সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, April 10, 2018

महावितरणची विश्वासाहर्ता वृध्दींगत करण्यासाठी ग्राहकसेवेप्रती समर्पित व्हा:भालचंद्र खंडाईत

नागपूर/प्रतिनिधी:
तब्बल 42 लाखांपेक्षा अधिक कृषी ग्राहक, सवलतीच्या दरातील वीज वापरणारे दीड कोटींहून अधिक ग्राहक असा प्रचंड व्याप असतांनाही महावितरण आज भारतातील वीज वितरण क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. महावितरणची ही विश्वासाहर्ता अधिक वृध्दिंगत व्हावी यासाठी आपण सर्वांनी ग्राहकसेवेप्रति समर्पित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले. नागपूर येथे आयोजित परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
‌ वीज वितरण क्षेत्रातील खासगी वा इतर कुठल्याही कंपन्यांच्या तुलनेत महावितरण नेहमीच अग्रणी ठरली आहे. हा क्रम टिकवून ठेवण्याकरिता राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रभावी मार्गदर्शनात आणि अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या सक्षम नेतृत्वात महावितरणची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
असे असतांनाही वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणे आपली प्राथमिकता असल्याने नवीन आर्थीक वर्षात आळस झटकून कामाला लागा, थकबाकी वसुलीसाठी आता मार्चची वाट न बघता दर महिन्याला थकबाकीदार ग्राहकाचा वीजपुरवठा खंडीत करा, थकबाकीची रक्कम आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय ग्राहकाचा वीजपुरवठा सुरु नका, असे स्पष्ट करतांना त्यांनी आलेले काम प्रलंबित न ठेवता ते त्वरित पूर्ण केल्यास ग्राहक समाधानासोबतच कंपनीचा महसुलही वेळीच वसूल होईल, ग्राहकांना दिल्या जाणा-या सरासरी बिलांचे प्रमाण कमी करून त्यांना वापरलेल्या वीजेच्या योग्य युनिटचे बील मिळावे, वीजपुरवठ्यात येणारे व्यत्यय कमी करून ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यावर यावेळी त्यांनी विशेष भर दिला. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या प्रलंबित जोडण्याचे प्रमाण शुन्यावर नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. लघुदाब वितरण हानी कमी करून कंपनीचे होणारे नुकसान टाळण्याच्या सुचना देतांनाच त्यांनी जुने आणि नादुरुस्त मीटर त्वरित बदलण्याच्या सूचनाही केल्या. मानवी हस्तक्षेप पुर्णपणे नष्ट करण्यासाठी स्वयंचलीत मीटर वाचन प्रणालीच्या माध्यमातून औद्योगिक ग्राहकांच्या मीटर वाचनासाठी यंत्रणा अद्ययावत करण्याबाबत त्यांनी यावेळी विस्तृत मार्गदर्शन केले.
‌ महावितरणचा महसूल वाढावा यासाठी अचूक मीटर वाचनाचे प्रमाण वाढवा, मीटर वाचन करणा-यांवर नियंत्रण ठेवा, ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने दिल्या जाणा-या परताव्याचे प्रमाण कमी करा. क्रेडीट बिलाचे प्रमाण कमी करा, मीटर बदली करतेवेळी अचूक असेसमेंट करा, ॲक्युचेक यंत्राने ग्राहकांकडील मीटरची वेळोवेळी तपासणी करा, ग्राहकांच्य घरात असलेले मीटर बाहेर काढा, ग्राहकाच्या मीटरला असलेली जोडणी तार वेळोवेळी तपासून घ्या, वित्त व लेखा विभागातील अधिका-यांनीही त्यांची जवाबदेही योग्यरित्या पार पाडावी, या सर्व बाबींवर काळजीपुर्वक काम केल्यास महावितरणची गैरकृषी वीजविक्री नक्कीच वाढेल, असा विश्वासही भालचंद्र खंडाईत यांनी यावेळी व्यत केला. चांगले काम करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचे कौतूक तर चुकीचे काम करणा-यांवर कारवाईचा बडगा कायम राहील, जनमाणसात महावितरणची नाहक बदनामी होणार नाही याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले. बैठकीच्या दुस-या सत्रात महावितरणला अधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले, यावेळी अनेक अधिका-यांनी आपल्या सुचना आणि अभिप्राय मांडले. 
‌ या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफ़ीक शेख, गुणवत्ता नियंत्रणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे दिलीप घुगल, अकोला परिमंडलाचे अरविंद भादीकर, गोंदिया परिमंडलाचे सुरेश मडावी, अमरावती परिमंडलाचे सुहास मैत्रे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, विधी सल्लागार ताराचंद लालवाणी यांचेसह पाचही परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते तसेच लेखा व वित्त विभाग, मानव संसाधन विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.