সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 30, 2013

तालुका निहाय टक्के वारी

तालुका निहाय टक्के वारी

चंद्रपूर  चंद्रपूर चा निकाल 70.32
तालुका निहाय टक्के वारी
चंद्रपूर    : ७४.९२  
बल्लारपूर    : ६८.९३
भद्रावती    : ५८.५०
ब्रम्हपूरी    : ७६.३०
चि‘ुर    : ६१.७३
गोंडपिपरी    : ६४.२६
कोरपना    : ७०.०९
‘ुल    : ७३.४४
नागभिड    : ७६.२९
पोभुर्णा    : ५७.४६
राजूरा    : ६०.९६
सावली    : ८०.७६
qसदेवाही    : ६९.०२
वरोरा    : ७०.८३
जिवती    : ६७.८६
बारावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी

बारावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी

मुंबई, दि. ३०- उच्चशिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर झाला. यंदा राज्यातून ७२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. तर कोकण विभागाने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही चमकदार कामगिरी करत अन्य विभागांना मागे टाकले.
बुधवारी सकाळी ११ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी विज्ञान, वाणीज्य आणि कला याविभागातील १२ लाख ७६ हजार ३५६ विद्यार्थी १२ वीच्या परिक्षेत बसले होते. यातील ९ लाख २५ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षी कोकण विभागाने लातूर,मुंबई, पुणे याविभागांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले होते. यंदाही कोकण विभागाने पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. या विभागाचा निकाल ८२.६२ टक्के लागला असून त्याखालोखाल कोल्हापूर (७८.६१ टक्के) आणि औरंगाबद (७७.८८ टक्के) या विभागांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (६५.०६) लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारल्याचे दिसते. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७८.८२ असून मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६७.८५ आहे.
निकालाची विभागनिहाय टक्केवारी

निकालाची विभागनिहाय टक्केवारी

निकालाची विभागनिहाय टक्केवारी
कोकण - ८५.८८
कोल्हापूर - ८४.१४
लातूर - ८३.५४
पुणे - ८१.९१
नाशिक - ७९.०१
मुंबई - ७३.१०
नागपूर - ७३.१०
बारावीचा निकाल जाहीर ।

बारावीचा निकाल जाहीर ।


राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ७९.९५ टक्के उत्तीर्ण
। निकालात मुलींची बाजी ।
८४.६ टक्के मुली उत्तीर्ण ।
८५.८८ टक्के निकाल देणारा कोकण विभाग राज्यात अव्वल ।
६ जूनला मिळणार गुणपत्रिका ।
बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल

पुणे - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप, उशिरा सुरू झालेले उत्तरपत्रिका तपासणीचे काम, अशी आव्हाने पेलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेत लावण्याचा "मुहूर्त' साधला आहे. गुरुवारी (ता. 30) सकाळी 11 वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात येईल.
सहा जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना तपशीलवार गुणांचे अभिलेख आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात येईल. याच दिवशी दुपारी तीनपासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असेल, तर मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर 17 जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येतील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणी करता येणार नाही, असे मंडळाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी कळविले आहे.

निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत (झेरॉक्‍स) देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी 19 जूनपर्यंत अर्ज करावेत. पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विभागीय मंडळाकडे अर्ज करावेत. परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी ऑक्‍टोबर 2013 आणि मार्च 2014 अशा दोन संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे गुंजाळ यांनी सांगितले.

मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव म्हणाले, ""कनिष्ठ महाविद्यालयांच्या 20 दिवसांच्या बहिष्कार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता; परंतु नंतर सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेत निकाल पूर्ण होण्यासाठी कष्ट घेतले. आंदोलन झाले नसते, तर किमान 10 दिवस आधी निकाल जाहीर करता आला असता. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालास उशीर झालेला नाही.''

येथे पाहा निकाल
http://mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org

फक्त एक एसएमएस
मोबाईलच्या मेसेज विंडोमध्ये टाइप करा MHHSC (स्पेस) तुमचा आसन क्रमांक आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

मदत हवी? फोन करा
020-25536712 / 020-25536783

विद्यार्थ्यांनो, घाबरू नका...
कमी गुण मिळालेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ते उपलब्ध असतील.
शरदचंद्र बोटेकर : 9822991391, रमेश पाटील : 9822334101, टी. एम. बांगर : 9763557131, एस. एल. कानडे : 9028027353, सुधीर खाडे : 9420542654.

अशी असेल प्रवेशप्रक्रिया
निकाल जाहीर झाल्यानंतर 15 ते 20 जूनपर्यंत बीए, बीकॉम आणि बीएस्सी या अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होतात. त्यापूर्वी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज विक्री. सहा जून रोजी निकालपत्र मिळणार असल्याने त्या दिवसापासून प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.
प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज विक्री सुरू झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत महाविद्यालयांना जागांच्या उपलब्धतेनुसार गुणांचा "कटऑफ' जाहीर करावा लागतो.
विद्यालयात उपलब्ध जागांपेक्षा अर्ज जास्त आले, तर गुणवत्ता यादी जाहीर करावी लागते. प्रत्येक महाविद्यालयास त्यानुसारच प्रवेश द्यावे लागतात.
प्रथम वर्षासाठी व्यवस्थापन कोटा नसतो. उपलब्ध जागांची खुला आणि आरक्षित गट यांच्यात विभागणी करावी लागते. त्या नियमांच्या आधारे प्रवेश द्यावे लागतात.
पहिली गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी दिला जातो. दाखल अर्जांची संख्या कमी असेल, तर दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. महाविद्यालयांच्या सर्व जागांवर प्रवेश पूर्ण होईपर्यंत गुणवत्ता यादी तयार करावी लागते.
एखाद्या संस्थेचे अकरावीपासून पदवीपर्यंत महाविद्यालय असेल, तर बारावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्याने त्याच महाविद्यालयात प्रवेश देणे बंधनकारक असते. त्यासाठी गुणवत्ता यादीची गरज नसते. उर्वरित जागा मात्र गुणवत्ता यादीनुसार भराव्या लागतात.

