সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 15, 2018

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातुन  समस्यांचे निराकरण होत असल्याने ह्या  विद्युत केंद्राची प्रगती झाली असुन कर्मचा-यांचा कामाचा दर्जा देखील उंचावला  असल्याचे जयंत बोबडे मुख्य अभियंता  यांनी प्रतिपादन केले. ते गुणवत्ता मंडळाच्या  २४वा वर्धापन दिन समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होते. 
            याप्रसंगी  मार्गदर्शक  म्हणुन आशुतोष पातुरकर व मुख्य अतिथी  सुनील आसमवाऱ मुख्य अभियंता, कोराडी प्रशिक्षण केंद्र, कोराडी, उपमुख्य अभियंता अनिल आष्टिकऱ,  राजु घुगे,  मधुकर परचाके व श्रीमती विजया बोरकर मंचावर उपस्थित होते. सुनील आसमवार यांनी आपल्या भाषणातुन गुणवत्ता मंडळामुळे कंपनीला होणारा फायदा यावर विषेश भर दिला.
तर व्यवस्थापन कौशल्य कशाप्रकारे  गुणवत्तेवर आधारीत असु शकते यावर आशुतोष पातुरकर यांनी प्रकाश टाकला. प्रारंभी, मोरेश्वर मडावी व चमुनी स्वागतगित सादर केले. गुणवत्ता मंडळ स्पर्धेचे परिक्षक म्हणुन अधिक्षक अभियंता अनिल काथोये, कार्यकारी अभियंता शशीकांत वेले़, जयप्रकाश बोवाडे, सविता फुलझेले व सहाय्यक अभियंता  मोहन गोडबोले यांनी कार्यभार हाताळला. 
यानिमीत्य केस स्डडी सादरीकरऩ, कविता,  घोषवाक्य़, निबंध व प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.  सुरेद्र निशानराव कार्यकारी अभियंता व गुणवत्ता मंडळ मुख्य समन्वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन केले. सूत्र संचलन सविता फुलझेले व शशीकांत वेले यांनी तर पाहुण्यांचा परिचय श्वेता दासरवार यांनी करून दिला तर आभार प्रर्दशन हेमंत ढोले यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंदातील सर्व अधिक्षक अभियंते़, कार्यकारी अभियंते, कर्मचारी व गुणवत्ता मंडळाचे सदस्य मोठया संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते. 
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनिल काथोये बाळु इंगळे, मोहन गोडबोले, सुनिल इंगळे, अरविंद पेशकऱ,  विष्णु पगारे,  दिगांबर इंगऴे, सतिश पाटील, राजु माहुलीकऱ, दिलीप कातकऱ,   शितल मेश्राम, रोशनी ठाकरे व गुणवत्ता मंडळाचे सद्स्यांनी अथक परीश्रम घेतले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.