पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ धामना अंतर्गत शिरपूर येथे विदर्भ व मराठवाडा प्रकल्पाअंतर्गत पशुसमृद्धी पंधरवडा पशुचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण १२७ जनावरांची तपासणी करण्यात आली यात खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणी, जंत नाशक औषध पाजणे, गोचीड - गोमाश्या औषध फवरणी तसेच उपस्थित पशुपालकाना मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले.
तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमात अंतर्गत डॉ पवन भागवत यांच्या परिश्रमातून शिबीरात येणाऱ्या प्रत्येक पशुपालकाला प्लास्टीक मुक्ती अंतर्गत कापळी पिशवीचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ प्रियवंदा सिरास पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नागपूर, डॉ अभय भालेराव बुटीबोरी ,डॉ दिलीप उघळे बाजारगाव, डॉ पवन भागवत,दिनेश इंगळे, राहुल रंधई, प्रकाश घागरे यांनी विशेष सेवा पुरवली.
শেয়ার করুন