प्रवेशासाठी कागदपत्रे
प्रवेशाच्या प्राथमिक प्रक्रियेसाठी केवळ बारावीच्या निकालपत्राची छायांकित प्रत आवश्‍यक. प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बंधनकारक.
आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असेल, तर बारावीच्या निकालपत्राची छायांकित प्रत आणि जातीचा दाखला आवश्‍यक.

बारावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सर्व शाखांच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम आता बदललेला आहे. त्याची रचना करताना आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विचारात घेतले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील श्रेयांक मूल्यमापन पद्धतीशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी त्याचा चांगला उपयोग होईल.
- व्ही. बी. गायकवाड,  संचालक, विद्यापीठ आणि महाविद्यालये विकास मंडळ

प्रवेश अर्ज भरताना जवळ ठेवा
अर्ज भरायला जाताना गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याचा पुरावा.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर.
इतर क्षेत्रांमध्ये मिळविलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती बरोबर ठेवा.
प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरा
अर्ज भरताना गोंधळ होत असल्यास महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.
नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ अचूक लिहा.
इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
सुरवातीला अर्जाच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा, त्यानंतर मूळ अर्जात ती माहिती भरा.

महत्त्वाची संकेतस्थळे
तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी) www.dte.org.in
वैद्यकीय शिक्षणासंबंधी : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन www.dmer.org
औद्योगिक प्रशिक्षणासाठी : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासनwww.dvet.gov.in
पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ www.unipune.ac.in
बीटेक पदवी : भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई www.iitb.ac.in
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) www.upsc.gov.in
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) www.mpsc.gov.in

करिअरसाठी संधीच संधी...
एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएचएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीडीएस
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीएस्सी इन नर्सिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी (खासगीसाठी असोसिएट सीईटी)

बीव्हीएससी ऍण्ड एएच (पशुवैद्यकीय)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी

डीफार्म
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र

बीफार्म
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एमटी-सीईटी

बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई, एमटी-सीईटी

बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई/एमटी-सीईटी
महाराष्ट्रात एकूण अभियांत्रिकीच्या 70 शाखा आहेत. बारावी व जेईई/एमटी-सीईटी यांच्या गुणांवर प्रवेश.

बीई (कॉम्प्युटर/आयटी)
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, जेईई/एमटी-सीईटी

बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र (भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र)

बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी शास्त्र, महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा
संधी : संगणक उद्योग, संगणक प्रणाली क्षेत्रात
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एमएच-सीईटी एआर (खासगीसाठी एनएटीए-नाटा)

डॉक्‍टर
कालावधी - साडेपाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनईईटी

एनडीए
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एनडीए प्रवेश परीक्षा व एसएसबी मुलाखत
संधी : नौदल, वायू दल आणि भूदल

सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एसएसबी मुलाखत

नेव्हल इंजिनिअरिंग
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, एसएसबी मुलाखत

शिक्षण - बीएस्सी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट

शिक्षण - बीएस्सी (ऍग्री)
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र

शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
पात्रता : बारावी
संधी - एमबीए, पत्रकारिता, शिक्षण, ग्रंथालय शास्त्र, ललित कला, बॅंकिंग, विमा, रेल्वे.

शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
पात्रता : बारावी
संधी - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस

शिक्षण - बीएसएल (विधी)
कालावधी - पाच वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी
संधी - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, न्याय सेवा

डीटीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी

बीबीए, बीसीए, बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - कोणत्याही शाखेतून बारावी, महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा

हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट सीईटी

रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी
डिप्लोमा इन रबर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (विज्ञान)

