चंद्रपूर/रोशन दुर्योधन :
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहूर्ली वनपरिक्षेत्रात जंगलात लाकड आणि टेम्भूर फळ वेचण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मोहूर्ली वनपरिक्षेत्रात घडली. शंकर मेश्राम वय ५० वर्षे असे या वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शंकर मेश्राम हे दररोज प्रमाणे मंगळवारी देखील जंगलात लाकूड व टेम्भूर फळ वेचण्यासाठी गेलेलं होते मात्र तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला.त्यांच्या गळयावर वाघाच्या हल्ल्याचे घाव असून वाघांची तब्बल अर्धा तास बसून त्यांच्या डाव्या हाताला फस्त केले,शंकर मेश्राम यांचे सोबर आणखी ४ लोक हे जंगलात होते. मात्र ते वेगळ्या ठिकाणी होते,व ज्या परिसरात शंकर मेश्राम लाकूड आणायला गेले नेमका त्याच परिसरात वाघ हा दबा धरून बसला होता आणि त्याने हल्ला चढविला.
मिळालेल्या माहितीवरून शंकर मेश्राम यांना त्याला २ मुलं एक मुलगीआहे. याआधी जवळच असलेल्या सीताराम पेठ गावात वाघाने एकावर हल्ला चढविला होता. सदर घटना माईन्स रोडपासून 1कि.मी अंतरावर घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी RFO सचिन शिंदे व RO राऊत आदीनी घटनास्थळी धाव घेतली.