भारत सरकारचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर राज्याचे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार विद्यूत प्रकल्पग्रस्त कृती समिती, चंद्रपूर च्या वतीने चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत प्रकल्पग्रस्तांचा मेळावा दि. 1 जून 2018 रोजी सकाळी 10 वाजता डब्ल्यू.आर.सी. हाॅल, उर्जानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या प्रसंगी जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते पूर्व पालकमंत्राी संजय देवतळे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, भाजपाचे भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य, मारोती गायकवाड, जि.प. सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्या वनिता आसुटकर, जि.प. सदस्य रोशनी अनवर खान, भद्रावती पं.स. सदस्य महेश टोंगे, चंद्रपूर पं.स. सदस्य संजय जाधव, चंद्रपूर पं.स. सदस्य श्रीमती खेमा रायपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या या मेळाव्यात प्रलंबित असलेल्या विविधांगी प्रश्नावर तसेच बाधीत गावाच्या विकासाकरिता सीएसआर निधीचा वापर महाऔष्णिक केंद्राच्या अधिकाÚयांशी विविध मुद्यांवर चर्चा तसेच विविध प्रश्न आणि समस्यांवर या मेळाव्याच्या माध्यमातून उहापोह होणार असल्याने सीएसटीपीएस प्रकल्पग्रस्त बाधीत गावातील सर्व सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रगत कुशल कामगार व नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास बहुसंख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्वश्री देवंेंद्र मालुसरे, अनिल सोमलकर, आनंद रामटेके, आशिष कोल्हे, धिरज डाहाकी, शंकर येरगुडे, ज्योती बोढाले, निशा डाहाकी, वर्षा येरगुडे, आतिश जुनघरे, प्रकाश चुधरी, मधुकर गोहणे, भाग्यश्री सोमलकर, प्रियंका रत्नपारखी, प्रमोद बोढाले, मनिषा चुधरी, आशिष राजुरकर, रोशन पिंपळकर, सुर्यभान येरगुडे, संदीप इखारे, आशिष गोहणे, अमोल येरगुडे, प्रफुल कातकर, प्रविण मोहितकर, प्रकाश झोमलकर, चेतन माहुलकर आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातुन आवाहन केले आहे.