महामेट्रोच्या वतीने गांधीबाग
येथे मेट्रो संवाद
नागपूर प्रतिनिधी:
महा मेट्रो नागपूर आणि गांधीबाग स्केटिंग क्लब तर्फे गुरुवार सकाळी नागपूर मेट्रोशी संबंधित कार्यगुणांची ‘स्केटिंग संदेश रैली’ आणि या कार्यविभागातील नागरिकांसाठी ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रैलीत मोठ्या संख्येने लहान स्केटर्सचा सहभाग होता. तर ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमात त्यांचे पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘माझी मेट्रो-नागपूर मेट्रो’, ‘रस्ता सुरक्षा’, ‘स्वच्छ आणि हिरवे नागपूर’, अश्या विविध घोषवाक्याचे फलक हाती घेऊन लहान मुलांनी ‘स्केटिंग संदेश रैली’च्या माध्यमातून नागपूरकरांना जागृती संदेश दिला. गांधीबाग स्केटिंग क्लबमधून ‘स्केटिंग संदेश रैली’चा प्रारंभ झाल्यानंतर पुढे गांधीबाग उद्यान प्रवेशद्वार मार्गे नंगा पुतळा, टांगा स्टँड, साई बेकरी, गांधी पुतळा, बडकस चौक, चिटणीस पार्क, अग्रेसन चौक व येथून परत स्केटिंग क्लबपर्यंत रैलीचा प्रवास होता. यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांकडून जनसमुदायास नागपूर मेट्रोबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले.
‘जहा सवांद है, वहा विवाद कि कोई आशंका नही’ अश्या शब्दात महानगर पालिकेचे माझी स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महा मेट्रोच्या ‘मेट्रो सवांद’ संकल्पनाची प्रशंसा केली. तसेच मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी लहान मुलांसह त्यांचा पालकांना नागपूर मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी बळकट होईल व त्यामुळे निसर्गाचे कश्याप्रकारे संतुलन राखले जाईल यावर मार्दर्शन केले. श्री सुनील तिवारी यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली, तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील मेट्रोच्या कार्याबद्दल तांत्रिक माहिती मुख्य प्रकल्प प्रबंधक(रिच-४) श्री.एम.सुरेश आणि राजेश ताभने यांनी नागरिकांना दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू असलेल्यापैंकी भारताचा सर्वात वेगवान स्केटर व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता निखिलेश निरंजन तभाने, गाँधीबाग स्केटिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता पियुष किशोर आकरे आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग रोलर हॉकी खेळाडू प्रित उपेंद्र वर्मा यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आकर्षक घोषवाक्य हाथी घेऊन स्केटिंग करणाऱ्या लहान मुलांना देखील मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.दिपराज पार्डीकर,शैलेन्द्र पाराशर ,उपेन्द्र वर्मा व महा मेट्रो नागपूरच्या रिच-४ चे मुख्य प्रकल्प प्रबंधक श्री.एम.सुरेश, सीनियर सेक्शन इंजीनियर श्री.राजेश तभाने उपस्थीत होते.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo