नागपुर आयुक्तालयाचा आदेश!
कोंढाळी:गजेंद्र डोंगरे-
नागपुर जिल्यह्यातील कोंढाळी ग्रामपंचायती चे सरपंच व उपसरपंच यांनी महिराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 39(1) नियमानुसार नागपुर चे अपर आयुक्त नागपुर विभाग यांचे न्यायालया तील प्रकरण क्र 39(1)/139/2016/17 अर्जदार पवन फत्तेलाल दरक, व सितिराम लक्षमण दंढाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून कोंढाळीचे सरपंच वृषाली माकोडे, व उपसरपंच ललीतमोहन काळबांडे यांचे ग्रा .प. सदस्यत्व रद्द करन्यात आल्याचा आदेश 28मार्च 2018ला पारित करण्यात आल्याच आदेशात म्हटले आहे.
या प्रकरनाबाबद मिळालेल्या माहिती बाबाद असे की पवन दरक यांचे कोंढाळीत प.ह .63चे सर्हे क्र 107/1मधे पुर्ण विकसित भुखंड खरेदी केला होता. या भुखंडाचे फेरफार करने साठी ग्रा.प.कोंढाळीने प्रति चौरसफुट पाच रूपये प्रमाणे ग्रामपंचायत विकासकामा साठी देणगी मागलती . ती देणगी ग्रामपंचायीतीला देणगी क घेता येत नाही व ग्रा प ला मोकळया जागवर -040पैसे.प्रती चौ.फुट कर आकारू शकते असे अर्जदाराचे म्हनणे होते. मात्र ग्राम पंचायतिने ग्रा प ला देणगी ही नियमा प्रमाणेच मागितली असे बयानात आहे हे प्रकरण आयुक्तालया कडे आल्यावर या प्रकरणी अपर आयुक्त आर एच ठाकरे यांनी 28मार्च 2018 ला आपल्या निकालात आदेश पारित केला की दोन्ही बाजुचे उक्तिबादावरून व चौकशीत सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे असे सिध्द होत असल्याने सरपंच वृषाली माकोडे व उपसरपंच ललितमोहन काळबांडे यांना ग्रामपंचायत कोंढाळी ता. काटोल जि नागपुर चे ग्रामपंचायत सदस्य म्हणून यापुढे चालू राहन्यास अपात्र घोषित करन्यात आले आहे. असे आदेशात म्हटले आहे.
याबाबद सरपंच वृषाली माकोडे व उपसरपंच ललिल मोहन काळबांडे यांना विचारले असता सध्या आदेशाची प्रत मिळाली नाही .ती मिळाल्यावर पुढिल कार्यवाही काय ते सांगू .पण आम्हि कोणताच गैरप्रकार केला नाही ग्राम नीधी एवजी देणगि या शब्दावर हा तांत्रिक मुद्दा आहे.
या बाबद बी डी ओ काटोल सुनिल साने यांना विचारले असता त्यांनी कार्यालयीन प्रत मिळाली नाही .मेल द्वारा माहिति मिळाली आहे. कार्यालईन प्रत मिळाल्यावर काही सांगता येईल असे सांगितले.