नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूरच्या वाढत्या उन्हामुळे तसेच उष्णतेमुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणले असल्याचा दावा जरी चंद्रपूर मनपा करत असेल तरी उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'हीट अॅक्शन प्लान'च्या कृती आराखड्याची अंबलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र चंद्रपुरात दिसून येत आहे.
जगात हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील तापमान म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी नक्को रे बाबा..असेच आहे.अश्या या चंद्रपुरात सध्या 'हीट अॅक्शन प्लान' फोल ठरले आहे.त्याला कारणही तसेच आहे. कारण यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक तापमान ४७.३ हे चालू वर्षातील सर्वाधिक तापमान होते.आणि तापमान दिवसेंदिवस वाढवत असतांना देखील चंद्रपूर शहरात बोटावर मोजण्या इतपत ४-५ पाणपोई ह्या चंद्रपूरकरांच्या तहान भागवत आहे.त्यामुळे जवळपास ४ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात या ४-५ पाणपोई खरच चंद्रपूरकरांची तहान भागविण्यात सक्षम आहे का?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
चंद्रपूरच्या वाढत्या उन्हामुळे तसेच उष्णतेमुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणले असल्याचा दावा जरी चंद्रपूर मनपा करत असेल तरी उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'हीट अॅक्शन प्लान'च्या कृती आराखड्याची अंबलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे चित्र चंद्रपुरात दिसून येत आहे.
जगात हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील तापमान म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी नक्को रे बाबा..असेच आहे.अश्या या चंद्रपुरात सध्या 'हीट अॅक्शन प्लान' फोल ठरले आहे.त्याला कारणही तसेच आहे. कारण यंदाच्या वर्षीचे सर्वाधिक तापमान ४७.३ हे चालू वर्षातील सर्वाधिक तापमान होते.आणि तापमान दिवसेंदिवस वाढवत असतांना देखील चंद्रपूर शहरात बोटावर मोजण्या इतपत ४-५ पाणपोई ह्या चंद्रपूरकरांच्या तहान भागवत आहे.त्यामुळे जवळपास ४ लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरात या ४-५ पाणपोई खरच चंद्रपूरकरांची तहान भागविण्यात सक्षम आहे का?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
या ‘हीट ॲक्शन प्लान’च्या नावाखाली उपाययोजना केल्याचे फसवे दावे करण्यात येत आहेत. ‘हीट’ वाढली तरी महानगरपालिकेची ‘ॲक्शन’ मात्र शून्यच आहे. एरव्ही वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रशासनाने चंद्रपूरकरांना ‘उन्हावर’ सोडले असल्याचे चित्र सध्या चंद्रपुरात बघायला मिळत आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये काही वर्षांपूर्वी उष्माघातामुळे ३०० लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर त्याठिकाणी उष्माघात कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणजे उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये बरीच घट झाली होती. त्याच धर्तीवर हा आराखडा चंद्रपूर महापालिका गेल्या दोन वर्षांपासून राबवित आहे.
दरवर्षी चंद्रपूर उन्हाळ्यात निखाऱ्याजवळ उभे असल्यासारख्या उन्हाच्या झळा सोसत आहे. चंद्रपूरात पारा ४७ अंशापेक्षा जास्त पोहोचला असून ऊन्हाचे चटके आणि घामाच्याधारांनी नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
‘आला उन्हाळा आरोग्य सांभाळा’ म्हणणाऱ्या पालिकेच्या आरोग्य अधिकारी अंजली आंबटकर यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रपूर शहरात ८० हजार पॉम्पलेट्सच्या माध्यमातून व जाहिरातीच्या माध्यमातून उन्हापासून बचाव करण्याचे जनजागृती करण्यात आली आहे व तसे शहरभर फ्लेक्स देखील लावण्यात आले, असे ते सांगतात मात्र त्या बरोबर या प्लानमध्ये अन्यकाही गोष्टी आहेत ज्यावर सध्या कोणाचेच लक्ष नाही,याअंतर्गत महापालिकेच्या अंतर्गत येणारी उद्याने नागरिकांसाठी खुली करून देणे, त्याठिकाणी वातावरण थंड राहील अशी व्यवस्था करणे, शहरातल्या वेगवेगळ्या भागांत थंड क्षेत्र (कूलिंग झोन) तयार करणे, शहर बसस्थानक, वाहतूक दिवे असलेले चौक आदी ठिकाणी ग्रीन नेट टाकणे, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरातल्या विविध भागांमध्ये पाणपोईची व्यवस्था करणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील काही भाग वगळता इतरत्र या प्लानची अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून आले. यामुळेच यंदाहि हा तयार झालेला अॅक्शन प्लान 'हिट' होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी जूनमध्ये सुरु होणारा मान्सून यंदा लवकरच दाखल होणार आहे असे असले तरी देखील सध्याचा उन्हाचा तडाखा बघता लोकसंख्येच्या मानाने व गर्दीच्या ठिकाणी पाणपोई नसल्याची ओरड नागरिक करत आहे.
