সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 15, 2018

ताडोबाची नि:शुल्क सफारी

'Toadabachi Free Safari' | ‘त्यांना’ ताडोबाची नि:शुल्क सफारीचंद्रपूर/प्रतिनिधी:
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची वेबसाईट अद्ययावत करावी व त्यात ताडोबा अभयारण्याशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्यात यावी. तसेच स्वातंत्र्य संग्राम सैनिक, दिव्यांग बांधव, गुणवंत विद्यार्थी यांना रोज सफारी नि:शुल्क उपलब्ध करावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
येथील नियोजन भवनात शुक्रवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
वनविभागातर्फे गेल्या वर्षीच्या तुलनेत वनपर्यटन किती वाढले, याबाबतचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. रिसोर्ट मालक व जिप्सी चालक यांच्या समस्या वनमंत्र्यांनी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ताडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी. एक कॉल सेंटर सुरू करून त्या माध्यमातून पर्यटकांना संपूर्ण माहिती मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल व पर्यटकांना आपल्या समस्यासुध्दा सांगता येईल, अशी व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले. गाईड व वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश यावेळी वनमंत्र्यांनी दिले. सेवानिवृत्त वनकर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना नि:शुल्क सफारीचा लाभ देण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी, उपवनसंरक्षक के. के. मिश्रा, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शेताच्या बांधावर वृक्ष लागवड
सामाजिक वनिकरण शाखेच्या मदतीने आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करता येणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय १२ एप्रिल २०१८ रोजी निर्गमित झाला आहे, अशी आनंददायी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतामध्ये करावयाच्या वृक्ष लागवडीमध्ये साग, चंदन, खाया, बांबू , निम, चारोळी, महोगनी, आवळा, हिरडा, बेहडा, अर्जुन, सीताफळ, चिंच, जांभूळ, बाभूळ, अंजन, बिबा, खैर, आंबा, काजू (रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांसाठी), फणस, ताड, शिंदी, सुरु, शिवण, शेवगा, हादगा, कडीपत्ता, महारूख, मॅजियम, मेलिया डुबिया यासारख्या प्रजातींच्या वृक्षांची लागवड करता येणार आहे. रोपांचा दरही शासन निर्णयातील सहपत्रात निश्चित करून दिला आहे. वृक्ष लागवडीचा कालावधी १ जून ते ३० नोव्हेंबर असा राहणार असून यासंबंधीचे नियोजन कालबद्धरित्या सामाजिक वनिकरण शाखेने तयार करावयाचे आहे, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.
अनधिकृत रिसोर्टवर कारवाईचे संकेत
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा फायदा घेत अनेकांनी ताडोबाच्या अवतीभवती अनधिकृत रिसोर्ट तयार केल्याची माहिती मिळाली आहे. ज्यांनी अनधिकृत रिसोर्ट बांधले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.