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - कोणत्याही शाखेतून बारावी

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका
कालावधी - तीन वर्षे

ड्राफ्टमन (सिव्हिल/मॅकेनिकल)
कालावधी - दोन वर्षे

इलक्‍ट्रिशियन
कालावधी - दोन वर्षे

रेडिओ, टीव्ही मॅकेनिक
कालावधी - दोन वर्षे

रेफ्रिजरेशन, एसी मेकॅनिक
कालावधी - एक वर्ष

कॉम्प्युटर हार्डवेअर
कालावधी - एक वर्ष

टेक्‍स्टाईल डिझाईनिंग
कालावधी - एक वर्ष

Tuesday, May 28, 2013

कृष्णनगरात युवकाची निर्घृण हत्या

कृष्णनगरात युवकाची निर्घृण हत्या

चंद्रपूर  दि.२८ (प्रतिनिधी):
क्षुल्लक वादातून दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका मित्राने दुसèया मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णनगर येथे मंगळवार, २८ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कृष्णा चित्त मंडल (२३, रा. कृष्णनगर) असे मृताचे नाव आहे. तर, आकाश वासू सरकार (२६) असे आरोपीचे नाव आहे.
आकाश सरकार आणि मृत कृष्णा मंडल हे दोघे कृष्णनगरातील असून, दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध होते. कृष्णा मंडल हा फायनान्सवर गाडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक कृष्णा आणि त्याचा मित्र प्रवण चक्रवर्ती हे दोघे वॉर्डातीलच एका दुकानात थंडपेय पेत होते. दरम्यान, आरोपी आकाश सरकार तेथे आला. यावेळी दोघात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही मित्रांच्या मध्यस्थीनंतर वाद क्षमला. मात्र, आरोपी आकाशच्या डोक्यात मृतक कृष्णाच्या विरोधातील राग धगधगत होता.
बुधवारी, सकाळच्या सुमारास आकाश सरकार कृष्ण मंडलला मारण्याच्या इराद्यानेच त्याच्या घरी आला. त्यावेळी पुन्हा दोघात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपी आकाशने कृष्णावर लाकडी फडीने जोरदार प्रहार केला. यात कृष्णा गंभीररित्या जखमी झाले. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेची तक्रार मृतकाचा मावस भाऊ किशोर बारई याने रामनगर पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन रामनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मुटकुळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व आरोपीस अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Sunday, May 26, 2013

रोहिणी लागताच चंद्रपूरचे तापमान घटले

रोहिणी लागताच चंद्रपूरचे तापमान घटले

बळीराजाला मृगाची प्रतीक्षा
चंद्रपूरचे तापमान- ४२ अंश 

चंद्रपूर : रोहिणी नक्षत्राचा पाऊस पिकांना लाभदायक ठरणारा नसला, तरी प्रखर उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांची सुटका होईल. शेतक-यांना आता मृगाची प्रतीक्षा लागली आहे.
मृग नक्षत्र हे सहसा सात जून रोजी सुरू होते. परंतु, यावर्षी मृग प्रवेश आठ जून रोजी पहाटे ५.३६ वाजता होत आहे. वाहन हत्ती असल्यामुळे हे नक्षत्र भरपूर बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील चार वर्षांत मृगाचा पाऊस उशिरा झाल्याने शेतकèयांना मृगपेर साधलेली नव्हती. यावर्षी २० जूनपर्यंत सर्वदूर वृष्टी अपेक्षित आहे. पंचांगकत्र्यांच्या मते मागील पाच वर्षांतील पाऊसकाळ पाहता खंडित वृष्टीचे प्रमाण अधिक राहिले आहे. यावर्षी पाऊस सर्वत्र दर्शविला असल्याने जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत सरासरीच्या ५५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.
२५ मे रोजी सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी रोहिणी नक्षत्राचा प्रवेश झाला. या नक्षत्राच्या शेवटच्या चरणात वादळी पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पुष्य, एषा, मेघा, पूर्वा व स्वाती हे नक्षत्र निश्चितपणे व भरपूर बरसणार आहेत. वर्षाकाळातील ११ नक्षत्रांपैकी ९ नक्षत्रे पावसाची असतात. सहसा पाच नक्षत्रे जरी बरसली, तरी शेती चांगली होऊ शकते.
२५ मेपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ होत असून, याचे वाहन ङ्कमोरङ्क आहे. हे नक्षत्र सहा जूनपर्यंत राहणार आहे. सात जून रोजी मृग नक्षत्रास प्रारंभ होणार आहे. शेतकèयांनी आपल्या शेतीची मशागत पूर्ण केली आहे. यावर्षी पीक चांगले यावे म्हणून काही शेतकèयांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बियाणे खरेदी केले. उन्हाळ्याचे दिवस नागरिकांनी प्रखर उन्हात कसेबसे काढले असून, पाऊस पडेपर्यंत नागरिकांना अजून उन्हाचा सामना करावा लागणार आहे. प्रखर उन्हामुळे जमीन तापली असून, रोहिणी नक्षत्राचा पाऊस जमिनीतच मुरला जाणार आहे. पावसाळा जवळ आला असला, तरी उन्हाचा पारा कमी होण्याचे नाव घेत नाही. आता रोहिणी नक्षत्राचा ङ्कमोरङ्क पाऊस आणतो की, आल्यापावली ङ्कथुई थुईङ्क करत वनात जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सर्वसाधारणपणे २० मे रोजी मॉन्सून अंदमानात पोहोचतो. मॉन्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असते. यावर्षी मात्र तीन जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर अंदमानातील नैऋत्य मोसमी वारे स्थिर झाले असले, तरी त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झाले नसल्याने आणि पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हे वातावरण तयार होण्याची शक्यता नसल्याने बेमोसमी पावसाचीही शक्यता नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा कमी कमी होत असताना आणि पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र बनत असताना साèयांचेच पावसाकडे डोळे लागले आहेत.
रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्याने वातावरणात थंडावा येऊ लागला आहे. उष्णतेची दाहकता कमी होत असून, पारा घसरू लागला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात होत आहे. खते, बी-बियाणे व शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकèयांची लगबग दिसून येत आहे. घरांचे छत व धाबे, इमारतींचे टेरेस आदींच्या स्वच्छता कार्यास सुरुवात झालेली आहे.

