चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील घुटकाळा वार्डातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला लागुनच असलेल्या डीपीला मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. अचानकपणे लागलेल्या या आगीमुळे परिसरात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला होता.त्यानंतर या घटनेची माहीती महावितरणच्या कार्यालयाला फोन वरून देण्यात आली. काहीच वेळात महावितरणचे कर्मचारी व परिसरातील नागरीकांनी रेतीचा वापर करून हि आग आटोक्यात आणली,मात्र आग वीजविण्यासाठी नागरिकांना चांगलीच मशक्कत करावी लागली.आग विजवत असतांना रेती टाकण्यात येत होती व त्यावेळी स्पोटाचा आवाज देखील येत होता.तब्बल एका तासानंतर हि आग विजविण्यात आली.शॉर्ट सर्किटमुळे हि लागली असल्याचे सांगितल्या जात आहे,सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे रोहित्र चांगलेच तापतात अश्यातच याविद्युत डीपीत शॉर्ट सर्किट झाला व पेट घेतला असा अंदाज वर्तविल्या जात आहे.