चंद्रपूर/प्रतिनिधी:
"सुधीरभाऊत मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात" या वादग्रस्त वक्तव्या नंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली,या प्रकरणी पाझारे यांनी पत्रपरिषद घेऊन तसेच सोशल मिडिया वरून माफी मागितली.
गेल्या काही दिवसांपासून पाझारेंच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. पाझारे यांच्या वक्तव्यावर जिल्हाभरातून रोष व्यक्त करण्यात आला.पाझारेंचा प्रतिमेला काळे फासले गेले.यातच जिल्हातून संताप व्यक्त होत असतांना पाझारे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच सोशल मिडियावरून माफी मागीतली आहे. त्याचे स्क्रीनचित्र सोशल मिडीयावरुन वायरल होत आहेत .ज्यात मी बाबासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा माणूस असून नकळत कोणाचे मन दुखावले गेले असतील तर मी माफी मागतो.मात्र माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला जात आहे,असे ते म्हणाले. या माफिनाम्यानंतर पाझारे यांचे काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले राहणार आहे.

राजीनामा द्यावा.....
या प्रकरणानंतर पाझारेनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रविण खोब्रागडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.पाझारेंचा व्यक्तव्याचे समस्त आंबेडकरी जनतेचा वतिने जाहीर निषेध करतो असे ते म्हणाले. मुल येथिल कार्यक्रमात बोलतांना ब्रिजभुषण पाझारे यांनी ना.सूधिर मुनगंटीवार यांच्यात मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात असे वादग्रस्त व्यक्तव्य केले.

दरम्यान बुधवारी आज समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन पक्ष व शतकोत्तर जयंती महोत्सव यांच्या मार्फत प्रविण खोब्रागडे,यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत पाझारे यांनी सभापती पदाचा राजीनामा द्यावा हि मागणी करण्यात आली,तसेच या मागणीसाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील,व जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक निमगडे, विशालचंद्र अलोणे,राजूभाऊ खोब्रागडे,स्नेहल रामटेके,महादेव कांबळे,वामणराव सरदार,हरिदास देवगडे,अशोक टेंभरे,अशोक फुलझले,भाउराव दूर्योधन,सिध्दार्थ वाघमारे,सूरेश नारनवरे,सूरेश रंगारी,निर्मला नगराळे,गिता रामटेके आदीनी पत्रकार परिषद घेवून पाझारे यांचा निषेध केला.