उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने एसी, कूलरचा वापर घराघरात केला जातो. मात्र या उपरकरणांची योग्य ती देखभाल केली नाही तर ती जीवघेणी ठरु शकतात.
अशीच एक घटना चंद्रपुरात घडलीय. घरातील कुलरचा शॉक लागल्याने ६ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरच्या समाधी वार्ड परिसरात घडलीये.सुमिधा दीक्षित असं या चिमुरडीचं नाव आहे. सुमिधा ही घरात खेळत असताना कुलरशी तिचा संपर्क आला. यावेळी कुलरचा शॉक लागल्याने त्यात चिमुरडीचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.