সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 18, 2018

असिफा बानोचा शेवटचा विडिओ मागील तथ्य; नक्की वाचा,व्हायरल विडीओचा व्हायरल सच


नागपूर/ललित लांजेवार:
क्रूरकृत्याची सीमा गाठणाऱ्या जम्मूमध्ये येथील आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली असं पोलीस चार्जशीटच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे,यातच आमच्या देशात अशा घटनांवर पण तीन वेगवेगळ्या विचारसरणी आणि बेभान लोक आहे कि त्याची काही सीमा नाही.यात एक वर्ग आहे तो म्हणजे या मुलीसाठी जात पात धर्म पंत न बघता निषपन्न चौकशी होऊन पिडीतेच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो तर दुसरीकडे  असाही एक वर्ग आहे कि  ज्यांना वाटते की या प्रकरणात काही झालंच नाही, पण तिसरा आणखी  पैलू देखील यात आहे ज्यात या चीमुकलीच्या नावाखाली एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहे. देशात काहीही होऊन जाणार ह्या प्रकारचा एक ग्रुप सोशल मीडियावर नेहमीच अशाच प्रकारे खोटे संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी active असतो, असाच एक विडीओ सध्या युटूब व आणखी सोशल मिडियावर व्हायरल होत आहे,  जो त्या काठूआच्या जग सोडून गेलेल्या चिमुकल्या मुलीचा व्हिडीओ नाही. या विडीओ मध्ये एक लहान मुलगी एक "नज्म" वाचत आहे जी म्हणते "सुना है की बहुत सुनहरी ही दिल्ली, समंदर सी खामोश गेहरी है दिल्ली,  मगर एक मा कि सदा सून न पाये,तो लागता ही गुंगी बहरी ही दिल्ली", हा विडीओ  शेअर करणार्‍या लोकांचं म्हणणं आहे की हा विडिओ त्या चिमुकल्या मुलीचा आहे जिच्या सोबत रेप झाला कि तिची हत्या करण्यात आली हे अजूनही राज बनून आहे, आणि  विडीओ अपलोड करणाऱ्या लोकांच म्हणणे आहे कि ह्या गाण्यात हि मुलगी दिल्लीच्या सरकारला कोसत आहे.
या विडीओला एका दिवसात    26 लाखाहून अधिक लोकांनी बघितले आहे,  मात्र यामागचे खरी कहाणी काही आणखीनच आहे इम्रान प्रताबगडी  ते आहेत ज्यांनी हि नज्म स्वता लिहिली असून नऊ महिने पहिले कोणीतरी whatsapp वर हि नज्म त्यांना  पाठवली होती, त्यांनाही नज्म चांगली वाटली म्हणून त्यांनी फेसबुक वर टाकली मात्र काही लोक या video ला जम्मूच्या मुलीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, हा प्रकार संपूर्ण भारतभर जगभर गाजत असताना सोशल मीडियावर असेही काही लोक आहे जे या चिमुकलीचा या अगोदरचा शेवटचा video म्हणून व्हायरल करत आहेत ज्यात एक टक्काही तथ्य नसल्याचे समोर येत आहे,तर तुम्हालाही हा विडीओ येऊ शकतो तेव्हा तुम्ही देखील या विडीओला शेअर करण्याआधी  हा संदेश नक्की वाचा.समाजात अश्या प्रकारच्या चुकीच्या संदेश देशाला वेगळे वळण लावतो.त्यामुळे खात्री करूनच एखादी पोस्ट शेअर करा,,धन्यवाद!!!!!!

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.