अंदाज वर्तविण्याची जुनी परंपरा
नैऋत्य मॉन्सून वाèयाच्या आगमनासोबतच रोहिणी नक्षत्राची सुरुवात होते. या काळात कावळा, पावशा (तितर) व चातक या तीन पक्ष्यांच्या कार्यात मोठे बदल होत असतात. या बदलांना संकेत मानून अंदाज वर्तविण्याची जुनी परंपरा आहे. कावळ्याचे घर झाडाच्या शेंड्यावर असेल, तर पाऊस कमी होण्याचे संकेत मानले जाते. झाडाच्या मध्यभागी असल्यास पावसाचे प्रमाण साधारण मानले जाते.

शेती परवडेना
शेती मशागत महागली असून, लागवड खर्चातही वाढ झाली. वाढता उत्पादनखर्च, हवामान बदल यामुळे कमी होणारे उत्पन्न आणि पीक हाती आल्यावर घसरत जाणारे बाजारभाव यामुळे शेतीव्यवसाय परवडेनासा झाला आहे. इंधनाचे वाढते दर, ट्रॅक्टरच्या व त्याच्या साहित्याच्या वाढत्या किमती यामुळे ट्रॅक्टरची नांगरणी, वखरणी, पेरणी करण्याचे दरही वाढले आहेत. मॉन्सून सुरू होण्यासाठी १५-२० दिवसांचा अवधी असून, शेतीच्या मशागतीने वेग घेतला आहे. परंपरागत शेती करताना बळीराजाने यांत्रिकीकरणाची जोडही दिली आहे. आता बैलजोडी व लोखंडी नांगर कालबाह्य झाले असून, बरेच शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करीत आहेत.
----------------
मे महिन्यातील तापमान२६-४२   २५- ४५    २४-४६२३-४७.३२२- ४८.२२१- ४८.२२०- ४७.९१९- ४७.९१८ - ४५.६१७ - ४५.५१६- ४२.६
प्राणीगणनेत १५९ वन्यप्रेमींचा सहभाग

प्राणीगणनेत १५९ वन्यप्रेमींचा सहभाग


चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही परिक्षेत्रातील १५२ पाणस्थळावर २५ व २६ मे रोजी प्राणिगणना करण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि १५९ वन्यप्रेमी या गणनेत सहभागी झाले होते. बहुतेक पाणस्थळावर वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, चांदी अस्वल, सांबर, भेकर, चितळ, मोर, रानकुत्रे, सायाळ इत्यादी प्राणी आढळून आले.

प्रगणनेत पाणवठ्यावर येणा-या वन्यप्राण्यांची मोजदाद करण्यात आली. पाणवठ्याची स्थितीही जाणून घेण्यात आली. मोजणीमध्ये सहभागी होण्याकरिता पुणे, मुंबई, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा येथून अनेक अशासकीय संस्थांनी व व्यक्तींनी आपले अर्ज पाठविले होते. अर्जाची छाननी करून अनुभवी व्यक्ती व संस्थामधील १५९ लोकांना पाणस्थळ मोजणीमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली. यात १२ संस्थांचे ८५ व्यक्ती व वैयक्तिकरीत्या सहभागी झालेले ३९ व्यक्तींचा समावेश होता. मोजणीत चंद्रपूर येथील ८४, नागपूर २४, पुणे ६, मुंबई ६ व इतर ४ व्यक्ती सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा तसेच पत्रकारांचासुद्धा सहभाग होता. निवडलेल्या व्यक्तींना व्यवस्थापनातङ्र्के प्रकल्पात प्रवेश देण्याकरिता त्यांची छायाचित्र असलेले प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. प्रत्येक पाणस्थळाजवळील मचाणीवर एक अशासकीय व्यक्ती व एक स्थानिक वनकर्मचारी प्रगणनेकरीता देण्यात आला होता. प्रगणना सुलभरीत्या व्हावी म्हणून त्यांना वन्यप्राण्यांची छायाचित्र असलेले प्रपत्र नोंदणी करण्याकरिता देण्यात आले. प्रगणना २५ तारखेला सकाळी १० वाजता सुरू करण्यात येऊन २६ रोजी सकाळी १० वाजता पूर्ण करण्यात आली. प्रगणना पूर्ण करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांनी विशेष समन्वय ठेवला. सुजय दोडल, एस.व्ही. माडभूषी, सचिन qशदे, बापू येळे, एन.डी. लेनेकर, बी.एस. पडवे, श्री. गजभिये व क्षेत्रीय कर्मचारी यांनीही सहकार्य केले.
कैद्याने केला प्राणघातक हल्ला

