वीजबिल भरण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईनसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आर्थिक भुर्दंडव वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई व गैरसोयटाळण्यासाठी लघुदाब वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ऍ़पद्वारे वीजबिलाचाऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केलेआहे.
धनादेशाद्वारे वीजबिलाचा भरणा केल्यास कोणत्याहीकारणामुळे धनादेश बाऊंस होण्याची शक्यता असते. सद्यस्थितीत महावितरणचे दरमहा सुमारे 7 लाख ग्राहक वीजबिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. त्यापैकीसाधारणत: दहा हजार धनादेश दरमहा बाऊंस होतात. त्यामुळे ग्राहकांना ३५० रुपये दंड, धनादेश अंतिम मुदतीच्यातारखेनंतर वटल्यास पुढील बिलात लागून येणारी थकबाकीयासह सदर ग्राहकाची पुढील सहा महिने धनादेशाद्वारेवीजबिल भरण्याची सुविधा स्थगित केली जाते. तसेचधनादेश बाऊंस होणे हा पराक्राम्य संलेख १८८१ च्या कलम१३८ अंर्तगत दखलपात्र फौजदारी गुन्हा आहे.
रिर्झव्ह बँकेच्या नियमांप्रमाणे, धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. धनादेशवटल्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद ग्राहकांच्याखात्यावर होते. अनेक ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोनदिवसा अगोदर धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधितग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेशबाऊंस झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडितकरण्याची कारवाई केली जाते. काही ठिकाणी एखादी व्यक्ती१५ ते २० वीजग्राहकांच्या वीजबिलांची रक्कम रोख स्वरुपातघेऊन ती धनादेशाद्वारे भरते. यात धनादेश बाऊंस झाल्यासत्याचा वीजग्राहकांना नाहक आर्थिक फटका बसू शकतो वत्यांचा वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो.
या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी व घरबसल्या वीजबिलभरण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in हीवेबसाईट व मोबाईल ऍ़पची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट वमोबाईल ऍ़पच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुमारे ३५ लाखवीजग्राहक सुमारे ६०० कोटी रुपयांचा दरमहा वीजबिलभरणा करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनीया सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडूनकरण्यात आले आहे.