সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 24, 2018

उद्या पासपोर्ट सेवा केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्याचा चमू चंद्रपुरात

inspection team साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रीय गृह राज्यमंत्री च्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यातील  नागरिकांसाठी चंद्रपूर महानगरातील भारतीय टपाल विभागाद्वारे पारपत्रा (पासपोर्ट) सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने या सेवेकरिता नुकतीच हिरवी झेंडी  दाखविली आहे. चंद्रपूर महानगरात या सेवाकेंद्राची सुरूवात करण्याच्या दृष्टीने नागपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील वरीष्ठ अधिकार्यांचा चमू  दि. 25 मे रोजी चंद्रपुरात दाखल होत असून ते या भेटीमध्ये डाक विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्याशी सेवा केंद्राच्या उभारणी संदर्भात चर्चा करून आवश्यक
माहिती घेणार आहेत. नागपूर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पारपत्रा अधिकारी सी.एल. गौतम
व त्यांचे सहकारी अधिकारी कुमार यांच्या नेतृत्वामध्ये ही चमू चंद्रपूर येथे येत आहे. चंद्रपूर हे महानगराचे स्थान असल्याने या शहरात पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित व्हावे अशी भुमिका घेत केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केंद्रीय विदेश मंत्राी सुषमा स्वराज  यांचेशी चर्चा केली होती. सदर चर्चा सकारात्मक झाल्याने व विदेशमंत्रालयाने तिसऱ्या  टप्प्यात चंद्रपुरातील पारपत्रा सेवा केंद्रास मान्यता प्रदान केल्याने हे केंद्र यथावकाश सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावरून कार्यवाहीस सुरूवात झाली असल्याचे संकेत या चमुच्या दौर्यामधून
मिळत आहेत.
चंद्रपूर जिल्हयातील विविध क्षेत्रातील नागरिक, उच्च शिक्षणासाठी विदेशात जावू इच्छिणारे विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, व्यवसायींसाठी मोठ्या प्रतिक्षेनंतर पारपत्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचे स्वप्न केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे साकार होणार आहे. चंद्रपूरातील या पारपत्रा सेवा
केंद्राचे कार्यान्वय शिघ्रगतीने व्हावे यासाठी ना. हंसराज अहीर प्रयत्नशील आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.