कैद्याने केला प्राणघातक हल्ला

चंद्रपूर - जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका खुनाच्या कैद्यावर दुस-या एका कैद्याने दाढी करण्याच्या धारदार वस्त-याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. जखमी  स्थितीत या कैद्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवडाभराआधी या कारागृहातून २ कैद्यांनी प्रचंड उंच भिंत ओलांडून पळ  काढला होता. या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
 चंद्रपूर जिल्हा कारागृहात आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. या कारागृहात काही कैद्यांची दाढी करण्यासाठी न्हावी बोलाविले गेले होते. दरम्यान खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या शेख अफजल शेख अजीज याची दाढी सुरु असतानाच एक अनोळखी कडी वेगाने अजीज जवळ आला व न्हाव्याकडील वस्त-याने अजीजच्या पोटावर सपासप वार केले. काही कळायच्या आतच अजिज रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला लगेच चंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजीजच्या पोटावर व गळ्यावर धारदार वस्त-याचे वार असून सामान्य रुग्णालयात त्याच्यवर उपचार सुरु आहेत. हल्लाग्रस्त कैद्याने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांआधी अजीजची कारागृहातील काही पोलिस रक्षकांसोबत वादावादी झाली होती. त्याचा राग मनात ठेवून या राक्षकानीच अनोळखी कैद्यांकरावी आपल्यावर हल्ला करविला असल्याचा आरोप केला आहे. 
V/O 2) आठवडाभरापूर्वी या कारागृहातून २ कैद्यांनी उचं भिंत ओलांडून पळ  काढला  होता. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. याप्रकरणी ३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.  त्यातच हा हल्ल्याचा प्रकार घडल्याने या कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्हे मिळून चंद्रपुरात एकाच कारागृह आहे. या कारागृहात अनेक नक्षल कैदी जेरबंद आहेत. आता सुरक्षा व्यवस्थेला एवढे मोठे खिंडार पडल्याने तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

धुनी तरुणाई' या पुस्तकाचा २३ जून रोजी  लोकार्पण सोहळा

धुनी तरुणाई' या पुस्तकाचा २३ जून रोजी लोकार्पण सोहळा

जळगाव य- २३ जून. रमेशचा स्मृती दिन. रमेश बोरोले संघर्ष वाहिनीचा कार्यकर्ता.
आमचा जिवाभावाचा मित्र. संजय पतंगेच्या अंत्यसंस्कारांला हजर राहाण्यासाठी भुसावळ आणि जळ्गावच्या मित्रासोबत भुसावळहून औरंगाबादकडे निघाला होता. रस्त्यात गाडीचा अपघात झाला. त्यात तो गेला ! रमेशला जाउन आता अकरा वर्षे होत आलीत. आम्ही नुकतेच काढलेले 'धुनी तरुणाई' हे पुस्तक वाहिनीतील दिवंगत सहका-यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. या पुस्तकात शैला (रमेशची पत्नी)चाही लेख आहे. शैला आणि भुसावळचे मित्र दर वर्षी २३ जूनला रमेशचा स्मृतिदिन पाळतात. या वर्षी त्या दिवशी जळगावला 'धुनी तरुणाई' या पुस्तकाचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने या पुस्तकावर परिसंवाद होइल. धुनी तरुणाई-
जे. पी. आंदोलनात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील १० कार्यकर्त्यांचे आत्मकथन. संपादक- मिलिंद बोकील व अमर हबीब
सहभाग- रजिया पटेल (पुणे), अरुणा तिवारी (जळगाव), चंद्रकांत वानखडे (अमरावती, नागपूर), मोहन हिराबाई हिरालाल(चंद्रपूर), भीमराव म्हस्के (शिरपूर, धुळे), शोभां शिराढोणकर (नांदेड, औरंगाबाद), कुंजबिहारी (भुसावळ), शैला सावंत (भुसावळ), शेषराव मोहिते (लातूर) आणि अमर हबीब (अंबाजोगाई) प्रस्तावना- मिलिंद बोकील (पुणे) 
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी (पुणे)
पाने 160 किंमत 150 रुपये
सवलत मुल्य : 100 रुपये
प्रकाशक- परिसर प्रकाशन, अंबर, हौसिंग सोसायटी, अंबाजोगाई-431517
कार्यक्रम-
२३ ला सकाळी भुसावळ येथे १० ते १ या वेळात एक चर्चा सत्र होइल.
संध्याकाळी ५ वाजता जळगावला 'धुनी तरुणाई'चा लोकार्पण सोहोळा होइल. त्या
करीता वासंती दिघे, सुधाकर जाधव, शेखर सोनाळकर, मोहन हिराबाई हिरालाल,
भीमराव म्हस्के, श्रीराम जाधव, जयंत दिवाण, देवेंद्र आंबेकर, प्रकाश
बोनगीरे, आदी मित्रानी, ते येणार आहेत असे सांगितले आहे. बाकीच्यांशी
संपर्क केला जात आहे.
८०च्या दशकातील चळवळीतील कार्यकर्त्यांची ही पुन्हा भेट आहे. त्त्यातून
काय निर्माण होतंय ते पाहु…
शेखर (9823293938), वासंती (9823376755),
शैला (9423509221) मी (9422931986)
काही सुचना असतील तर सांगा…
छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मुलाचा मृतदेह सापडला

छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मुलाचा मृतदेह सापडला

टॉप स्टोरी

हल्ल्यातील मृतांची संख्या २५

हल्ल्यातील मृतांची संख्या २५

रायपूर - कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर माओवाद्यांनी शनिवारी (ता. 25) सायंकाळी केलेल्या हल्ल्यानंतर अपहरण करण्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह आज (रविवार) सकाळी छत्तीसगडच्या जगदलपूर जिल्ह्यातील दरबा गाती येथील जंगलात सापडला. त्यापूर्वी शनिवारी रात्री पक्षाचे ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा व माजी आमदार उदय मुदलियार ठार झाले, तर ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्‍ल गंभीर जखमी झाले असून, त्यांना तीन गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या २५ झाली आहे. 
http://chandrapurnews.blogspot.in/

