दोन महिला जागीच ठार तर 14 गंभीर
वरोरा/शिरिष उगे :
वरोरा येथील कैटर्स व्यवसायिक इरफान रंगरेज यांच्या कामगार वाहतूक करणाऱ्या टाटा एस या मालवाहक वाहन क्रमांक MH34 AB 7280 ची उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH29 T0397 ला आज रविवार च्या पहाटे दोन वाजताच्या दरम्यान जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागिच मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी झाले . हा अपघात वरोरा- वणी मार्गावरिल शेंबळ नजिक च्या जगन्नाथ बाबा यांच्या मठाजवळ झाला. कोळस्याने भरलेला नादुरस्त ट्रक रोड वर उभा होता. या ट्रकचे इंडिकेटर दिसत नव्हते त्यामुळे रात्री येणाऱ्या सदर कैटर्स वाहन चालकला तो ट्रक दिसला नसावे आणि त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की टाटा यस या गाडीचा चुराडा झाला. हा अपघात रात्री दोन वाजताच्या सुमारास झाल्याने यावेळी मदत भेटणे गरजेचे होते अपघाताची माहिती मिळताच आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे व लखन केशवानी यांनी तात्काळ 108 आणि खाजगी रुग्णवाहिकेला फोन लावून रुग्णांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात आणले आणि प्राथमिक उपचारा नंतर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यासाठी मदत केली .
या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करत असून अशा अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्या मालवाहू गाडीत प्रवासी नेणे धोकादायक असून सुद्धा लग्नसराईत मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी नेल्या जातात. त्यामुळे अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलीस काय कडक कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.