चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील अनुसूचित जाती –जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवी व्यक्ती व संस्थांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार योजना सन 2018-19 शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 मे 2018 पर्यत शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अनुसूचित जाती-जमाती,भटक्या व विमुक्त जातीचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अंपग,कुष्ठरोगी इत्यादीच्या विकासासाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय निर्मूलन,अंधश्रध्दा रुढी निर्मूलन व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.या योजनेनुसार व जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना हा पुरस्कार दिला जातेा.
या योजनेनुसार अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण तसेच शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल,अपंग,कुष्ठरोगी इत्यादींच्या विकासासाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक असावेत व त्यांनी सामाजिक क्षेत्रात कमीम कमी 10 वर्षे काम केलेले असावे.प्रस्ताव सादर करतांना अशा सामाजिक कार्यकर्ऱ्याचे वय 24 मे 2018 रोजी 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त व स्त्रियांसाठी 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.अपवादात्मक परिस्थितीत वय शिथील करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्ती केलेल्या समितीकडे राहतील.जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्यविषयक दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,फोटो व केलेल्या कार्याविषयी माहिती प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा.यापूर्वी राज्य शासनाच्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत.सदर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही,असे सहायक आयुक्त,समाजकल्याण, विभाग चंद्रपूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पुरस्कारासंबधी अधिक माहिती व अजाचा नमुना सहायक आयुक्त, समाज कल्याण,विभाग चंद्रपूर यांचे कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे.