সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 05, 2018

चंद्रपूरच्या बसस्थानकावर फेरीवाल्यांचा कब्जा;अतिक्रमण विभाग झोपेत

अतिक्रमण विभाग झोपेत;पार्किंगची उद्भवत आहे समस्या 

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर येथील मुख्य बसस्थानकावर पुन्हा एकदा ठेलवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सद्या चंद्रपूर बस स्थानकाचे नूतनीकरनाचे काम सुरू आहे.त्यामुळे बसस्थानकात जागा अतिशय कमी जागा आहे,बसची संख्या बघता बऱ्याचदा बस ह्या बसस्थानकात न जाता बाहेर रस्त्यावरच थांबत आहे .अश्यातच अगोदर असलेल्या दुचाकी पार्किंगच्या ठिकाणी अवैधपणे ठेलेवाल्यांनी अतिक्रमण केल्याने बसस्थानकावर आप्तेष्टांना सोडण्यास किव्हा घेण्यास येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ नसल्याने पार्किंगची समस्या निर्माण होत आहे .

सदर परीसर हा झोन क्रमांक 1 मध्ये येत असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने हा फेरीवाले व ठेलवाल्यांचा उच्छाद जास्तच दिसून येत आहे.यांच्या अतिक्रमणामुळे  दुचाकीस्वार पालिका प्रशासनावर चांगलेच नाराज आहे.
सदर अतिक्रमण परिसर हा मेनरोडला लागून असल्याने या फेरीवाल्यांच्या मुजोरील चंद्रपुर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.त्यामुळे मनपाचे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

सदर बस स्थानक परिसरात ऑटोवाले अतिशय मुजोरीने वागत असून याकडे
वाहतूक पोलीस मात्र मुग गिळून चूप बसले असल्याचे दिसून येत आहे.
अर्द्यापेक्षा जास्त रस्त्यावर आपले वाहन उभे करून वाहतुकीस अडथडा निर्माण करीत आहे .


*तक्रार प्राप्त झाल्यास करू कारवाई*

संपूर्ण बसस्टँड परिसर हा झोन 1 मध्ये येत असून याकडे अतिक्रमण विभागाने दररोज पेट्रोलिंग करून अतिक्रमण होत असल्याच्या जागेची माहिती ठेवणे आवश्यक असते मात्र झालेल्या अतिक्रमनाबाबद झोन 1 च्या अधिकारी सहाय्यक आयुक्त शीतल वाकडे यांच्या कडून माहिती घेतली असता आजूनपरियंत तक्रार आली नसल्याचे सांगितले. यातूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वयक्तिक जबाबदारी संपली का?असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

दुचाकी ठेवण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने दुचाकीस्वार आपली दुचाकी थेट डेपोमध्ये पार्क करत आहेत .ह्यावर चंद्रपूर पोलीस कारवाई करत असून हा संपूर्ण मन्स्ताप नागरिकांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे .

;


.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.