ओला आणि उबर ने नागपुरात सोमवारी एक दिवसाचा संप पुकारला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेतृत्वात हा संप पुकारला गेला असून टॅक्सी सर्व्हिस बंद असल्याने नागपुरात सामान्य नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळाले सुमारे दोन हजाराहून अधिक टॅक्सी चालकांचा त्यामध्ये समावेश आहे.
ओला आणि उबरणे तरुणांना भरघोस उत्पन्नाच आमिष दाखवलं त्यानंतर अनेकांनी गाड्या घेतल्या आणि ओला आणि उबेर या कंपनीत आपली गाडी भाडेतत्वावर लावली, तर काही दिवस कंपनीचा लाभांश दिला पण आता कंपनीने आपल्या स्वतःच्या मालकीच्या गाड्या आता बँक लोनवर घेतल्या व या स्वतःच्या मालकीच्या गाड्या घेतल्याने ग्राहकांची बुकिंग हे पहिले ओला स्वतःच्या मालकीच्या लोनवर घेतलेले गाड्या यांना देत असल्यामुळे हा संपूर्ण आंदोलन उभारण्यात आले आहे. यात अगोदर भाडेतत्त्वावर लागलेल्या गाड्यांना बुकिंग येत नसल्यामुळे या टॅक्सी चालकांनी मनसेच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनामुळे लाखो रुपयाचे कंपनीचे नुकसान झाले असून नागरिकांना देखील त्याचा फटका बसला आहे.