रामटेकच्या राजस्व अभियानात शेकडो लाभार्थी लाभान्वित
रामटेकच्या देशमुख सेलीब्रेशन सभागृहात तालुका स्तरीय महाराजस्व अभियान दिनांक 10 एप्रिल 2018 रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमात मागील वर्षी 23 जुलै 2017 ला अपघाती निधन झालेले पत्रकार प्रविण टाकळे यांच्या परीवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लक्ष रूपयांची मदत मंजूर करण्यात आली व या रकमेचा धनादेश यावेळी रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिती टाकळे यांना देण्यात आला.या कार्यक्रमांत विविध विभागातर्फे राबविण्यांत येणाऱ्या शासन योजनांचा लाभ शेकडो लाभार्थिंना देण्यात आला.संबधित लाभार्थिंना यावेळी धनादेश व साहीत्याचे वाटप करण्यात आले.
रामटेकला संपन्न झालल्ेया या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते संपन्न झाले.अध्यक्षस्थानी रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोषी होते.यावेळी तहसिलदार धर्मेश फुसाटे,जि.प.सदस्या शांता कुमरे,सरपंच योगीता गायकवाड,मीनाक्षी वाघधरे,तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ज्ञानेष्वर ढोक,ज्येष्ठ पत्रकार विजय पांडे,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष त्रिलोक मेहर,वसंतराव डामरे,दिपक गीरधर,अनिल वाघमारे,ललित कनोजे,एचपी गॅसचे वितरक जयप्रकाष तिवारी यांचेसह सर्वच विभागांचे तालुका प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची नियोजित वेळ 11 वाजताची होती मात्र आमदार साहेब तब्बल तीन तास उशीरा आल्याने या कार्यक्रमाला संपुर्ण रामटेक तालुक्यातुन आलेल्या सर्वसामान्य नागरीकांना ताटकळत राहावे लागले व दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला.
या कार्यक्रमांत कृशि विभागातर्फे अनुदानावर आठ ट्रक्टरचे वाटप करण्यात आलेसुमारे 80 लाभार्थींना कृशि औजारांचे वाटप करण्यांत आले.उज्वला योजने अंतर्गत मनसर येथील19 लाभार्थींना गॅस कनेक्षन भारत गॅस तर्फे यासह मुद्रा कर्ज,विज वितरण कंपनी,आरोग्य सेवा,आदिवासी विकास विभाग,पंचायत समीती,जलसंपदा विभाग,सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग,सहायक निबंधक रामटेक,दुयम निबंधक,अन्नपुरवठा,पषुसंवर्धन, आधार कार्ड अपडेषन, विविध महसुल प्रमाणपत्रे व जमीनीचे पट्टेवाटप असे लाभ लाभार्थिना देण्यात आले.
यावेळी आमदारांनी आपल्या भाशणांत ईतर सर्व विभागाच्या कामकाजा विशयी समाधान व्यक्त करतांना रामटेकचे तहसिलदार फुसाटे यांच्या लोकाभीमुख कार्याची प्रषंसा केली.पं.स.रामटेकच्या कामकाजात मोठाच सावळागोंधळ असून अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे मुख्यालयात राहात नाहीत.रोजगारसेवकांचा मोठा भ्रश्टाचार आहे मात्र गटविकास अधिकारी हे याकडे दुर्लक्ष करतात.त्यांचे काम अजिबात समाधानकारक नसल्याचे यावेळी अधोरेखित केले.षिबीरांत तालुक्यातुन मोठया संख्येत नागरीकांची उपस्थिती होतीकार्यक्रमाचे प्रास्तावीक तहलिदार फुसाटे यांनी केले तर राम जोषी यांनी अघ्यक्षीय भाशणातून सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.