवत असलेली गर्दी बघायला मिळाली .ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा चांगलाच फटका बसला होता.तर दुसरीकडे खाजगी बस ,ट्रॅव्हल्स चालकांची या काळात चांगलीच चांदी झाली होती.चंद्रपूर येथून मुल, सिंदेवाही मार्गे प्यासेंजर ट्रेन असल्या कारणाने ट्रेन मध्ये देखील चांगलीच गर्दी बघायला मिळाली होती मात्र चंद्रपूर नागपूर मार्गाने खाजगी ट्रॅव्हल्स चालक प्रवाश्यांची चांगलीच लूट करीत असल्याचे निदर्शनात आले होते.या काळात वरोरा ते नागपूर तिकीट हि नेहमीच्या तिकिटीपेक्षा दुप्पट होती.तर चंद्रपूर नागपूर नॉन एसी चे भाडे ५० रुपयाने महाग होते.
चंद्रपूर शहरातील एसटी महामंडळाचे १९७ चालक,१६३ वाहक,५६ मेकॅनिक,४२ प्रशासकीय अधिकारी,एक अधिकारी असे एकूण ४५९ तर जिल्ह्याचे एक हजार ८८५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. संप मागे घेतल्याने भाऊबिजेच्यादिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.