সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, April 20, 2018

ऊर्जामंत्र्यांचा प्रादेशिक कार्यालय स्थापनेचा प्रयोग यशस्वी; विदर्भातील पायाभुत सुविधांमध्ये दमदार वाढ

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करुन प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या प्रयोगामुळे विदर्भातील वीज वितरण यंत्रणेच्या पायाभुत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
वीज वितरण क्षेत्रात अशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी म्हणून लौकिक असलेल्या महावितरणच्या कामकाजात अधीक गतीमानता आणि पारदर्शकता आणावयासोबतच अधिकारांचे विकेंद्रीकरणाच्या दृष्टीकोनातून कंपनीची प्रादेशिक विभागावार रचना करण्याबाबतची संकल्पना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे आली. यातून 2 ऑक्टोंबर 2016 पासून कोंकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आली.
आज अडीच वर्षाच्या कार्यकाळात महावितरणच्या या प्रादेशिक कार्यालयांनी महावितरणच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल घडवित, ग्राहकसेवेप्रतिची भुमिका योग्यपणे वठविली आहे. वीज ग्राहकांना खात्रीपुर्वक दर्जेदार सेवा, वीज हानी कमी करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष आणि विज बिलांची नियमित वसुली या उद्देशाने स्थापित या चार प्रादेशिक कार्यालयांपैकी नागपूर कार्यालयाने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याची भुमिका सार्थकी ठरविली आहे.प्रादेशिक कार्यलयाच्या समन्वयातून विदर्भात महावितरणने सर्वत्र मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये यापैकी अनेक कामे पुर्ण करून उर्वरीत कामे पुर्णत्वाकडे आहेत. आर्थीक वर्ष 2018-19 मध्ये ही सर्व कामे पुर्ण होऊन विदर्भ अधिक ऊर्जावान होऊन येथील ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह्य वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण आग्रही असून महावितरणची सेवा अधिक पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी नागपूर प्रादेशिक कार्यालयाने कंबर कसली आहे.
प्रादेशिक संचालक, नागपूर यांच्याकार्यक्षेत्रात अकोला, अमरावती, गोंदीया, चंद्रपूर आणि नागपूर या परिमंडलांचा समावेश असून अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या विदर्भातील अकराही जिल्ह्यांचा यात समावेश आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या प्रभावी मार्गदर्शनात नागपूर परिक्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजना आणि दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजने अंतर्गत आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये विदर्भात 1470 कोटींहून अधिकची विकास कामे हाती घेण्यात आली असून यात प्रामुख्याने 115 नवीन वीज उपकेंद्रांचा समावेश आहे, त्यापैकी अमरावती मंडलातील 5 आणि यवतमाळ 2, अकोला 2, नागपूर ग्रामिण 5 तर गोंदीया आणि चंद्रपूर मंडलातील प्रत्येकी एक अशी एकूण 16 उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत तर 92 उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय 32 उपकेंद्रातील रोहीत्रांच्या क्षतमावाढीच्या कामांपैकी 16 उपकेंद्रातील रोहीत्रांच्या क्षमतावाढीची कामे पुर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.