Saturday, May 25, 2013

 आदर्श व्यक्तींच्या सत्काराने साजरा केला वाढदिवस

आदर्श व्यक्तींच्या सत्काराने साजरा केला वाढदिवस

चंद्रपूर- आदर्श व्यसनमुक्त, सुसंस्कृत समाज घडविण्याच्या उद्देषातून सुरू करण्यात आलेल्या समाजसुधारक न्यासतर्फे देशभरात अभिनव उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमातून माननीय नितीन पोहाणे यांच्या वाढदिवासानिमीत्य 20 मे 2013 रोजी चंद्रपूर येथे विविध क्षेत्रातील समाजसुधारक आदर्ष व्यक्तींचा सत्कार केला असून यांच्या वाढदिवासानिमीत्य मुंबई, दिल्ली, नागपुर, नासिक, नांदेळ, कलकत्ता, हैदराबाद येथेही उत्कृश्ठ ऑटो सपर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात विविध स्पर्धकांनी भाग घेतला होते.
     चंद्रपुरात स्थानिक चांदा क्लब मैदानावर जिहîातील सर्वच क्षेत्रातील समाजसुधारक आदर्ष व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात नागरिकांनी सुचविलेल्या व्यक्तीना आदर्ष व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात आदर्ष सी. बी. आय. अधिकारी म्हणून हेमंत खराबे, आदर्ष पोलीस अधिकारी म्हणून संतोश रामचंद्र मिटकुरे व थोरात साहेब, आदर्ष ट्राफीक नियंत्रण कर्मचारी  म्हणून सुरेश सातपुते व विकी गहलोद, आदर्ष ट्राफीक नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. पुडलीक सपकाळ साहेब, आदर्ष आर. टी. ओ. अधिकारी म्हणून श्री बावीसकर साहेब, आदर्ष डॉक्टर म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. वासुदेव गाडेगोणे, डॉ. घाटे व डॉ. प्रेरणा कोलते, आदर्ष अॅडव्होकेट म्हणून अॅड. बुटीले, आदर्ष  इंडस्ट्रीयलीस्ट म्हणून अमोल चकनलवार
व हेमंत कुलकर्णी, आादर्ष कामगार म्हणून अनुप रामनारायन पाल व श्रीकांत माहुलकर, आदर्ष वक्ता म्हणून षाम धोपटे, आदर्ष षिक्षीका म्हणून सै. वैशली गेडाम, आदर्ष प्राचार्य म्हणून डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत व डॉ. जाकीर हुसेन षेख, आदर्ष प्राध्यापिका म्हणून पदमरेखा धनकर, आदर्ष प्राध्यापक म्हणून इसादास भडके, आदर्ष अधिकारी म्हणून आषीतोश सलील, रवी गीते व प्रवीण मोर, आदर्ष विदîाार्थीनी म्हणून भाग्यश्री तांबोळी, आदर्ष मुख्याध्यापीका म्हणून अल्काताई ठाकरे, आदर्ष मुख्याध्यापक म्हणून सुर्यकांत भगवान खनके, आदर्ष पत्रकार म्हणून बाळु हनगुंद, आदर्ष षेतकरी म्हणून गुलाबराव सखाराम बावणे, आदर्ष नागरीक म्हणून कुशल मेश्राम, आदर्ष समाजसेवक म्हणून रमजान खान पठाण अश्रफी, तिलक काषीनाथ बांगडे व श्रीराम पान्हेरकर, आदर्ष समाजसेविका म्हणून प्रभाताई चिलके, आदर्ष चित्रकार म्हणून प्रषांत मांर्कडेवार, आदर्ष युवा म्हणून योगेश रामदास देवतळे, आदर्ष अपंग खेळाडु  म्हणून थुल साहेब, आदर्ष पुढारी म्हणून योगेश आपटे, आदर्ष ग्रामपंचायत म्हणून कोसरसार, आदर्ष सरपंच म्हणून सै. मंगला घनशम येनुरकर, आदर्ष खेळाडु म्हणून समीर षेख, आदर्ष नगराध्यक्ष म्हणून रमेशभाऊ कोतपल्लीवार, आदर्ष नगरसेवक म्हणून आकाश साखरकर, वसंत देशमुख व अनिल खनके, आदर्ष अभियंता म्हणून विलास बेजावार, आदर्ष स्त्री म्हणून अल्का कुसळे, आदर्ष साहित्तीक म्हणून अषोक पवारव आषिश देव, आदर्ष ऑटो चालक म्हणून सुबोध चैतुजी पाटील, आदर्ष मुर्तिकार म्हणून गणेश मंचलवार, आदर्ष संस्था म्हणून ज्ञानार्चना, आदर्ष कर्मचारी म्हणून बाबा खनके व मोहन हलमारे, आदर्ष आई म्हणून श्रीमती उशाताई हजारे, आदर्ष पत्नी म्हणून प्रतिभा राजेश जंगम, आदर्ष जेश्ठ नागरीक म्हणून विलास इसाक मानकर, प्रभाकर गणपतराव अगळे व रंगाचारी राघवाचारी माडभुशी आदिचा स्मृतीचिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
