मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या वीज कर्मचा-यांचा घरभाडे गोठविण्याचे आदेश
विनापरवानगी गैरहजर असलेले महावितरणचे कर्मचारी बडतर्फ़
नागपूर/प्रतिनिधी:
विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणा-या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 25 कर्मचा-यांवर महावितरणने बडतर्फ़ केले आहे तर 9 कर्मचा-यांविरोधातील कार्यवाहीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून सध्याचे अवकाळी पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यांना अधिक काळ अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणच्या सर्च अधिकारी आणि कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे, आणि मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याचे आदेश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.
कामावर सातत्याने गैरहजर असणा-या विदर्भातील 52 कर्मचा-यांविरोधात महावितरणने मार्च माहिन्याच्या सुरुवातीस कार्यवाही सुरु केली होती, त्यापैकी तब्बल 25 कर्मचा-यांना बडतर्फ़ करण्यात आले असून यात अकोला परिमंडलातील एक, अमरावती परिमंडलातील 4, चंद्रपूर परिमंडलातील 6, तर नागपूर आणि गोंदीया परिमंडलातील प्रत्येकी 7 कर्मचा-यांचा समावेश आहे. याशिवाय 9 कर्मचा-यांविरोधातील कार्यवाही अंतिम टप्प्यात असून यात अकोला आणि चंद्रपूर परिमंडलातील प्रत्येकी एक, अमरावती परिमंडलातील दोन तर नागपूर परिमंडलातील पाच कर्मचा-यांचा समावेश आहे.
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या कर्मचा-यांचे घरभाडे गोठवा:
मागिल काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना झाल्या असून अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात वेळ होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत, या तक्रारींचे गांभिर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी वरील आदेश दिले आहेत. मागिल वर्षीही महावितरण प्रशासनाने अनेक कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता, मुख्यालयीन वास्तव्यास नसल्याच्या कारणास्त्व गोठविला होता आणि परिणामस्वरूप अनेकांनी मुख्यालयात वास्तव्यास सुरुवातही केली आहे. यावेळी हा नियम अधिक कठोरपणे राबवून प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुख्यालयी वास्तव्यास असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश भालचंद्र खंडाईत यांनी विदर्भातील पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंता यांना दिले असून येत्या तीन दिवसात याबाबतचा अहवाल प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महावितरण कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कंपनी प्रशासन पुर्वीपासूनच आग्रही असून याबाबत सातत्त्याने पाठपुरावाही करणे सुरू असतांनाही अनेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी येत आहेत, याबाबत सर्व संबंधितांचीही चांगलीच कानउघाडणी करण्यात आली आहे. कुठल्याही कर्मचा-यांची बेशिस्त खपवून घेतल्या जाणार नाही, ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, असेही खंडाईत यांनी बजावून सांगितले. वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत हयगय करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून वीजचोरीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात वीजचोरीकडे डोळेझाक करणा-यांविरोधातही कठोर कारवाईच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo