महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी १७ एप्रिल २०१८ ला मुंबई येथे पालकमंत्री यांच्या समवेत चंद्रपूर येथील पाणी समस्येवर बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये ज्या अधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं कि आम्ही चंद्रपूरचा पाणी पुरवठा सुरळीत ठेऊ असे त्यावेळी बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले होते. म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे यांनी २४ एप्रिल २०१८ पासून वाढीव पाणी पुरवठा सुरु करू असही त्या बैठकीमध्ये सांगण्यात आले होते पण अजूनपर्यंत २४ तारीख हि लोटूनही अद्याप वाढीव पाणी पुरवठा चालू झालेला नाही. म्हणून आज शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी धानोरा नदीवरील वाढीव पाणी पुरवठा योजनेचे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली असता येथील नदीमधील पाण्याची व सुरु असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी १ महिना कालावधी लागणार आहे अस त्यावेळी निदर्शनास आले. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, अमोल शेंडे, इरफान शेख, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, शंकर दंतुलवार, अशपाक खान, बादल हजारे, बबलू मेश्राम, यांची उपस्थिती होती.
सुरु असलेल्या कामाची पाहणी करत असताना म.जी.प्र.चे अधीक्षक अभियंता जगदाळे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा पूर्णपणे माहिती दिली नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही आतापर्यंत ६ kmकिमी अंतर पर्यंत पाण्याची टेस्टिंग केली आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही पात्र पान्याअभावी पूर्णपणे कोरडे पडलेले आहे, नदीतच पाणी नाही आहे तर चंद्रपूर येथील जनतेला कुठून पाणी देणार असा प्रश्न या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर जोरगेवार यांनी उपस्थित केला. इतक्या मोठ्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम याठिकाणी नदीवर चालू आहे पण कामाच्या ठिकाणी एकही अधिकारी किव्हा कंत्राटदाराचे सुपरवायजर, इंजिनिअर कोणीही त्याठिकाणी नाही ते काम चंद्रपुरकरांची दिशाभूल करण्यासाठी रामभरोसे चालू आहे. असा आरोप जोरगेवार यांनी केला. केवळ चार ते पाच कामगारांच्या भरोशावर काम चालू आहे. चंद्रपूर येथील जनतेच्या जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी असून सुद्धा येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन आहे हे दिसत आहे. बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना आकडेवारी सांगीतल्याप्रमाणे त्यांनी त्या बैठकीमध्ये १५ जूनपर्यंत शहरातील जनतेला पाणी पुरेल असा अंदाज लावत समोर आढावा बैठकीचे आयोजन केले. पण प्रत्यक्ष पाहता येथील पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. इरई धरणात सुद्धा पाणी नाही आहे आणि वाढीव पाणी पुरवठा च्या माध्यमातून जे पाणी मिळण्याची आशा होती ती आशा सुद्धा पूर्ण होणार नाही अस याठिकाणी दिसत आहे. चंद्रपूरच्या जनतेला जर जून महिन्यापर्यंत पाणी मिळाले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल व पाणी द्यायला प्रशासनाला भाग पाडेल वेळ प्रसंगी जर सी.टी.पी.एस. चे जर वीजनिर्मिती संच बंद करण्याची वेळ आली तर ते बंद करू असा इशारा जोरगेवार यांनी दिला आहे.