     याच बरोबर उत्कृश्ठ ऑटो स्पर्धा आयोजित केली होती व या सर्व कायक्रमाचे प्रमुख पाहुणे सी. बी. आय हेमंत खराबे व आदर्ष ट्राफीक नियंत्रण अधिकारी श्री. पुडलीक सपकाळ साहेब याच प्रमाणे कायक्रमाचे अध्यक्ष अविनाश षेंडे व पहुण्यांच्या रूपात अष्विनी खोब्रागडे, रंजीत डवरे, सुनिता गायकवाड, अषोक देवगडे, रमजान खान पठाण अश्रफी साहेब, इलीयाज षेख, विना पोहाणे, सै. प्रियदर्षनि पोहाणे, आनंद कार्लेकर हे उपस्थित होते. हा उपक्रम मागील वशर््ीपासुन त्यांनी सुरू केला असून, देशभरातील मुख्य शहरातही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृश्ठ ऑटो स्पर्धेद्वारे ऑटोचालकांना समाजसुधारणेत सहभागी करून घेणे, जे लोक व्यसनाधीन आहेते, त्यांच्याबद्दल अनेकजण वाईट बोलतात. मात्र, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न होत नाही. अषांच्या सुधारणेसाठी आाणि व्यसनमुक्त व्यक्ती बनविण्यासाठी समाजसुधारक न्यासतर्फे प्रयत्न केले जात असुन त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामीण व शहरी असे विभाग पाडण्यात आले होते. शहरी विभागात तिन पारितोशीत देण्यात आले आणि पारितोशाचे प्रथम मानकरी सुनिल पाटील (बाबुपेठ) द्वितीय मानकरी विजय चौरे (जटपुरागेट) तृतीय मानकरी राजेद्र हजारे (जटपुरागेट) हे ठरले. तसेच ग्रामीन विभागात देखील तिन पारितोशीत देण्यात आले आणि पारितोशाचे प्रथम मानकरी रमन जरिया (राजुरा) द्वितीय मानकरी रामा नक्षीने (वरोरा) तृतीय मानकरी सुरज भटकर (वरोरा) हे ठरले.
आदर्ष व्यक्तींचा सत्कार करतांना सुसंस्कृत, सुसस्भ व सर्व नियमांचे पालन करणारे, मदतीस धावून येणारे, गरजूंना मदत करणाÚया ऑटोचालकांचा सुध्दा यावेळी सत्कार करण्यात आला. 
यावेळी समाज सुधारणेचे प्रणेते माननीय नितीन पोहाणे यांच्या छायाचीत्राचेही अनावरण करण्याात आले. त्याचप्रमाणे व्यसनमुक्त सुसंस्कृत घडविण्याच्या कार्यात सदैव वचनबध्द राहु असे आवाहनही माननीय नितीन पोहाणे यांनी केले.याषिवाय सकाळी 10 वाजतापासून रक्तदान षिबीरही यशस्वी रित्या पार पाडण्यात आले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या करिता समाज सुधारक न्यासचे सदस्य जाकीर षेख, जाहीर षेख, साजिद षेख, बाबु सरकार, अमोल कडुकर, राजु गिरी, रमेश काहिलकर, दिपक षिर्पुरवार, बंडु भगत, अनुप सरकार, मोहोद्दीन हुसेन,राजु साळूंखे, सुयोग देवगडे, अभिजीत साखरकर, संजय वाटेकर, जितेद्र चौधरी, राजु काहिलकर, सचिन कुंभलकर, भैय्याजी उईके, राजु झाडे, विनोद डफ, कारियाजी, असलम खान पठान, सै. कार्लेकर, धिरज चौधरी, सुनिल मुन, कमलेश दाहट, षालिनी भुते, कल्पना करमनकर, संदीप घरडे, अविनाश मेश्राम, निलेश डंभारे, दिपाली गुरनुले, पवन खनके, वैशली मुजनकर,यांनी अथक परिश्रम केले व त्याचप्रमाने परिक्षकांची भुमिका प्रमाणिकपणे अविनाश षेंडे, रमेश मुन, याोगराज गोवर्धन, राजु मोहुर्ले, प्रषांत वानखेडे, बळीराम षिंदे, मोक्षवंत लोहकरे, प्रभाकर हरेकम यांनी पाळल्यामुळे बक्षीस वितरणही पारदर्षी व यशस्वी झाले. 

