'तेलंगण राज्याच्या सीमेवरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून, तातडीने ठोस पावले उचलून त्यावर आळा घाला', असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी दिले.
अहिर यांनी गोवंश तस्करी आणि माओवादग्रस्त भागातील उपाययोजनांबाबत बुधवारी रविभवनात बैठक घेतली. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व मध्य प्रदेशातून तेलंगणमध्ये होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांना स्थानिक वाहतूक विभागाची मदत मिळावी, अशी सूचना संबंधितांना दिली आहे. विदर्भाच्या चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यालगत तेलंगणा राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होते. त्यासाठी संबंधित पोलिस अधीक्षकांनी जागेवरच कारवाई केल्यास आळा बसेल, असे अहिर यांनी स्पष्ट केले.