चंद्रपूर/प्रतिनिधी:
जेनेरीक स्वस्त औषधी केंद्र ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून येथे मिळणारी औषधी खुल्या बाजारात येणाऱ्या औषधीपेक्षा 70 टक्के स्वस्त असल्याने जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय गृह
राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. दि. 22 एप्रिल रोजी चंद्रपूरातील तुकूम परिसरात एस.टी. वर्कशाॅप चैकात प्रभुछाया स्वस्त औषधी सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आज देशात निर्मित होत असलेली औषधी ही जगात 200 हून अधीक देशात निर्यात होत असून पाश्चात देशाच्या निकषात सिध्द झालेल्या या औषधांची गुणवत्ता उत्तम असुन विविध आजारांवर या औषधी प्रभावी ठरली आहेत. परंतू समाजातील काही लोक सदर औषधांच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण करून समाजात भ्रम पसरवित आहेत, याला लोकांनी अजिबात थारा देवू नये असेही ना. अहीर यांनी याप्रसंगी आवाहन केले. मधुमेह, उच्चरक्तदाब यासारख्या रोगांकरिता नियमितपणे घ्यावयाच्या गोळ्या येथे स्वस्त दरात मिळत असल्याने रूग्णाने त्याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रविकांत वाघाडे, जेनेरीक औषधी समन्वयक प्रभुदास रायपुरे, अब्राहम रायपुरे, सौ. छाया रायपुरे, श्री.सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते