शिरीष उगे/वरोरा :
वरोरा तालुक्यातील वडकेश्वर देवस्थान येथे लग्नाला आलेल्या एका वरडीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. ११ ला दुपारच्या वेळेस घडली. दयालाल कन्नाके वय २५ रा. साखरा ता वणी येथील रहिवाशी असे या मृताचे नाव आहे.
वरोरा तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून वडकेश्वर हे देवस्थान वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्या देवस्थानात उन्हाड्यात लग्न समारंभ पार पाडतात. याठिकाणी भाविक लग्नाच्या निमित्याने देवस्थानात भेट देतो आणि लगतच्या वर्धा नदीच्या पात्रात एक पर्यटन स्थळ म्हणून अंघोळ घालतात. या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते. यातच दि. ११ ला विवाह सोहळा पार पडला आणि त्या सोहड्यातील तीन वराडी वर्धा नदीच्या पाण्याचा आनंद लुटा साठी नदीच्या पात्रात उतरले. परंतु मार्डा गावानजीक एका खाजगी कंपनीने बंधारा बांधून पाणी अडवून ठेल्याने वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरून असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या तिघा पैकी एक जण परत न आल्याने लग्न मंडपात तारांबळ उडाली आणि शोध शोध सुरू झाली. या घटनेची तक्रार वरोरा पोलिसांना देताच घटनास्थाडी गाठून शोधा शोध सुरू केली .