राज्यातील ९७ हजार ग्राहकांना घेता येणारलाभ
नागपूर/प्रतिनिधी:वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मुळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.
नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ५,१५७ वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या वीज ग्राहकांकडे ६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वरील वीज ग्राहकांकडे मूळ थकबाकी २ कोटी ६२ लाख रुपये असून त्यावरील व्याजाची रक्कम ३ कोटी ८२ लाख रुपये आहे. ३ लाख रुपये विलंब शुल्कापोटी थकले आहेत.
राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने दि. १ जून २०१८ ते दि. ३१ ऑगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा दि. ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मुळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. दि. १ जूलै २०१८ ते दि. ३१ऑगस्ट २०१८ या दरम्यान ग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम व व्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.
जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षापेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला १०० टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षेपर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे. अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे. यासर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.
ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेटपेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.inयावरील 'AMENESTY SCHEME 2018 या लिंकवर जावून ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपुर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत दि. १ जून २०१८ पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo