সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 08, 2018

हंसराज अहीर यांची लालपेठ खदानीस भेट

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

 हिन्दूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणीच्या चौथ्या टप्प्याच्या विस्तारीकरणासाठी वेकोलि प्रबंधनाच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने यालगत असलेल्या वनविभागाच्या अखत्यारीतील सुमारे 36 हेक्टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असला तरी शक्यतो ही माईन बंद न करता वेकोलि प्रबंधनाने अन्य पर्यायांचा अवलंब करून तसेच  पाचही कामगार संघटनांच्या  पदाधिका-यांाश्ी चर्चा करून कामकार याच ठिकाणी  कार्यरत राहतील अशा प्रकारचे नियोजन करावे अशी सुचना केंद्रीय गृह  राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी या खाणीस भेट दिली असता उपस्थित वेकोलि अधिकाÚयांशी बोलतांना दिली.
केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी हिन्दूस्तान लालपेठ खुल्या कोळसा खाणी  संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नाची दखल घेवून दि. 7 एप्रिल रोजी या  खाणीला भेट देवून वेकोलि अधिकाÚयांशी खाण कामकार संघटनांचे पदाधिकारी
तसेच शेकडो कामगारांच्या उपस्थितीत या विषयावर सविस्तर चर्चा केली.
जोपर्यंत स्टेज 1 व 2 चा मार्ग मोकळा होणार नाही तोपर्यंत कोळसा उत्खनन  बंद राहिल अशी भुमिका अधिकाÚयांनी घेत या खाणीत कार्यरत 450 कामगारांपैकी  किमान 200 कामगारांना इतरत्रा हलविण्याची कारवाईसुध्दा वेकोलि  प्रबंधनाकडून सुरू झाली असल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी वेकोलि कामगार व कामगार संघटनांच्या पदाधिका-यांनी ना. अहीर यांना केली होती त्यानुसार केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी प्रत्यक्ष या ओपनकास्टला भेट दिली.याप्रसंगी क्षेत्रिय महाप्रबंधक आभास सिंह, भाजपाचे जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजपा किसान आघाडी महामंत्राी राजू घरोटे, उपक्षेत्रिय प्रबंधक ए.सी. हलदर, खाण प्रबंधक एन.के.मुंजेवार, युनियनचे पदाधिकारी इंटकचे बी.जी. दाभाडे, अभय तिवारी, भारतीय मजदूर संघाचे विजय आक्केवार, आयटकचे दिलीप बर्गी, संजय कांबळे, सीटूचे विठ्ठल कडू, सैय्यद, एचएमएसचे व्यंकटेश सुरा व पुरूषोत्तम गोंगले यांचेसह खाण कामगार बहुसंख्यंने उपस्थित होते. 1985 पासून सदर खाण सुरू असून आतापर्यंत या खाणीचे तीन टप्प्यात
विस्तारीकरण झाले आहे. 
जागेअभावी कोळसा उत्खननाचा प्रश्न खाण प्रबंधनासमोर निर्माण झाल्याने यावर पर्यायी तोडगा शोधण्यासाठी या खाण परिसरालगत कोळशाचे साठे असलेली वनविभागाची सुमारे 36 हेक्टर जागा मिळावी यासाठी वेकोलि मुख्यालय प्रबंधनाने केंद्र सरकारकडे या भुमी संपादन प्रयोजनार्थ प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वेकोलि अधिकारी तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाÚयांनी आपणास  या संदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध केल्यास आपण केंद्र शासन स्तरावर या
प्रस्तावाच्या मान्यते संदर्भात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांनी या प्रसंगी दिले.
महाकाली काॅलरी संदर्भात प्रस्ताव दिला होता त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. हिन्दुस्तान लालपेठ खुल्या खदानी बाबतही योग्य निर्णय घेतल्या जाईल असेही ना. अहीर यांनी उपस्थित कामगार प्रतिनिधी व खाण कामगारांना आश्वस्त केले. या खाणीमध्ये आणखी उत्पादन शक्य आहे काय याची शहानिशा कामगार संघटनांशी चर्चा करून वेकोलि अधिकाÚयांनी घ्यावा. कामगार संघटनांना बाजुला सारून याबाबतीत निर्णय घेण्याचा प्रयत्न वेकोलि अधिकाÚयांनी करू नये अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. परिस्थितीनुसार या खदानीतील काही कामगारांना अन्यत्रा स्थानांतरीत करण्याची भुमिका वेकोलि प्रबंधनाकडून स्वीकारली जात आहे असा प्रसंग कामगारांवर येणार नाही याची दक्षता कामगार हिताच्या पाश्र्वभुमीवर अधिका-यांनी घ्यावी असे सांगतांनाच या कामगारांना जिल्हîाबाहेर न पाठविता त्यांना परिस्थितीजन्य प्रसंगोत्पात वेकोलि चंद्रपूर क्षेत्रा अंतर्गत असलेल्या खाणीमध्येच सामावून घेण्यात यावे व जेव्हा वनविभागाद्वारे नाहरकत प्रमाणपत्रा मिळाल्यास तसेच डीजीएमएस द्वारा खाण पूर्ववत सुरू करण्यास अनुमती मिळाल्यास स्थानांतरीत झालेल्या या कामगारांना पुन्हा याच खदाणीत सामावून घेण्याची कार्यवाही करावी असेही केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी क्षेत्रिय महाप्रबंधकास सुचित केले. खाण बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांसोबत चर्चा करूनच याबाबतचा निर्णय घ्यावा अशाही सुचना केंद्रीय गृहराज्यमंत्रयांनी या भेटीप्रसंगी दिल्या.शासन स्तरावरील अडचणी दूर करण्याबाबतही आपण पुढाकार घेवू असे आश्वासन वेकोलि अधिकारी व कामगार संघटनांच्या पदाधिका-यांशी चर्चा करतांना दिले.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.