अक्षरश: निखाऱ्याजवळ उभे असल्यासारख्या उन्हाच्या झळा गेल्या आठवडा भरापासून महाराष्ट्र सोसत आहे. नागपुर, चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी पारा ४४ ते ४५ डिग्रीवर पोहोचला असून ऊन्हाचे चटके आणि घामाच्या
धारांनी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
विदर्भातील उष्णतेची लाट आणखी तीव्र झाली असून शुक्रवारी तापमानाचा आलेख आणखी वर गेला. चंद्रपूरमध्ये शुक्रवारी तब्बल ४५.९ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. विदर्भातील इतर जिल्हेही उन्हाने पोळून निघाले. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही तापमान चाळीशीपलिकडे गेले. महाराष्ट्रात ऍण्टीसायक्लॉन म्हणजेच प्रतिचक्रवाती वारे निर्माण झाल्याने पारा चढल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.राज्यभरात विदर्भासह अनेक भागांत तयार झालेल्या उष्ण वारे बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे हे वारे जमिनीवरून वाहत आहेत. परिणामी जमीन एखाद्या भट्टीप्रमाणे तापली असून डांबरही अक्षरश: वितळले आहे.