   
(उत्कृश्ठ ऑटो स्पर्धेच्या वेळी धडपड करतांना मा. नितीन पोहाणे व प्रमुख पाहुणे अथिती गण)
    (समाज सुधारणेचे प्रणेते मा. नितीन पोहाणे यांच्या छायाचीत्राचे अनावरण करतांना मा. नितीन पोहाणे, कैशल कारीयाजी व प्रमुख पाहुणे अथिती गण)
 (व्यसनमुक्त सुसंस्कृत घडविण्याच्या कार्यात सदैव वचनबध्द राहु असे आवाहन करतांना मा. नितीन पोहाणे)
 (आदर्ष संस्था म्हणून ज्ञानार्चना या संस्थेला पुरस्कृत करतरंना मा. नितीन पोहाणे व प्रमुख पाहुणे अथिती गण)
 (मुबईत पुश्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार ऑटो चालकाचे स्वागत करतांना समाज सुधारक न्यासचे समाज सुधारक)
 (नषिक मध्ये पुश्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार ऑटो चालकाचे स्वागत करतांना समाज सुधारक न्यासचे समाज सुधारक)

(नांदेळ मध्येही पुश्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार ऑटो चालकाचे स्वागत करतांना समाज सुधारक न्यासचे समाज सुधारक) 
(नागपुरात देखील पुश्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व प्रमानपत्र देऊन सत्कार ऑटो चालकाचे स्वागत करतांना समाज सुधारक न्यासचे समाज सुधारक)

प्राणी गणनेत पत्रकारही

प्राणी गणनेत पत्रकारही




चंद्रपूर- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रात वन्यप्राणी प्रगणना केली जाणार आहे . यासाठी वनविभागाचे सुमारे २५० अधिकारी - कर्मचारी या कामासाठी गुंतले असून १५२ अशासकीय स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे . यंदा प्राणी गणनेत चंद्रपूर शहरातील हिंदी इंग्रजी आणि मराठी पत्रकार आणि टीव्ही माध्यमांचे  प्रातिनिधी सहभागी झाले आहेत
वन्यप्राणी प्रगणना शनिवारी सकाळी १० वाजतापासून ताडोबा , मोहर्ली व कोळसा वनपरिक्षेत्रात होणार असून ती रविवारी सकाळी १० वाजतापर्यंत चालणार आहे . पाणवठ्यांजवळील मचाणींवर बसून ही प्रगणना होणार आहे . प्रत्यक्षात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना केली जाणार आहे . प्रगणना सुरू असताना पर्यटकांना प्रकल्पात प्रवेशबंदी नसून त्यांचे पर्यटन सुरू राहणार आहे . मोहर्ली सभागृहातील ८० मार्गदर्शक ( गाईड ) यांना ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते शुक्रवारी संपूर्ण गणवेश वाटप करण्यात आले .
 चंद्रपूर- 46.0 तापमान

चंद्रपूर- 46.0 तापमान


चंद्रपूर- बुधवारपर्यंत विदर्भाला घट्ट पकडून असलेला उष्णतेच्या लाटेचा विळखा आता हळूहळू सैल होत आहे . गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही पाऱ्यात हलकी घसरण झाली . नागपूरपेक्षाही विक्रमी उच्चांक नोंदविणारा चंद्रपूरचा पारा तर नागपूरपेक्षाही कमी झाला आहे .शुक्रवारी 46.0 तापमान  होते  हा जरासा दिलासा नागरिकांना सुखावणारा ठरतो आहे . रात्रीच्याही तापमानात घट झाल्याने तोही दिलासा आहे .

विदर्भात मागील आठवड्यापासून ते बुधवारपर्यंत उष्णतेची लाट होती . चंद्रपूरचा पारा ४८ . २ अंशांपर्यंत पोहोचला तर नागपुरात पाऱ्याने सहा दशकांचा विक्रम मोडला होता . गुरुवारी तापमान ४६ . ६ अंशांवर आल्यानंतर शुक्रवारी त्यात आणखी घसरण झाली . नागपुरात ४६ . ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . मात्र हे तापमान अद्यापही सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे . विदर्भात चंद्रपूर , ब्रह्मपुरी आणि वर्धा वगळता अन्य ठिकाणी पाऱ्यात फारसा फरक पडलेला नाही . चंद्रपूरचा पारा ४६ अंशांवर आला . ब्रह्मपुरीचे तापमानही ४६ अंश आहे . सरासरीपेक्षा अधिक आहे . हीच स्थिती वर्धेत असून तेथे ४५ . ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . याशिवाय गोंदियात ४५ . १ व अमरावतीमध्ये ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली . यवतमाळ , अकोला व वाशीममध्ये पारा जेमतेम ४२ अंशांदरम्यान आहे . ऊन जरा सुसह्य आहे .
चंद्रपूरमध्ये पारा ४७ ते ४८ अंशांपर्यंत गेला त्यावेळी रात्रदेखील उष्ण होती . रात्रीचे तापमान ३३ अंशांपर्यंत पोहोचले होते . गुरुवारी पाऱ्यात घसरण होताच रात्रदेखील हलकी थंड झाली . पाऱ्यात तब्बल पाच अंशांची घसरण होऊन तो २८ अंशांपर्यंत आला . यामुळे रात्रीच्या गरम झळांपासून हलका दिलासा मिळत आहे .
मेच्या अखेरच्या आठवड्यात ' नवतपा ' असतो . या दरम्यान सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो . यामुळे तापमानातील वाढ याचदरम्यान असल्याचे आजवर दिसून आले आहे . इतिहासात बहुतांश वेळा उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान अखेरच्या आठवड्यातच होते . यंदा हा ' नवतपा ' २५ मे ते ३ जूनदरम्यान आहे . दोन दिवसांपासून पाऱ्यात हळूहळू घसरण होत आहे . तर हवामान खात्यानेदेखील , उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जास्तीत जास्त दोन दिवसच कायम राहण्याचा अंदाज आहे . यानंतर महिनाअखेरपर्यंत पारा ४२ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे . यामुळे यंदा ' नवतपा ' दरवर्षीसारखा तापणारच नाही , अशी चिन्हे आहेत .