श्रीमंत लोकांना बिसलरी घेऊन तहान भागविणे शक्य असले तरी समाजातील गरीब कामगार मात्र आजही पाणपोईवर जाऊन तहान भागवतो असा विचार करतात, मात्र त्यांना त्या घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने ‘आला उन्हाळा आरोग्य सांभाळा’असा पारंपरिक सल्लाजरी चंद्रपूरकरांना दिला असला तरी पाणीपोईसाठी गरिबांच्या खिशाला मात्र खात्रीच लावली आहे.
'हीट अॅक्शन प्लान'च्या नियमावलीनुसार शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्तेक गर्दीच्या ठिकाणी थंड पाणी पुरवठा करणाऱ्या पाणपोई उभारणे गरजेचे आहे मात्र सध्यातरी चंद्रपुरात पाणपोई बोटावर मोजण्या इतक्या असून तापणाऱ्या शहरात उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजनांची कमतरता दिसत आहे.
उन्हाळ्याची चाहुल लागताच शहरातील विविध भागात पाणपोया (प्याऊ) सुरू करण्यात येतात. दारोदारी भीक मागणाऱ्यापासून ते फेरीवाले, कामगार, खरेदीदार पाणपोईवर येऊन तहान भागवित असतात. चंद्रपूर वगळता दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी चंद्रपुरात फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकू लागतो.अश्यातच छोट्या मोठ्या संस्थांमार्फत शहरात पाणपोई सुरू करून वृत्तपत्रात व स्थानिक वाहिन्यांवर चमकूगिरी केली जाते मात्र आठवडा भरातच काहीतरी कारण सांगून "प्याकअप" केले जाते,त्यामुळे सूर्य आग ओकणाऱ्या चंद्रपुरात लोकसंख्येचे हिशेबाने शहरातील पाणपोईची संख्या मनपा वाढवेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
झाडांची होणारी कत्तल व रस्त्यांचे होणारे रुंदीकरण लक्षात घेता सध्या शहरात ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी झाडे लावने गरजेचे झाले आहे,शहर हिरवेगार करण्यासाठी व तपत्या चंद्रपूरकरांना झाडांची सावली मिळावी म्हणून जास्तीत जास्त झाडे लावले तर येणाऱ्या काही काळात हि बहरणारी झाड चंद्रपूरकरांना सावली नक्कीच देतील.
औद्योगिकीकरण आणि त्यातून निर्माण होणारे शहरीकरण ही काळाची गरज आहे,सध्या विकासाच्या दिशेने शहराची वेगाने सुरू असलेली वाटचाल आणि त्यातच संपूर्ण शहरात होणारे रस्त्याचे कॉन्क्रेटीकरण यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरांच्या तापमानात जवळपास ३ ते ४ अंश सेल्सिअसने भर पडत आहे असे जाणकारांचे म्हणने आहे. सिमेंटमध्ये उष्णता शोषली जात नाही. काँक्रिटमधून प्रकाश परावर्तीत होतो आणि उष्णता निर्माण होते. पर्यायाने उष्णता वाढल्याचे जाणवते. याशिवाय सिमेंट, काँक्रिट उन्हाने गरम होते आणि ते थंड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. त्यामुळे रस्त्यांचे सिमेंटीकरण तापमानात निश्चितच भर घालणारे आहे.
तिवारींच्या फिरती पाणपोई चर्चेचा विषय
एकीकडे सूर्य आग ओकत असतांना लोकसंख्येच्या प्रमाणात चंद्रपुरात पाणपोईची संख्या एकदम बोटावर मोजण्या इतक्या,यातच चंद्रपूर येथील एक सामाजिक कार्यकर्ता तसेच पत्रकार सुनील तिवारी यांची फिरती पाणपोई सध्या चंद्रपुरात चर्चेचा विषय बनली आहे, आपल्या दुचाकीवर दिवसभर ते जेथे जातील तिथे ते आपली फिरती पाणपोई घेऊन निघतात ज्यात २० लिटर पाण्याच्या २ थंड कॅन ठेवेल्या असतात,तिवारी ज्या मार्गाने जातील किव्हा आपली गाडी उभी करतील त्या ठिकाणी उन्हात घराबाहेर निघणारे व उन्हाने बेजार झालेले नागरिक त्या फिरत्या पाणपोईतील थंड पाण्याचा लाभ घेतात,त्यांच्या या कार्यामुळे ते वाहतूक पोलिसांचे जलमित्र बनले आहेत, यात दररोज जवळपास ५०० नागरिक या ठंड पाण्याचा लाभ घेतात,त्यामुळे सुनील तिवारी हे चर्चेचा विषय बनले आहेत. अश्या या सामाजिक कार्यकर्त्याला व पत्रकाराला काव्यशिल्पचा सलाम!!!!!!!!
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध). -------------------------------------------------------------------
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo